rajkiyalive

फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही

काँग्रेस गद्दार तर भाजप हा महागद्दार : महादेव जानकर
जनप्रवास,  विटा
आता गोपीनाथ मुंडेचा भाजप राहिला नाही.
        काँग्रेस पक्ष हा गद्दार आहे तर भाजप हा पक्ष महागद्दार आहे. आता गोपीनाथ मुंडेचा भाजप राहिला नाही. सध्याचा भाजप हा देवेंद्र
फडणवीसांचा झाला आहे. आम्ही गोपीनाथ मुंडेसाहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपशी युती केली होती. मात्र सध्या कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवून युती करावी, असे नेतृत्व ना काँग्रेसकडे, ना भाजपकडे त्यामुळे आम्ही कोणासोबत जायचे याचा निर्णय त्या – त्यावेळी आमच्या पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड घेईल. सध्याच्या भाजपच्या या धोरणामुळे भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही, असे सूचक वक्तव्य रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केले.

हेही वाचा

भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन

संजयकाका आमच्या पक्षात लक्ष घालण्यापेक्षा तुम्हाला तिकीट मिळते का बघा..

तर पुन्हा मैदानात – विलासराव जगताप

विटा दौऱ्यावर आलेल्या माजी मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला
 जन स्वराज्य यात्रेच्यानिमित्ताने विटा दौऱ्यावर आलेल्या माजी मंत्री महादेव जानकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक शिवाजी हारुगडे, रासपचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, युवकचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजित पाटील, बाळासाहेब मेटकरी, प्रणव हारुगडे, महेश मेटकरी, प्रदीप हारुगडे, रासपचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण सरगर, युवा नेते उमाजी चव्हाण, संघटक कालिदास गाढवे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

वारसा असूनही… न झालेले आमदार…

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

आमच्याशी युती करून ती दीड दोन टक्के मते मिळवून सत्ता हस्तगत केली
       यावेळी बोलताना माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले, काँग्रेस पक्ष हा गद्दार आहे तर भाजप हा पक्ष महागद्दार आहे. हे सत्तेत येत नव्हते तेव्हा त्यांना जी दीड दोन टक्के मतांची गरज होती. आमच्याशी युती करून ती दीड दोन टक्के मते मिळवून सत्ता हस्तगत केली. त्यानंतर मात्र सत्तेचा घमंड त्यांच्या डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. जो तो त्याचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला ही तेच करावे लागेल. म्हणूनच महाराष्ट्रभर फिरून जनतेत जाऊन मते आजमावत आहे. आम्हाला भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सारखेच आहेत. काँग्रेसने त्या त्याकाळात बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये प्रादेशिक पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाच होता. आता भाजपही तेच करत आहे. त्यामुळे दोघांपासून समान अंतरावर राहून आमचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.
दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीला बोलावले नसल्याची नाराजी
          एकेकाळी महायुतीचे घटक पक्ष असलेले जानकर यांनी दिल्लीत झालेल्या एनडीएच्या बैठकीला बोलावले नसल्याची नाराजी व्यक्त करत नव्याने झालेला इंडिया आघाडी आम्हाला गृहित धरत नाही, अशी खंत व्यक्त केली. ते म्हणाले, काँग्रेस पक्ष हा गद्दार आहे तर भाजप हा पक्ष महागद्दार आहे. हे सत्तेत येत नव्हते, तेव्हा त्यांना जी दीड दोन टक्के मतांची गरज होती. आमच्याशी युती करून ती दीड दोन टक्के मते मिळवून सत्ता हस्तगत केली. त्यानंतर मात्र सत्तेचा घमंड त्यांच्या डोक्यात शिरला. चूक त्यांची नाही तर आमची आहे. जो तो त्याचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला ही तेच करावे लागेल. म्हणूनच महाराष्ट्रभर फिरून जनतेत जाऊन मते आजमावत आहे. आम्हाला भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्ष सारखेच आहेत. काँग्रेसने त्या त्याकाळात बिहार आणि उत्तरप्रदेशमध्ये प्रादेशिक पक्ष कमकुवत करण्याचा प्रयत्न केलाच होता. आता भाजपही तेच करत आहे. त्यामुळे दोघांपासून समान अंतरावर राहून आमचा पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.
सध्याचा भाजप देवेंद्र फडणवीसांचा झाला आहे
      आता गोपीनाथ मुंडेचा भाजप राहिलेला नाही. सध्याचा भाजप देवेंद्र फडणवीसांचा झाला आहे. आम्ही गोपीनाथ मुंडेसाहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून भाजपशी युती केली होती. मात्र सध्या कोणाच्या शब्दावर विश्वास ठेवून युती करावी, असे नेतृत्व ना काँग्रेसकडे, ना भाजपकडे त्यामुळे आम्ही कोणासोबत जायचे याचा निर्णय त्या – त्यावेळी आमच्या पक्षाचे पार्लमेंटरी बोर्ड घेईल. सध्याच्या भाजपच्या या धोरणामुळे भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही. आता कुणाच्या मागे लागायचे नाही. ज्यांना गरज असेल ते आपल्या मागे लागतील. आपण रस्त्यावरची फाटकी माणसं आहोत. पक्ष वाढवायचा असेल तर मतांची टक्केवारीपण वाढली पाहिजे. त्यासाठी रासप आपला प्रत्येक निवडणूकीत उमेदवार उभा करणार आहे. लोकसभा व संसद हे माझे प्राधान्य आहे. मागच्यावेळी आमची युती होती. पक्षातील लोकांचा आग्रह होता. त्यामुळे विधानपरिषद आणि मंत्रीपद घेतले. आता आपल्यासाठी बारामती, परभणी, माढा मतदारसंघ तसेच उत्तरप्रदेशमधील मिर्झापूर असे मतदारसंघाचे पर्याय खुले आहेत.
मी युती केली त्यावेळी मला आणि भाजपला गरज होती.
       नितीन गडकरी यांच्यावर कॅगने ओढलेल्या ताशेऱ्यावर बोलताना ते म्हणाले, गडकरी यांनी देशभरात केलेली रस्त्याची कामे उल्लेखनीय आहेत. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर चांगली आहे. त्यामुळे त्यांच्या प्रतिमेला अशा गोष्टींमुळे तडा जाऊ शकत नाही. भाजप कानफटीला पिस्तूल लावून प्रवेश करून घेते या मताशी मी सहमत नाही. मी युती केली त्यावेळी मला आणि भाजपला गरज होती. त्यामुळे आम्ही एकमेकांच्या गरजेपोटी युती केली होती. त्यामुळे मला भाजपचा तसा अनुभव नसल्याचे स्पष्ट केले.
सामान्य जनता शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत
        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत गेलेले लोक हे गावटगे आहेत. सत्ता बाजूला गेल्यास हे सर्वजण अजून कुठे जातील हे कळणार ही नाही. सामान्य जनता मात्र शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचे दिसते. मी महाराष्ट्रभर फिरलो आहे. काँग्रेस पक्षाचे नेते शहाणपणाने वागले तर त्यांना चांगले दिवस येतील, असे स्पष्ट मत माजी मंत्री जानकर यांनी व्यक्त केले.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज