zp election news : स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादीच लागू : विधानसभा निवडणुकीत वापरलेली जी मतदार यादी होती, ती राज्य निवडणूक आयोगाने मागील महिन्यातच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मागवली होती. त्यावर मतदान होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, आता राज्य निवडणूक आयोगाने १ जुलै २०२५ पर्यंतची नवी मतदार यादीच मान्य केली असून, ही यादी केंद्रीय आयोगाकडेही मागितली आहे.
zp election news : स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी १ जुलैपर्यंतची मतदार यादीच लागू
निवडणुकीच्या तुलनेत यंदा स्थानिक स्वराज्य निवडणुकांत मतदारसंख्या व मतदान केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका झाल्यानंतर, १ जुलै २०२५ पर्यंत मतदार नोंदणी केलेल्यांना देखील मतदानाचा अधिकार असेल, अशी महत्त्वाची घोषणा राज्य निवडणूक आयुक्तांनी केली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी देखील १ जुलैपर्यंतची यादीच वापरली जाईल, असे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषद, नगरपंचायत आणि महापालिकांच्या निवडणुकांतही १ जुलै २०२५ पर्यंतची नावे असलेले सर्व मतदार मतदान करू शकतील.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यात सचिव सुरेश काकाणी व इतर अधिकारी उपस्थित होते.
zp election news: Voter list till July 1 is applicable for local government elections
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात घेण्याचा प्रस्ताव असून, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्या, दुसऱ्या टप्प्यात नगरपरिषद व नगरपालिका, तर तिसऱ्या टप्प्यात महापालिकांचे मतदान होईल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.