rajkiyalive

सांगलीत स्पीडब्रेकरने घेतला उद्योगपतींचा बळी

बिरनाळे कॉलेज समोरील घटना : अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद.

जनप्रवास, सांगली 

शहरातील अनेक ठिकाणी वाहनांची गती नियंत्रणात आणण्यासाठी गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र, काहीठिकाणी हे गतिरोधक रात्रीचे दिसत नसल्याने अपघात होत आहे. अशाच एका स्पीडब्रेकरने सांगलीतील उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते विजय रामाप्पा मगदूम (वय ५५ रा. कॉलेज कॉर्नर, सांगली) यांचा बळी घेतला.

मगदूम हे बिरनाळे कॉलेज समोरून त्यांच्या दुचाकीवरून निघाले असता स्पीडब्रेकर वरून गाडी जोरात आदळली आणि त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले. त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सदरचा अपघात हा शनिवारी दि. १४ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघाताची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, विजय मगदूम यांचे मूळ गाव हे वाळवा असून सध्या त्यांच्या पत्नीसोबत कॉलेज कॉर्नर परिसरातील विपुल प्लाझा या अपार्टमेंट मध्ये राहत होते. त्यांच्या व्यवसाय असून ते एकता गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष होते. शनिवार दि. १४ ऑक्टोबर रोजी रात्री त्यांच्या ऍक्सेस मोपेड दुचाकी (क्र. एमएच १० एझेड ८५८२) वरून बापट मळा परिसरात कामानिमित्त गेले होते.

रात्री पाऊणे बारा वाजण्याच्या सुमारास ते दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी बापट मळ्यातील बिरनाळे कॉलेज समोर असणारा गतिरोधक दुचाकी वेगात असल्याने त्यांना दिसला नाही. भरधाव वेगात असलेली गाडी गतिरोधकवरून जोरात पुढे गेली. यावेळी मगदूम यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि ते रस्त्यावर जोरात आपटले. यावेळी त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. अपघातानंतर स्थानिक तरुणांनी मदतीसाठी धाव घेतली.

गंभीर जखमी झालेल्या मगदूम यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र, डॉक्टरांनी यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघाताची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून शासकीय रुग्णालयात मगदूम यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. दरम्यान, या अपघाताची भीषण दृशे परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत.

हेही वाचा

दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न

इन्शुरन्सचे पैसे मिळवण्यासाठी स्वतःच्याच दुकानात केला चोरीचा बनाव

आंध्रप्रदेशात गलाई व्यावसायिकाच्या घाटात दरोडा टाकणारे तिघे जेरबंद

संजयनगर मधील खुनी हल्लातील जखमीचा मृत्यू

बंडगरवाडी तलावात बुडून बाप लेकाचा मृत्यू

मालवाहतूक टेम्पो, एसटीचा भीषण अपघात :

गुंड सचिन डोंगरेसह अकरा जणांचा पुन्हा ताबा :

संजयनगरला खुनी हल्ला प्रकरणी सराईत गुन्हेगारासह दोघे अटकेत ;

अखेर सातव्या दिवशी कवठे महांकाळ खुनातील मृतदेह सापडला

दारूला पैशासाठी तगादा लावल्यानेच तरुणाचा खून

संजयनगर मध्ये डोक्यात गॅस स्टोव्ह घालून तरूणाचा निर्घृण खून

कृषी सेवा केंद्र चालकाला धमकी देत खंडणी मागणाऱ्या टोळीवर गुन्हा दाखल

महापालिका क्षेत्रातील सर्व स्पीडब्रेकरचे ऑडिट करा : सतीश साखळकर.

सांगली महानगरपालिका क्षेत्रातील सदोष स्पीड ब्रेकर मुळे कित्येक जणांचे बळी गेलेले आहेत. सदर व्हिडिओ मध्ये स्पीड ब्रेकर मुळे गाडी वरून पडुन मृत्यू झाला असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) रवींद्र कुमार सिंगल हे सध्या सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी या बाबतीत पाहणी करून उपाययोजना कराव्यात आणि या बाबतीत दोषी असणाऱ्यावर कार्यवाही करावी. संबधीत यंत्रणेवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर महापालिका क्षेत्रात असणारे स्पीडब्रेकर हे नियमानुसार आहे का याचे ऑडिट करण्यात यावे अशी मागणी नागरी जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज