rajkiyalive

केवळ वचननामा नाही, आमची जबाबदारी

dineshkumar aitawade 9850652056

नांद्रे ग्रामविकासपॅनेलने येणार्‍या काळात गावात करावयाच्या विकासाकामांचा वचननामा प्रसिध्द केला आहे. हा केवळ वचननामा नसून, ती आमची गावच्या प्रती जबाबदारी असल्याचे मत पॅनेलप्रमुख एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट, अमित पाटील व महावीर भोरे यांनी व्यक्त केले.
गावात विकासकामे करणे ही आमचे कर्तव्यच आहे. पूर्वी सत्ता असतानाही आम्ही गावच्या विकासकामासाठी कोणतेही राजकारण आडवे न आणता कामे केली आहेत. आमचे उमेदवार उच्च शिक्षित असून, गावात विकासकामे करताना कोणतेही घाणेरडे राजकारण करणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

 

नांद्रे गामविकास पॅनेलचा वचननामा

सरपंचपदाचे मानधन गावासाठी खर्च करणार : सौ. पूजा भोरे
शासनाकडून सरपंचांना महिन्याला मानधन मिळते. ते मानधन मी स्वत: खर्च न करता गावासाठी करणार असल्याचे सरपंचपदाचे उमेदवार सौ. पूजा महावीर भोरे यांनी यावेळी सांगितले.

 

1) प्राथमिक आरोग्य केंद्राचा विस्तार करून 50 बेडचे हॉस्पिटल करण्यासाठी पाठपुरावा करणार.
2) विस्तारीत प्रभागातील सकळे प्लॉट, हरोले प्लॉट, पाचोरे प्लॉट, उपाध्ये प्लॉट मधील सर्व गुंठेवारी प्लॉट धारकांचे 7/12 सदरी मालकी हक्कासाठी नाव नोंद होणेकामी शासकीय नियमानुसार शासन दरबारी प्रयत्न करणार.
2) सांडपाण्याचे शुद्धीकरण करुन योग्य पध्दतीने वापर करणार.

3) विस्तारीत भागातील बंदीस्त गटारींचा सर्व्हे झाला असुन त्याचे प्रत्यक्ष काम करुन पाणी बाहेर काढून सांडपाण्याचा प्रश्न मिटवणार.
4) गावातील तसेच विस्तारीत भागातील सर्व रस्त्यांचे डांबरीकरण करून घेणार.
5) जलजीवन मिशन योजनेअंर्तगत जुन्या टाकीच्या जागी नवीन 7 लाख लीटर क्षमतेची टाकी उभारुन,
तसेच नदीपासून नवीन पाईप लाईन टाकून उच्चप्रतीच्या शुध्दीकरणासह गावासाठी भरपूर पाणी देण्याची व्यवस्था करणार.

6) सर्व शिक्षा अभियान अंर्तगत प्राथमिक शाळेचा दर्जा सुधारून अत्याधुनिक मॉडेल स्कूल तयार करणार.
7) माझी वसुंधरा योजनेअंर्तगत मिळालेल्या बक्षिस रकमेतील शिल्लक राहीलेल्या रकमेमधुन नळपाणी पुरवठ्यासाठी सोलर सिस्टीम कार्यान्वीत करून ग्रामपंचायतीच्या 1.25 लाख रु. लाईट बिलाची बचत करून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न करणार.
8) गावातील सर्व अंगणवाड्याना सर्व सोयी उपलब्ध करून महिला व बाल कल्याण विकास योजनेअंर्तगत
त्यांचे आधुनिकीकरण करणे.

9) कचर्‍यापासून सेंद्रीय खतनिर्मिती उद्योगांना चालना देणेसाठी प्रयत्न करणार व कचरा विल्हेवाट करून डास निर्मुलनासाठी ठोस उपाय योजना करणार.

10) शेतीकडे जाणार्‍या सर्व पाणंद रस्त्यांच्या नोंदी घेणे तसेच त्या रस्त्यांचे रो.ह. योजनेअंर्तगत मुरुमीकरण करणार.

11) वृक्षारोपण करून स्वच्छ नांद्रे… सुंदर नांद्रे… हरित नांद्रे करणार.
12) नैसर्गिक आपत्तीसाठी कार्यक्षम यंत्रणा उभी करणार.

13) साथींच्या रोगांसाठी आशा वर्कर्सना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना सेवेसाठी सक्षम करणार.
14) सामजिक न्याय व समाज कल्याण विभागामार्फत दलितवस्तीत सुधारणा करणार.
15) फकीरवाडी (तक्का), नावरसवाडीसाठी होणार्‍या अपुर्‍या पाणी पुरवठ्यात सत्वर सुधारणा करून
भरपूर पाणी पुरवठा करणार.
16) महिलांच्या सक्षिमीकरणासाठी गृहउद्योग व लघुउद्योग सुरु करणेसाठी प्रयत्न करणार.
17) ग्रामपंचायतच्या मालकीच्या खुल्या जागेवरती नवीन व्यापारी संकुल तसेच भाजी मार्केट उभारणी करणार. 18) ग्रामपंचायतच्या मालकीजागेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क व ऑक्सिजन पार्क उभारणार.19) युवकांसाठी खुली जिम व व्यायामशाळेची आधुनिकीकरण करणार.
20) आमदार व खासदार फंडातून तसेच शासकिय योजनांचा पाठपूरावा करून नांद्रेचा सर्वागिण विकास करणार. 21) ग्रामपंचायत हद्दीतील क्षारपड जमिन निर्मूलन करणेबाबत शासनाकडे प्रयत्न करणार.
22) सांगली, नांद्रे ते पाचवा मैल या रस्त्याचे चौपदरीकरणेसाठी व तरुणांसाठी औद्योगिक धोरण आखणेसाठी प्रयत्न करणार.

आम्ही सदैव तुमच्या सोबती…

एन. एस. पाटील, राजगोंडा पाटील गुमट, अमित पाटील व महावीर भोरे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज