rajkiyalive

(sangli) लोकसभेपुर्वीच विधानसभेची रणधुमाळी

(vidhansabha )जनसुराज्य पार्टी मिरज, जतचा दावा ठोकण्याची शक्यता

अनिल काळे

∫जयंतराव पाटील यांचे वर्चस्व,  आ. डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली वाढत असलेली काँग्रेस, अनिलभाऊ बाबर यांच्या रूपाने शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) यांच्या रूपाने असलेला आमदार, भाजपला बहुमत मिळवून देण्याचा पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांचा प्रयत्न लिंगायत समाजाच्या जोरावर समित कदम यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ∫

 

 

राजकीय समिकरणेच बदलण्याची शक्यता

येत्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर येणार्‍या विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील राजकीय समिकरणेच बदलण्याची शक्यता आहे. आतापर्यंत सत्तेपासून दूर असलेला लिंगायत समाजही रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. लिंगायत समाजाते नेते आ. विनय कोरे ( सावकार) यांनीदेखील आपली नजर सांगली जिल्ह्याकडे वळविलेली आहे. जनसुराज्य युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी लिंगायत संघटित करण्याच्या दृष्टिकोनातून पाऊल टाकले आहे.

जिल्ह्यात जवळपास 4 लाखांहून अधिक लिंगायत समाजाचे नागरिक आहेत.

ही मते ज्यांच्या पदरात पडतील त्यांचा विजय निश्चित आहे, आणि लोकसभा निवडणुकीत लिंगायत समाजाचा निश्चितच विचार केला जाण्याची शक्यता आहे. आणि लोकसभेनंतर त्यामुळेच लिंगायत समाज मिरज आणि जत विधानसभा मतदारसंघांसाठी महायुतीत आग्रही राहण्याची शक्यता आहे.

छत्तीसगड, राजस्थान, मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव करून भाजपने बाजी मारल्यानंतर देशभरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये जरी बळ संचारले असले तरी महाविकास आघाडीचा बालेकिल्ला समजल्या जाणार्‍या सांगली जिल्ह्यातील राजकारणाला वेग आला आहे, जिल्ह्यात राष्ट्रवादीचे तीन आणि काँग्रेसचे दोन असे आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघात 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पाच आमदार निवडून आले,

http://rajkiyalive.com/sadabhau-suresh-…kanagle-loksabha/ ‎

तर 2014 मध्ये चार जागा जिंकलेल्या भाजपचे बळ दोनवर घसरले. लोकसभेची तारिख अद्याप निश्चित झालेली नसतानाच विधानसभा निवडणुकांच्या हालचालींना आतापासूनच वेग आलेला आहे.लोकसभा निवडणूक आता उंबरठ्यावर आली आहे. भाजप खासदार संजयकाका पाटील यांना भाजप अंतर्गतच असलेला विरोध पाहता आणि त्यांची विकासासाठी व पक्षवृध्दीसाठी त्यांनी केलेल्या कामाचा पक्षश्रेष्ठी लोकसभेसाठी उमेदवाराची निवड करताना निश्चितच विचार करणार आहेत.

राजकीय नेते विधानसभा निवडणुकीच्या चक्रव्यूहात

लोकसभेची निवडणूक जवळ आली असली तरी जिल्ह्यातील राजकीय नेते विधानसभा निवडणुकीच्या चक्रव्यूहात अडकलेली आहेत. वाळवा विधानसभा मतदारसंघातून सातवेळा निवडून आलेले जयंतराव पाटील यावेळी मात्र राष्ट्रवादीकडून ( शरद पवार गट) निवडणूक रिंगणात उतरतील. 2019 व पुढील विधानसभा निवडणुकीदरम्यान शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचा कितपत परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार यावरच वाळवा विधानसभा मतदारसंघातील गणित आहे.

जयंतराव पाटील यांची संपूर्ण जिल्ह्यावरच चांगली पकड

पण सातत्याने जिल्ह्याचेच नव्हे तर संपूर्ण राज्याचे राजकारण करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांची संपूर्ण जिल्ह्यावरच चांगली पकड आहे. प्रदिर्घ काळ राजकारणाचा असलेला अनुभव आणि एकनिष्ठ सहकारी यांच्यामुळे ही पकड कायम ठेवण्याचा त्यांचा या विधानसभा निवडणुकीतदेखील प्रयत्न असेल.

निशिकांतदादा पाटलांसारखे एककाळचे जयंतराव पाटील यांचे कट्टर समर्थक आता त्यांच्यापासून दुरावले आहे. सर्व विरोधकांना वाळवा विधानसभा निवडणुकीत एकत्र आणण्याची जयंतरावांची रणनिती यावेळी कितपत कामाला येते हे देखील पाहावे लागेल.
शिराळा विधानसभा मतदारसंघात जयंतरावांचे कट्टर समर्थक मानसिंगभाऊ नाईक हे आमदार आहेत. त्याशिवाय तासगाव विधानसभा मतदारसंघात सुमनताई पाटील यांच्या विजयाने जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने विजयाची हॅट्ट्रिक साधली आहे.

2009 च्या विधानसभा निवडणुकीत मिरजेतील जातीय दंगलीचे लोण

2009 च्या विधानसभा निवडणुकीत मिरजेतील जातीय दंगलीचे लोण संपूर्ण राज्यात पसरले होते. अशा परिस्थितीत मिरज आरक्षित मतदारसंघातून सुरेशभाऊ खाडे यांनी निवडणूक लढविली. त्यावेळची राजकीय परिस्थिती विचित्र होती. तथापि जयंतरावांची मुत्सद्देगिरी त्यावेळी कामाला आली, आणि सुरेशभाऊ खाडे विजयी झाले.

त्यांनंतर 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुरेशभाऊ खाडे विजयी झाले आणि त्यांनी विजयाची हॅटट्रिक केली, पण 2014 च्या निवडणुकीत चार आमदार असलेली भाजप 2019 च्या निवडणुकीत दोनवर घसरली.

या तिन्ही निवडणुकांमध्ये मताधिक्य घसरत आले

मिरज विधानसभा मतदारसंघातील मताधिक्याचा विचार केला असताना 2009, 2014, 2019 या तिन्ही निवडणुकांमध्ये मताधिक्य घसरत आले, तर सांगली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुधीर गाडगीळ हे निसटत्या मतांनी विजयी झाले. त्यामुळेच तर आगामी निवडणुकांमध्ये भाजपची कस लागणार आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज