rajkiyalive

(sugar price )कोणाच्या सांगण्यावरून नव्हे, कायमच आमचा उसदर सर्वाधिक

: आ. जयंत पाटील

(sangli sugar prise) राजारामबापूच्या सर्वच युनिटनी कायमच सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न केला आहे. गत हंगामातही आम्ही सर्वाधिक 3106 रूपये प्रतिटन दिलेला आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दर आमचाच असतो, विश्वजित कदम यांनीही चांगला दर दिलेला आहे, त्यामुळे कोणी सांगितले म्हणून नव्हे तर शेतकर्‍यांच्या हितासाठी कायमचे आमचे एक पाउल पुढे असते असते, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी केले.

जिल्ह्यात सुरू असलेल्या उस दर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. माजी मंत्री पाटील म्हणाले, प्रत्येक कारखान्याची एफआरपी वेगवेगळी असते. हंगाम संपल्याशिवाय एकआरपी काढता येत नाही. त्यामुळे येणार्‍या उसाला किती दर द्यायचा हे जाहीर करता येत नाही. तरीही मागच्या हंगामातील एफआरपी एवढा दर देणे साखर आयोगाने बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात प्रत्येक वेळी आमचे एफआरपी जास्त असते. शेतकरी आमच्या कारखान्याला उस घालणे पसंत करतात.

चांगल्या प्रतीचा उस आमच्या सर्वच युनिटला येतो. त्यामुळे आमचे एफआरपी कायमच जास्त असते. त्याप्रमाणे आम्ही दर देतच आलो आहोत. कुणी सांगितले आणि आम्ही दर दिला, असे कधीच झाले नाही. कारखाना स्थापनेपासून शेतकर्‍यांच्या हिताचेच निर्णय कायम घेतले जातात, असेही ते म्हणाले.

राजारामबापू साखर कारखान्याच्या गव्हाणीत थेट उड्या मारल्या

विश्वजित कदम आणि मोहनराव कदमा यांनीही सोनहिरा कारखाना चांगला चालविला आहे, त्यांनीही उसाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न केलाच आहे, त्यांचेही कौतुक करावे लागेल.

जयंत पाटील पुढे म्हणाले, सरकारने साखरेपासून इथेनॉल निर्मितीसाठी बंदी घातली आहे. या अगोदर बर्‍याच कारखान्यांनी इथेनॉल युनिटसाठी कोट्यवधी रूपये गुंतवले आहेत, काही कारखान्यांनी कर्ज काढून इथेनॉल निर्मिती करीत आहेत. त्याचा सर्वात मोठा आता बसणार आहे. या गोष्टीचाही दरावर परिणाम होणार आहे.

JAYANT PATIL -काय म्हणाले जयंत पाटील?

येणार्‍या काळात साखरेचे दर किती असतील, कारखान्यात उसाचे गाळप किती होईल, हंगाम कसे होईल काहीही सांगता येत नाही. त्यामुळे पुढील दर कोणत्याच कारखान्याला जाहीर करता येत नाही. याचाही सवार्र्ंनी विचार करायला हवा.
परंतु काहीही झाले तरी शेतकरी आणि शेतकर्‍यांचे हित या गोष्टीला आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्वाधिक दर देण्याची परंपरा राजारामबापू खंडीत करणार नाही, असेही जयंत पाटील शेवटी म्हणाले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज