rajkiyalive

समडोळीत 1 नोव्हेंबर रोजी भव्य भट्टारक महास्वामीजी संगोष्ठी महामहोत्सव

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056

विसाव्या शतकातील प्रथमाचार्य 108 शांतीसागरजी महाराज यांचे आचार्य शताब्दी महोत्सव आणि समडोळी येथील श्र्री 1008 भ. शांतीनाथ दिगंबर जिनमंदिर निर्माण च्या शतकमहोत्सव वर्षानिमित्त येथे 1 नोव्हेंबर रोजी भव्य भटृारक महास्वामीजी संगोष्ठी महामहोत्सवाचे आयोजन केल्याची माहिती मंदिरच्या ट्रस्टीनी दिली.

प्रथमाचार्य 108 शांतीसागरजी महाराज यांचे आचार्य शताब्दी महोत्सव आणि समडोळी येथील श्र्री 1008 भ. शांतीनाथ दिगंबर जिनमंदिर निर्माण च्या शतकमहोत्सव वर्षानिमित्त समडोळीत वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. 22 ऑक्टोंबर रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे याची सुरूवात झाली. दसर्‍या दिवशी भव्य आणि दिव्य लक्ष दीपोत्सव सोहळाही साजरा झाला आता 1 नोव्हेंबर रोजी येथील गंजीखान्याजवळील गुरव मळ्यात भव्य भट्टारक महास्वामिजी संगोष्ठी महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्तम्ह पट्टाधीश प. पू. 108 आचार्य श्र्री अनेकांतसागरजी महाराज यांच्या प्रेरणेने, प. पू. आचार्य श्र्री 108 धर्मसेनजी महाराज यांच्या आशीवार्दाने आणि प. पू. आचार्य श्र्री 108 जिनसेनजी महाराज आणि प. पू. 108 श्र्री संयमसागरजी महाराज यांच्या उपस्थितीती हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी मांडव घालण्याची जोरदार तयारी सुरू आहे. दि. 1 रोजी सकाळी सात वाजता समडोळी नगरीत मंगल प्रवेश सवाद्य रथ मिरवणूक, सकाळी आठ वाजता अभिषेक पूजा, सकाळी 9 वाजता आहारचर्या, दुपारी 12 वाजता भट्टारक संगोष्ठी संमेलन होणार आहे.

या कार्यक्रमासाठी स्वस्तिश्र्री जिनसेनजी भट्टारक पट्टाचार्य महास्वामी, नांदणी, स्वस्तिश्र्री ललितकिर्ती भट्टारकजी, कारकर, स्वस्तिश्र्री भुवनकिर्ती भट्टारकजी कनकगिरी, स्वस्तिश्र्री धवलकिर्ती भट्टारकजी अरहंतगिरी, स्वस्तिश्र्री भानुकिर्ती भट्टारकजी मुडबिद्री, स्वतिश्र्री लक्ष्मीसेन भट्टारकजी जिनकंची, स्वस्तिश्र्री धर्मसेन भट्टारकजी वरूर, स्वस्तिश्र्री देवेंद्रकिर्ती भट्टारकजी हुमचा, स्वस्तिश्र्री अकलंक भट्टारकजी सौधा, स्वस्तिश्र्री लक्ष्मीसेन भट्टारकजी ज्वालामालिनी, स्वस्तिश्र्री सौरभसेन भट्टारकजी तिजारा, स्वस्तिश्र्री सिध्दांतकीर्ती भट्टारकजी आरतीपूजा, स्वस्तिश्र्री लक्ष्मीसेन भट्टारकजी कोल्हापूर, स्वस्तिश्र्री चारुकिर्ती भट्टारकजी श्र्रवणबेळगोळ, स्वस्तिश्र्री रविंद्रकिर्तीजी पीठाधीश हस्तीनापूर आदी भट्टारक उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच या कार्यक्रमासाठी धर्मस्थळचे वीरेंद्रजी हेगडे, दक्षिण भारत जैन सभेचे रावसाहेब पाटील, प्रा. डी. ए. पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. समस्थ जैन समाजाने याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

समडोळीत उसळला भाविकांचा महापूर
समडोळीतील कमान ठरत आहे लक्ष्यवेधी
समडोळीत यजमानपदाचा मान माणिक खोत यांना
समडोळीत जैन समाजाने घालून दिला आदर्श

समडोळीत शांतीसागर गुंफा शिलान्यासची भव्य मिरवणूक

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज