rajkiyalive

Jayant patil news : ड्रोन,मल्टी स्पेक्ट्रम ड्रोन उपलब्ध करून देणारा “राजारामबापू”हा देशातील पहिला साखर कारखाना

Jayant patil news : ड्रोन,मल्टी स्पेक्ट्रम ड्रोन उपलब्ध करून देणारा “राजारामबापू”हा देशातील पहिला साखर कारखाना : राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याने संपूर्ण देशात सर्वप्रथम आपल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे औषध फवारणी आणि मल्टी स्पेक्ट्रम ड्रोनसारखे अद्यावत तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले आहे.

Jayant patil news : ड्रोन,मल्टी स्पेक्ट्रम ड्रोन उपलब्ध करून देणारा “राजारामबापू”हा देशातील पहिला साखर कारखाना

जगातील आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा माझा कायम प्रयत्न राहील,असा विश्वास राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष,युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी व्यक्त केला.

ते वाळवा तालुक्या तील तांदुळवाडी,मालेवाडी,भरतवाडी, कणेगाव,बहादूरवाडी येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद व संपर्क दौऱ्यात बोलत होते.

जेष्ठ संचालक प्रताप पाटील,शैलेश पाटील, हणमंत माळी,राजकुमार कांबळे,संचालिका डॉ.सौ.योजना शिंदे-पाटील,सचिव डी.एम. पाटील,बांधकाम अभियंता प्रेमनाथ कमलाकर,जलसिंचन अधिकारी जे.बी. पाटील,ऊस पुरवठा अधिकारी नितीन पाटील,गटाधिकारी संग्राम पाटील,विकास कदम या दौऱ्यात सहभागी झाले होते.

प्रतिकदादा पाटील म्हणाले,लोकनेते राजारामबापू पाटील यांनी साखराळेच्या माळावर साखर कारखाना उभा करून वाळवा तालुक्याच्या विकासाला चालना दिली आहे. माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी साखर कारखान्याची प्रगती करताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित सातत्याने जपले आहे. गेल्या ५०-५५ वर्षापासून आपण व साखर कारखान्यात एक ऋणानुबंध निर्माण झाला आहे.

तो जपण्याचा,वाढविण्याचा माझा अखंड प्रयत्न राहील.
यावेळी संचालक प्रताप पाटील,शैलेश पाटील,डॉ.योजना शिंदे-पाटील,तसेच नितीन पाटील यांनी माजी मंत्री आ.जयंतराव पाटील, प्रतिकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यां साठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले

"Rajarambapu" is the first sugar factory in the country to provide drones and multi-spectrum drones.

माजी संचालक भिमराव पाटील,माजी सभापती अँड.विश्वासराव पाटील,बँकेचे संचालक संभाजी पाटील,जेष्ठ कार्यकर्ते बाजीराव पाटील,माजी सरपंच विलासराव देसावळे,बाजीराव बेनाडे,संग्रामसिंह घोरपडे, मंगेश माने,माजी सरपंच रमेश पाटील, राजाराम पाटील,मालेवाडीच्या सरपंच अस्मिता खवरे,उपसरपंच राहुल पाटील, अनिता गुरव,भरतवाडीच्या सरपंच सोनाली निकम,उपसरपंच धनश्री निकम यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने या दौऱ्यात सहभागी झाले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज