प. पू. श्री १०८ शांतिसागरजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या समडोळी नगरीत सन १९२४ साली आचार्यश्री शांतिसागरजी महाराज यांचा भव्य चातुर्मास संपन्न झाला. या चातुर्मासामध्ये आचार्यश्रीच्या कार्याचे दिव्यावधान म्हणून अश्विन शुक्ल एकादशी दि ८ ऑक्टोबर
१९२४ रोजी फलटण, बारामती, समडोळीसह सर्व श्रावकांनी प.पू प्रथमाचार्य श्री १०८ शांतिसागरजी महाराजांना आचार्य ही पदवी प्रदान केली आणि श्री १००८ भगवान शांतिनाथ दिगंबर जिन मंदिर मधील मुलनायक मुर्तीची प्राण प्रतिष्ठा श्री १०८ शांतिसागरजी महाराज यांच्या पावन सानिध्यात झाले. या दुहेरी शताब्दी वर्षाची सुरवात विविध कार्यक्रमाने होणार आहे.
दि. १५ ते २१ फेब्रु. २०२४ रोजी होणाऱ्या इंद्रध्वज आराधना महामहोत्सव यजमानपद सवाल दि.२२ आॅक्टोंबर २३ रोजी होणार असून
सकाळी सहा वाजता मंगल निनाद, पंचामृत अभिषेक,ध्वजारोहण, गणधर वलय विधान व दुपारी यजमान पद सवाल होणार आहेत. तसेच दि.२४ रोजी विजया दशमी (दसरा) यादिवशी पहाटे सनई चौघडा, पंचामृत अभिषेक, ध्वजारोहण, शांतिज्योत आगमन व सवाद्य मिरवणूक आणि दुपारी आचार्य श्री १०८ जिनसेनजी महाराज संसंघ मंगल प्रवचन व संध्याकाळी लक्ष दीपोत्सव होणार आहे. यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब पाटील (दादा), केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब पाटील, सन्मती सेवा दलाचे संस्थापक मिहीरभाई गांधी उपस्थित राहणार आहेत.
तसेच दि १ नोव्हेंबर २०२३ रोजी समस्त भारतातील विविध जैन संस्थान मठाचे स्वतिश्री भट्टारक महास्वामी यांचे उपस्थिती मध्ये भट्टारक संगोष्टी हा कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर कमिटीचे अध्यक्ष अशोक मगदूम, महावीर चहाण, वैभव पाटील, आदिनाथ पाटील, शामू खोत, श्रीपाल देसाई, जिन्नापा चव्हाण, कुमार चव्हाण, संजय बेले, सुभाष मगदूम, प्रकाश मुरके, बटू ढंग, सुदर्शन खोत, सुधीर ऐतवडे, चंद्रकांत पाटील, शितल बेले यांनी केले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



