rajkiyalive

Kargni suside news : करगणीत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

 

Kargni suside news : करगणीत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या करगणी येथील पाटील मळा परिसरात राहणाऱ्या सायली महादेव सरगर (वय १६) या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरात लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Kargni suside news : करगणीत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

त्रास देणाऱ्या युवकाची चर्चा

ही घटना रविवारी (दि. ७) सकाळी साडेसहा वाजता उघडकीस आली. सायली शाळेला सुट्टी असल्याने घरीच होती. काही वेळाने कुटुंबीयांनी पाहिले असता ही बाब लक्षात आली.

सायलीच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी तिच्यावर कोणाचा दबाव होता का, तिला कोणी त्रास देत होते का, याचा तपास पोलीस करत आहेत. तिच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड तपासण्याची प्रक्रिया सुरु आहे. प्राथमिक माहितीनुसार एका युवकाने सोशल मीडियावरून तिला मेसेज करून त्रास दिल्याची चर्चा गावात आहे.

घटनेनंतर तिच्या वडिलांनी आटपाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक विनय बहीर, पोलीस उपनिरीक्षक राजीव केंद्रे व पथकाने पाहणी केली असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एम. एम. आवळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणी आटपाडी पोलिसांनी भादंवि कलम १७४ अंतर्गत नोंद केली आहे.

Kargni suside news: A 10th standard student in Kargni committed suicide by hanging he

सायलीच्या आत्महत्येमागील नेमके कारण शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज