rajkiyalive

समडोळीतील शांतीनाथ मंदिराचे उद्या शंभराव्या वर्षात पदार्पण

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056

मिरज तालुक्यातील समडोळी येथील श्र्री 1008 भ. शांतीनाथ जिनमंदिर शनिवार 25 रोजी शंभराव्या वर्षात पर्दापण करीत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर कमिटीच्या ट्रस्टीनी दिली.

 

 

समडोळी येथे जैन समाजाचे तीन मंदिरे आहेत. जुने समडोळी येथे भ. आदीनाथ मंदिर असून, गावामध्ये शांतीनाथ मंदिर आणि भ. महावीर जिन मंदिर अशी दोन मंदिर आहेत. जुन्या गावात पुराचे पाणी येत असल्यामुळे तेथील गाव उठले व सुमारे 200 वर्षापुर्वी सध्याच्या समडोळीमध्ये स्थायिक झाले. समडोळीमध्ये आल्यानंतर येथे दोन मंदिरांची निर्मिती करण्यात आली.

विसाव्या शतकातील प्रथमाचार्य शांतीसागरजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या समडोळी नगरीत आचार्यश्र्रींचे 2 वेळा चातुर्मास झाला आहे. 1924 च्या दसर्‍याच्या दिवशी शांतीसागर महाराज यांना आचार्य ही पदवी देण्यात आली होती.

 

 

शांतीसागर महाराज यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशीर्वादाने भ. शांतीनाथ मंदिराची निर्मिती करण्यात आली. त्याला शनिवारी 99 वर्षे पूर्ण होवून शंभरावे वर्ष लाखत आहे. त्यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दसर्‍या दिवशी या शताब्दी महोत्सवास सुरूवा झाली. दसर्‍यादिवशी संपूर्ण गावामध्ये लक्षदीपोत्सव साजरा करण्यात आला. एक लाख दिव्यांनी संपूर्ण गाव उजळले होते. शांतीनाथ मंदिराच्या ट्रस्टीने यानिमित्त गावातील सर्व घरामध्ये, सर्व समाजामध्ये, सर्व मंदिरांमध्ये, सर्व मंडळांना पणत्यांचे वाटप केले आहे. त्याबरोबर वाती आणि तेलाचेही वाटप करण्यात आले होते.

 

श्र्री 1008 श्र्री शांतिनाथ दिगंबर जिन मंदिर, समडोळीच्या मंदिर निर्माण शताब्दी वर्षानिमित्त 15 फेब्रुवारीते 21 फेब्रुवारी 2024 अखेर आर्ष परंपरेनुसार श्र्री इंद्रध्वज आराधना महामहोत्सव संपन्न होणार आहे. त्यासाठीही विविध सवाल काढण्यात आले. येथील धर्मानुरागी माणिक आण्णा खोत आणि सौ. सुजाता माणिक खोत यांना यजमानपदाचा मान मिळाला आहे.

 

 

शनिवार 25 रोजी मूलनायक मूर्ती प्रतिष्ठापना होवून 99 वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिवशी सकाळी 6 वाजता एकूण 99 श्र्रावक भगवंतांना अभिषेक घालणार आहेत. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज