rajkiyalive

चांद्रयान मोहिमेत उमळवाडचा स्वप्निल कांबळे ही सहभागी

दिनेशकुमार ऐतवडे

चांद्रयान मोहिमेची अखेर चंद्रावर यशस्वी लँडींग झाले.

संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलेल्या चांद्रयान मोहिमेची अखेर चंद्रावर यशस्वी लँडींग झाले. या चांद्रयान मोहिमेच्या यशस्वीतेसाठी संपूर्ण भारतातून प्राथर्ना करण्यात येत होते. गेल्या अनेक दिवसाची प्रतिक्षा संपून भारताने चंद्रावर कायमचे आपले नाव कोरले आहे. यामध्ये अनेक ज्ञात, अज्ञात व्यक्तींचा सहभाग असला तरी कोल्हापूर जिल्हातील शिरोळ तालुक्यातील उमळवाड येथील स्वप्निल कल्लाप्पा कांबळे या तरूणाचाही खारीचा वाटा आहे.

स्वप्निल कांबळे इस्त्रोच्या श्र्री हरी कोटा येथे 2016 मध्ये कार्यरत आहेत.

स्वप्निल कांबळे इस्त्रोच्या श्र्री हरी कोटा येथे 2016 मध्ये कार्यरत आहेत. शिरोळमध्ये शालेय शिक्षण झालेल्या स्वप्निलला पहिल्यापासनच वेगळे काहीतरी करायचा ध्यास होताच. त्याला संधी मिळाली आणि तो श्र्री हरी कोटा येथील इस्त्रोच्या कार्यायलात रूजू झाला. गेल्या अनेक वर्षापासून या चांद्रयान मोहिमेची तयारी करण्यात येत होती.

चंद्रावर यान पाठवायचे असेल तर ते तीन टप्प्यात पाठवावे लागले.

याबाबत अधिक माहिती घेतली असता स्वप्निलने सांगितले की, चंद्रावर यान पाठवायचे असेल तर ते तीन टप्प्यात पाठवावे लागले. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर सुमारे 3 लाख 84 हजार किलोमीटर आहे. इस्त्रोचे भारतात आठ ठिकाणी केंद्र आहेत. त्याच्या पहिल्या टप्प्याची सुरूवात श्र्री हरि कोटा येथून सुरू होते. येथे साधारणता 2500 लोकांचा स्टाफ आहे. आज जे चंद्रावर यान पोहोचले आहे त्याचे वजन सुमारे 456 टन एवढे आहे.

सध्या चंद्रावर जे यान गेले आहे. त्यामध्ये सुमारे 400 टन सॉलिड वापरले गेले आहे.

यान पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर गेले तर गुरूत्वाकर्षनाचा मोठा अडथळा असतो. त्यामुळे यानाला जात इंधन लागते. हे इंधन सॉलिड रूपात असते. सध्या चंद्रावर जे यान गेले आहे. त्यामध्ये सुमारे 400 टन सॉलिड वापरले गेले आहे. दोनशे टनाचे दोन बुस्टर असून, दोन टप्प्यात हे यानापासून वेगळे होते. गुरूत्वाकर्षणाच्या बाहेर जाईपर्यंत हे इंधन वापरले जाते. गुरूत्वाकर्षणच्या बाहेर जाईपर्यंत यानाचे व्हायब्रेशन जास्त होत असते. त्यामुळे या ठिकाणी इंधन जास्त लागले. आणि हे इंधन सॉलिड रूपातच ठेवावे लागते. गुरूत्वाकर्षणच्या बाहेर जाईपर्यंत जेवढे इंधन लागते त्याचा अंदाज असतोच तेवढे इंधन संपेपयर्र्ंत यान गुरूत्वाकर्षणच्या बाहेर जाते. दुसर्‍या टप्प्याची सुरूवात लिक्विडने होते. ते काम केरळमध्ये गेले जाते. अंतिम टप्प्यातील काम बेंगलोरला केले जाते.

आमची मेहनत चांगली कामाला आली.

स्वप्निल पुढे म्हणाले, गेल्या अनेक दिवसाची आमची मेहनत चांगली कामाला आली. येथे आता सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. देशासाठी काहीतरी करता आले याचे मला अभिमान आहे.

 यानाच्या सुट्या भागांचे कोटिंग बनवले सांगलीतील कारखान्यात.

देशाला अभिमान वाटावा अशा ‘चंद्रयान अभियानात सांगलीच्या उद्योजकानेही हातभार लावला. यानाच्या सुट्या भागांचे कोटिंग सांगली औद्योगिक वसाहतीतील संदीप सोले यांनी केले आहे.. गेली तीस वर्षे केवळ संरक्षण आणि अंतराळ संशोधन केंद्रासाठी लागणारे सुटे भाग तयार करण्याचे काम सोले यांच्या कंपनीमध्ये होत आहे.

जीएसएलव्ही यानाचा एक भाग माधवनगरमध्ये असलेल्या सोले यांच्या डॅझलडायनाकोटस कंपनीमध्ये हे कोटिंग करण्यात आले.

श्रीहरीकोटा येथील केंद्रामधून भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रोच्या चांद्रयान-३ चे यशस्व प्रक्षेपण करण्यात आले. या यशस्वी कामगिरीबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांचे जगभरातून कौतुक करण्यात आले. या जीएसएलव्ही यानाचा एक भाग माधवनगरमध्ये असलेल्या सोले यांच्या डॅझल डायनाकोटस कंपनीमध्ये हे कोटिंग करण्यात आले.

आतापर्यच्या तीनही मोहिमा, मंगळ मोहीम यांच्या सुट्या भागांचे कोटिंगही त्यांनीच केले होते.

आतापर्यच्या तीनही मोहिमा, मंगळ मोहीम यांच्या सुट्या भागांचे कोटिंगही त्यांनीच केले होते. संदीप सोले व त्यांचे सुपुत्र निहार सोले यांनी कामगिरी पार पाडली. ‘चंद्रयान मोहिमेचे सुटे भाग तीन वर्षांपूर्वी कोटिंगसाठी त्यांच्याकडे आले होते. इस्त्रोने काढलेल्या टेंडरद्वारे त्यांना हे काम मिळाले. सांगलीकरांना अभिमान वाटावा अशी कामगिरी त्यांनी केली. यान अवकाशात सोडले जाते, तेव्हा त्यासाठी प्रचंड उर्जा निर्मिती केली जाते. जमिनीवर दाब देऊन यान आकाशात फेकले जाते. या प्रक्रियेत सोले यांची कोटींग केलेली उत्पादने वापरली जातात.

आजवर पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, ब्राह्मोस, आकाश आदी क्षेपणास्त्रांसाठीही त्यांनी कामे केली आहेत. सध्या गगनयानमध्ये वापरण्यात येणार्‍या उपकरणाची निर्मिती सुरू आहे. यापुर्वी पीएसएलव्ही अंतराळ यानासाठीही याच ठिकाणी हा सुटा भाग तयार करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खासगीकरणाच्या धोरणानुसार अंतराळ संशोधनामध्येही खासगीकरण सुरू आहे. यानुसार एका खासगी कंपनीसाठीही उपकरण तयार करण्यात आला आहे. यामुळे अंतराळ यानाच्या उत्पादन खर्चातही कपात झाली असल्याचे सोले यांनी सांगितले

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज