चांदोली वसाहत परिसरातील घटनेनं खळबळ.
dudhgaon crime news : दुधगाव मध्ये नवजात अर्भकाला फेकले गटारात : मिरज तालुक्यातील दुधगाव येथील चांदोली वसाहत परिसरात खेळणार्या मुलांचा गटारीत पडलेला चेंडू काठीने बाहेर काढताना पिशवीतून मृत स्त्री अर्भक बाहेर आल्याने एकच खळबळ उडाली. मंगळवारी सायंकाळी साडे सात वाजता हा प्रकार घडला. याबाबत पोलिस पाटील दिलीप कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
dudhgaon crime news : दुधगाव मध्ये नवजात अर्भकाला फेकले गटारात
दुधगाव येथील चांदोली वसाहत ते संत बाळूमामा मंदिरपर्यंतच्या रस्त्यावर अण्णा गवळी यांच्या घरासमोर मंगळवारी सायंकाळी मुले खेळत होती. त्यांचा चेंडू बांधीव गटारीत पडला. त्यामुळे काठीने चेंडू बाहेर काढता पिशवी लागली. जड पिशवी बाहेर काढल्यानंतर त्यामध्ये अर्भक पाहून सर्वजण घाबरले. परिसरात ही माहिती पसरली. त्यामुळे गर्दी झाली.
पोलिस पाटील दिलीप कुंभार यांनी सांगली ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. वैद्यकीय तपासणीत स्त्री अर्भक असल्याचे स्पष्ट झाले. जन्मल्यानंतर अर्भक मारून नाळेसकट पिशवीत घालून विल्हेवाट लावण्यासाठी गटारीत फेकून दिल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आशा वर्कर्सच्या मदतीने परिसरात महिला प्रसूत झाली आहे काय? याचा तपास केला.
dudhgaon-crime-news-newborn-baby-thrown-into-sewer-in-dudhgaon
परंतू प्राथमिक तपासात परिसरातील महिला नसावी असा संशय व्यक्त होत आहे. अनैतिक संबंधातून अर्भक जन्मले असावे किंवा मुलगी झाली म्हणून तिला मारून टाकल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.