rajkiyalive

 Chandoli news : चांदोली भरलं, नदी काठावर सावधगिरीची किनार;

 

Chandoli news : चांदोली भरलं, नदी काठावर सावधगिरीची किनार; सांगली जिल्ह्यातल्या डोंगरकपाऱ्यांत गेले काही दिवस संततधार पाऊस कोसळत आहे. निसर्गाच्या या अखंड वर्षावाने डोंगर झुलायला लागले, ओढे-नाले तुडुंब वाहू लागले आणि चांदोली धरणाची पातळीही भरून वाहू लागली.

 Chandoli news : चांदोली भरलं, नदी काठावर सावधगिरीची किनार;

चांदोलीतून वाढला विसर्ग

चांदोली धरण सध्या आपल्या क्षमतेच्या ८२ टक्क्यांपर्यंत भरले असून, त्यातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे वारणा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. धरणातील पाणी साठा सध्या ४.५८ टीएमसी पर्यंत पोहोचला आहे, तर धरणाची एकूण क्षमता ५.६२ टीएमसी आहे.

वारणा नदीकाठच्या गावांमध्ये पाण्याची पातळी चढू लागल्याने गावकऱ्यांच्या नजरा आता नदीकाठी खिळल्या आहेत. प्रशासनाने सावध राहा, सुरक्षित स्थळी रहा, असा सल्ला दिला आहे. जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथके आणि महसूल यंत्रणा सतर्कपणे परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.

भुदरगड, पन्हाळा, शिराळा, वाळवा, मिरज, कडेगाव आदी तालुक्यांत नद्या दुथडी भरून वाहत आहेत. गावांमध्ये एक हुरहूर आहे, तरीही निसर्गाच्या या लाटांना सामोरे जाण्याचा निर्धारही आहे.

सांगली जिल्ह्यातील नद्यांचे रूप आता रौद्र झालं असलं तरी, प्रशासनाच्या उपाययोजना सुरू आहेत. गावकरी, शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहून आपत्तीपासून सुरक्षित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज