rajkiyalive

रघुनाथदादा पाटील बी.आर.एस. पक्षात

बीआरएस पक्षात रघुनाथदादा पाटील यांचे स्वागत करताना तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव समवेत भगीरथ भालके, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, अ‍ॅड.अजित काळे, बी.जी.पाटील, हणमंतराव पाटील

भारतात आणि महाराष्ट्रात शरद जोशी यांनी शेतकर्‍यांच्या हक्कासाठी स्वतंत्र शेतकरी संघटना स्थापन केले. शरद जोशी यांच्या नेतृत्वाने भारावून गेलेली शेतकर्‍यांची अनेक पोरं तालुक्या-तालुक्यातून पुढे आली, नेते झाली. पसारा वाढला की मतभेद वाढतात. शेतकरी संघटनाही अनेकदा फुटली.

शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला कायम ठेवत स्वतंत्र चुली

जोशींच्या मूळ संघटनेला समांतर संघटना उदयास आल्या. काहींनी प्रस्थापित पक्षांची साथ धरली. एकमेकांमधले अंतर कायम राखत सर्वांनी वाटचाल सुरू ठेवली. राजू शेट्टी, पाशा पटेल, रघुनाथदादा पाटील, लक्ष्मण वडले, सदाभाऊ खोत ही त्यातली प्रमुख नावे.

रघुनाथदादा पाटील यांनी शेतकर्‍यांसाठी अनेक आंदोलने

केली, शेतकर्‍यांसाठी त्यांनी तुरूंगवासही भोगला. परंतु शरद जोशींच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चातही शेतकरी संघटनेची छकले झाली. राजू शेट्टी, सदाभाउ खोत यांनी वेगळी चूल मांडली. अनेक राजकीय पक्षांबरोबर सवार्ंंनी साटेलोटे केले. राजू शेट्टी यांनी काही काळ भाजप तर काही काळ काँग्रेसबरोबर युती केली तर सदाभाउ खोत भाजपच्या कळपात सामिल होवून मंत्रीपद पदरात पाडून घेतले.

आम आदमी पक्षाच्या उदयानंतर रघुनाथदादाही काही काळ आपमध्ये

सध्याची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. 2024 मध्ये विधानसभा, लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. जो तो पक्ष विस्तारण्यासाठी धावपळ करीत आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्रीही अनेकांकडे गळ टाकून बसले आहेत. त्यांच्या गळाला आता शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील लागले आहेत. रघुनाथदादा पाटील यांनी प्रमुख सहकार्‍यांसमवेत बी.आर.एस. पक्षात प्रवेश केला. मुख्यमंत्री के.सी.राव यांनी रघुनाथदादांच्या गळ्यात बीआरएस पक्षाचा स्कार्फ घालून स्वागत केले. यावेळी समर्थक कार्यकर्त्यांनी अब की बार किसान सरकार, रघुनाथदादा आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या. के.सी.राव यांनी रघुनाथदादांच्या घरी स्नेहभोजन केले. प्रमुख पदाधिकार्‍यांसमवेत चर्चा केली.

शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी लढाई

शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील अनेक वर्षापासून राज्यातील शेतकर्‍यांच्या न्याय हक्कासाठी लढाई लढत आहेत. राज्यातील शेतकर्‍यांचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला ही चांगली बाब आहे. 9 ऑगस्ट रोजी क्रांतीदिनी इस्लामपूरात मेळावा घेणार असल्याची घोषणा तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के.सी.राव यांनी केली.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

वारसा असूनही… न झालेले आमदार…

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

बीआरएस हा पक्ष शेतकर्‍यांसाठी काम करणारा पक्ष

साखराळे ता.वाळवा येथे शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या निवासस्थानी तेलंगणाचे मुख्यमंत्री के.सी.राव यांनी सदिच्छा भेट दिली.  रघुनाथदादा पाटील म्हणाले, बीआरएस हा पक्ष शेतकर्‍यांसाठी काम करणारा पक्ष आहे. के.सी.राव यांच्यासोबत शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नावर सखोल चर्चा झाली. अऩेक प्रश्नांची समर्पक उत्तर मिळाल्यानंतर पक्षात प्रवेश केला आहे. शेतकर्‍यांना न्याय देणारा व त्यांचे प्रश्न सोडविणार एकही राजकीय पक्ष महाराष्ट्रात नाही. बीआरएसपक्षा तेलंगणातील शेतकर्‍यांना वीज, पाणी मोफत दिले असून अनेक सवलतीही दिल्या आहेत. त्यामुळे देशात केवळ हाच पक्ष शेतकर्‍यांना न्याय देईल अशी आमची धारणा झाली आहे.

9 ऑगस्ट रोजी इस्लामपूरातून राजकीय पक्षांना महाराष्ट्र छोडो

महात्मा गांधींनी 9 ऑगस्टला इंग्रजांना भारत छोडो असे सांगितले होते. संपुर्ण राज्यातील शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी 9 ऑगस्ट रोजी इस्लामपूरातून सर्व भ्रष्ट राजकर्त्यांना आणि राजकीय पक्षांना महाराष्ट्र छोडो असे सांगणार आहे. यावेळी भगीरथ भालके, कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, अ‍ॅड.अजित काळे, बी.जी. पाटील, हणमंतराव पाटील, शंकर मोहिते, गणेश शेवाळे, लक्ष्मण पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 शरद पवार अलीबाबा, बाकीचे चाळीस चोर

राज्यातील महाविकासआघाडी, महायुतीतील सर्व पक्षांना आम्ही पाठिंबा देवून पाहिला. मात्र एकाही पक्षाने शेतकर्‍यांचे प्रश्न सोडविले नाहीत. राज्यातील सर्व नेते लुटारु आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अलीबाबा असून बाकीचे चाळीस चोर आहेत अशी टीका बीआरएसचे नेते रघुनाथ पाटील यांनी केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज