rajkiyalive

राज्यात चर्चा केवळ जयंत पाटलांचीच…

 

 

 

jayant patil जयंत पाटील राष्ट्रवादी सोडणार आणि भाजपमध्ये दाखल होणार, जयंत पाटील यांनी घेतली अमित शहांची भेट. जयंत पाटील यांच्यासोबत सुमन पाटील आणि मानसिंगराव नाईक. जयंत पाटील यांनी अमित शहांची घेतली गुप्त भेट या बातम्यांनी रविवारी सर्वांना भंडारून सोडले, शेवटी जयंत पाटील यांनीच या सर्व बातत्यांचे खंडन केले आणि मी शेवटपर्यंत राष्ट्रवादीतच राहणार असे प्रसारमाध्यमांना सांगितल्यानंतर जयंत पाटील यांच्या चर्चेला तूर्तास पूर्णविराम मिळाला

 

 

दिनेशकुमार ऐतवडे
.

jayant patil राजकारणात प्रवेश झाल्यापासून जयंत पाटील सतत चर्चेतच

राजकारणात प्रवेश झाल्यापासून माजी मंत्री जयंत पाटील सतत चर्चेतच आहेत. गेल्या पंधरा दिवसात जयंत पाटील पुन्हा एकदा राज्याच्या पटलावर चर्चेत आले आहेत. एकूणच एनकेन प्रकारे जयंत पाटील चर्चेत राहिले. सन 1984 मध्ये अमेरिकत शिकत असलेल्या जयंत पाटलांना अचानक राजकारणात यावे लागले. राजारामबापुंच्या अकाली निधनानंतर त्यांना पहिल्यांदाच कारखान्याचे चेअरमनपद मिळाले. तेथून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला.

पाच वर्षे मतदार संघाचा पूर्ण अभ्यास केला

1985 साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या परंतु जयंत पाटील यांनी गडबड केली नाही. वाळव्याच्या डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांना निवडून आणले. पाच वर्षे मतदार संघाचा पूर्ण अभ्यास केला आणि 1990 च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1995, 1999, 2004, 2009, 2014 आणि 2019 असे सलग सात वेळा ते वाळवा, इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिनिधत्व करीत आहेत.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

वारसा असूनही… न झालेले आमदार…

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

1990 आणि 1995 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर जयंत पाटील आमदार झाले

10 जून 1999 रोजी राष्ट्रवादीची स्थापना झाली. त्या अगोदर 1990 आणि 1995 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर जयंत पाटील आमदार झाले होते. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला होता. सांगली जिल्ह्यातही बरेच मोठे राजकारण झाले होते. 1995 च्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यात शिराळ्यातून शिवाजीराव नाईक, आटपाडीमधून राजेंद्रअण्णा देशमुख, पलूस कडेगावमधून संपतराव देशमुख,कवठेमहांकाळमधून अजितराव घोरपडे आणि जतमधून मधूकर कांबळे हे पाच आमदार अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यामुळे 1999 मध्ये राष्ट्रवादीमध्ये कोणकोण जाणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते ते वाळव्याच्या जयंत पाटील यांच्यावर.

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष होते ते सांगलीच्या दादा घराण्यावर आणि वाळव्याच्या जयंत पाटील यांच्यावर. त्यावेळी जयंत पाटील हेही जिल्ह्यावर लक्ष ठेवून होते. दादा घराण्यातील प्रकाशबापू पाटील काँग्रेसमध्येच राहणे पसंत केलेे. तर विष्णुअण्णा पाटील राष्ट्रवादीत जाणे पसंत केले. जयंत पाटील यांनीही राष्ट्रवादीते जाणे पसंत केले. सांगली जिल्ह्यात त्यावेळी आर. आर. पाटील, मदन पाटील आणि जयंत पाटील हे तीन दिग्गज राष्ट्रवादीत होते. तिघांचेही गट वेगळे होते. त्या परिस्थितीत जयंत पाटील यांनी आपला दबदबा तयार केला.

हेही वाचा

खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण

जयंत पाटलांना घेरण्यासाठी महाडिकांची तयारी

राष्ट्रवादी ज्या ज्या वेळी सत्तेत आली त्या प्रत्येक वेळी जयंत पाटील यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली

राष्ट्रवादी ज्या ज्या वेळी सत्तेत आली त्या प्रत्येक वेळी जयंत पाटील यांनी पहिल्या फळीतील नेते म्हणून मंत्रीपदाची शपथ घेतली. कायम त्यांना चांगले मंत्रीपद मिळाले. त्यांना जी काही खाती मिळाले त्या प्रत्येक खात्यावर त्यांनी आपले नाव कोरले. राज्याचा सलग 9 वेळा त्यांनी अर्थसंकल्प मांडला. अर्थमंत्री, ग्रामीण विकासमंत्री, गृहमंत्री अशा महत्वाच्या मंत्रीपदीवर ते विराजमान झाले. राष्ट्रवादीमध्ये राहूनही इतर पक्षात त्यांनी आपली माणसे पेरली आहेत.

भाजपला भाजप नव्हे तर जेजेपी म्हणून ओळखले जात होते.

सांगली जिल्ह्यात तर बीजेपीचे कमळ त्यांच्याच जोरावर उमलले, रूजले हे जगजाहीर आहे. एवढेच नव्हे तर भाजपला भाजप नव्हे तर जेजेपी म्हणून ओळखले जात होते. जिल्ह्याच्या भाजपवर त्यांचे एवढे वर्चस्व होते. जिल्हा परिषद, जिल्हा बँक, महापालिका, जिल्यातील विविध बाजार समित्यांवरही त्यांनी आपली सत्ता काबिज केली. चार कारखाने चालविण्याचा विक्रमही त्यांच्या नावावर आहे. अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्रध्यक्ष बिल क्लिटंन यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक केले होते.

राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेत जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या माघारीतही त्यांनी मोठा रोल बजावला.

दरम्यान, शरद पवारांचा राजीनामा अन् राष्ट्रवादी नव्या अध्यक्षांची निवड यातही ते चर्चेत राहिले. शरद पवारांनी अध्यक्षपद सोडले तर अजितदादा की सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व असा वाद रंगला. यावेळी या वादात सेफ पॉलिटिक्स अन् बॅनरवरील भावी मुख्यमंत्री सत्यात उतरविण्यासाठी ते काँग्रेसचा पत्करतील अशा चर्चा रंगल्या. यातून काँग्रेसलाही सक्षम नेतृत्व मिळेल, अशा आडाखे काहींने बांधले. पण राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेत जयंत पाटील यांनी शरद पवारांच्या माघारीतही त्यांनी मोठा रोल बजावला.

जयंत पाटील यांनी एकट्याने राष्ट्रवादीचा किल्ला लढवली.

गेल्या महिन्र्यात राष्ट्रवादी पक्षात मोठा भूकंप झाला. अजित पवारांनी आपल्या समर्थक आमदारांना घेवून सरकारमध्ये सामिल झाले. तेंव्हाही जयंत पाटील चर्चेत आले होते. जयंत पाटील यांनी एकट्याने राष्ट्रवादीचा किल्ला लढवली. शरद पवारांच्या पाठिशी ते एकनिष्ठपणे उभे राहिले. परंतु त्यांच्याबाबतीत रोज काहीना काही वावड्या उठत आहेत. खुद्द जयंत पाटील यांनाही ते आता विशेष असे काही वाटत नाही.

रविवारी तर प्रसार माध्यमे आणि टी. व्ही. चॅनेलवाल्यांनी हद्दच केली.

रविवारी तर प्रसार माध्यमे आणि टी. व्ही. चॅनेलवाल्यांनी हद्दच केली. रविवारी सकाळी पुण्यात अमित शहा आणि जयंत पाटील यांची भेट झाल्याचे खात्रीलायक सांगू लागले. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ही भेट घडवून आणली इथपर्यंत बातम्या पसरल्या. पण रविवारी दुपारीच जयंत पाटील यांनी असे काही घडले नाही, असा खुलासा केला. मी गेली दोन दिवस शरद पवारांच्या सोबतच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

एकंदरीत राज्यात असूदे किंवा जिल्ह्यात कोणताही विषय असूदे, जयंत पाटील सध्या चर्चेत आल्याचे दिसत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज