sangli political news : सांगली जिल्ह्यातील सत्तेच्या रणभूमीची नवी आखणी – प्रभाग रचना 14 जुलैला होणार जाहीर: लोकशाहीच्या वटवृक्षाची मुळे गावागावांत रोवणार्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे नगारे पुन्हा एकदा वाजू लागले आहेत. या सत्ताकारणाच्या नवनव्या घडामोडींमध्ये सांगली जिल्ह्यातील ग्रामराजकारणाला नवे वळण देणारी, प्रशासनाच्या वतीने तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभाग रचना येत्या सोमवार, दिनांक 14 जुलै रोजी जाहीर होणार आहे.
sangli political news : सांगली जिल्ह्यातील सत्तेच्या रणभूमीची नवी आखणी – प्रभाग रचना 14 जुलैला होणार जाहीर
या नव्या आराखड्यानुसार जिल्हा परिषदेचे 61 गट आणि पंचायत समित्यांचे 122 गण निश्चित करण्यात आले आहेत. परिणामी, जिल्ह्याचे लक्ष आता या महत्त्वपूर्ण घोषणेकडे लागले आहे.
राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जून महिन्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच शहरी संस्थांची नव्याने प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ग्रामपातळीच्या सत्ता स्थापनेचे नवे समीकरण ठरवणारी ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे.
sangli-political-news-new-layout-of-the-battlefield-of-power-in-sangli-district-ward-structure-to-be-announced-on-july-14
2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत झेडपीचे 60 गट व पंचायत समित्यांचे 120 गण होते. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात त्यात वाढ होऊन अनुक्रमे 68 व 136 गणांची आखणी झाली होती. त्यानुसार आरक्षण प्रक्रियाही पार पडली होती. मात्र, सत्तांतरानंतर महायुती सरकारने त्या प्रक्रियेला स्थगिती दिली. आणि आता, शासनाच्या नव्या आदेशानुसार, गटांची संख्या 68 वरून 61 आणि गणांची संख्या 136 वरून 122 करण्यात आली आहे.
ही प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर दिनांक 21 जुलैपर्यंत नागरिकांना हरकती व सूचना सादर करता येतील.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.