rajkiyalive

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल लवकरच पाडणार : पंधरा दिवसानंतर प्रशासनाला जाग
पर्यायी मार्गाने वाहतूक

जनप्रवास ।  सांगली 20 dec

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल लवकरच पाडणार

सांगली-मिरज रस्त्यावरील हनुमान मंदिर (मिरज) रेल्वेचा पूल धोकादायक झाला असल्याचा ट्रक्चरल रिपोर्ट रेल्वे विभागाला पंधरा दिवसांपूर्वी मिळाला आहे. त्यांनी या संदर्भात पर्यायी मार्गाने वाहतूक करावी, असे पत्र देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. प्रशासनाला तब्बल पंधरा दिवसांनी जाग आली आणि या पुलावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वगळविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लवकरच हा पूल पाडला जाणार आहे. यामुळे मात्र मिरज, सोलापूर, कर्नाटककडे जाणार्‍या वाहतुकीची प्रचंड कोेंडी निर्माण होणार आहे.

 

 

पुलाला सध्या 55 वर्षेहून अधिक काळ झाला आहे

सांगली व मिरज शहराला जोडण्यासाठी हनुमान मंदिर (मिरज) येथे रेल्वे पूल बांधण्यात आला. या पुलाला सध्या 55 वर्षेहून अधिक काळ झाला आहे. सध्या मिरज-पुणे रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम रेल्वे विभागाने हाती घेतले आहे. त्यामुळे छोटे पूल पाडून नव्याने नवीन पुल बांधण्याचे काम सुरू आहे. त्यानुसार सह्याद्रीनगरचा पुल नव्याने बांधला आहे. विश्रामबाग पूल तर नव्या आराखड्यानुसार तयार केला आहे.

चिंतामणीनगर पुलाचे काम देखील सध्या सुरू आहे.

चिंतामणीनगर पुलाचे काम देखील सध्या सुरू आहे. यासह अनेक पुलांमध्ये बदल केले आहेत. या रेल्वे मार्गावर असलेल्या प्रत्येक पुलाची पाहणी करण्यात येत आहे. नोव्हेंबर महिन्यात रेल्वे विभागाच्या काही अधिकार्‍यांनी नव्याने होत असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी मिरज-सांगली मार्गावरील हनुमान मंदिराजवळ असलेल्या पुलाची पाहणी केली.

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल लवकरच पाडणार

पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना

पुलाची डागडुजी करण्यात आल्याचे लक्षात आले. हा पूल रेल्वे प्रशासनाने 55 वर्षांपूर्वी बांधला असल्याचे लक्षात आल्यानंतर अधिकार्‍यांनी या पुलाचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना दिला. त्याचा रिपोर्ट पंधरा दिवसांपूर्वी रेल्वे विभागाला पात्र झाला आहे. हा पूल धोकादायक झाला असल्याने तातडीने या पुलावरील अवजड वाहतूक थांबवावी, अशा सूचना मिळाला. रेल्वे विभागाने हे गांभीर्याने घेऊन त्यांनी तातडीने जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला या संदर्भात पत्र देखील दिले. या पुलावरील वाहतूक तातडीने बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करावी, असे पत्रात नमूद केले. शिवाय हा पुल रेल्वे विभागाच्यावतीने करण्यात येईल, असे देखील स्पष्ट केले होते. मात्र बांधकाम विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले नाही.

धोकादायक पुलावरील वाहतूक बंद करावी, अशी मागणी

मदनभाऊ पाटील युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी देखील सावित्री नदीवरील पुलाची जशी घटना घडली तशी घटना सांगलीत घडू नये, तातडीने धोकादायक पुलावरील वाहतूक बंद करावी, अशी मागणी केली होती. तसे निवेदन पालकमंत्री व जिल्हाधिकार्‍यांना दिले होते. मंगळवारी या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक देखील पार पडली. मात्र या बैठकीला पंधरा दिवस विलंब झाला आहे. या पुलावरील वाहतूक आता बंद करण्यात येणार आहे. त्याला पर्यायी मार्ग देखील शोधले जाणार आहेत. काही पर्यायी मार्गाचा विचार देखील करण्यात आला आहे. हा पूल पाडल्यानंतर मात्र मिरज, कर्नाटक, सोलापूरकडे जाणार्‍या वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होणार आहे.

पुलाला पर्यायी मार्ग असे….

* सांगलीहून सोलापूर जाणे-येणेसाठी:- विश्रामबाग- वसंतदादा सूतगिरणी- कुपवाड एमआयडीसी, कळंबीमार्गे पंढरपूर हायवे
* सांगलीहून कर्नाटकला जाणे-येणेसाठी:- गेस्ट हाऊस चौक- इनामधामणी- पंढरपूर हायवेमार्गे शास्त्री चौक (मिरज) मार्गे कर्नाटक
* सांगलीहून मिरजेला जाणे-येणेसाठी: विजयनगर चौक- हॉटेल पालवी- शनिमंदिरमार्गे मिरज (दुचाकी-चारचाकी)
* सांगलीहून मिरजेला जाणे-येणेसाठी: राजमती भवनरोड- इनामधामणी- पंढरपूर हायवेमार्गे मिरज शास्त्री चौक (अवघड वाहतूक)

रस्ता बांधकाम विभागाचा तर पूल रेल्वे विभागाचा…
सांगली-मिरज रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत आहे. तर या पूल रेल्वे विभागाचा आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. पण पुलाचे रूंदीकरण झाले नाही. आता पूल धोकादायक झाला आहे. मग पूल पाडून नव्याने कोण उभा करणार? हा प्रश्न पुढे आला होता. मात्र याची जबाबदारी रेल्वे विभागाने घेतली असल्याचे कळते. रेल्वे विभागाच्यावतीने या पूल नव्याने बांधण्यात येणार आहे. मात्र वाहतूक तातडीने पर्यायी मार्गाने वळवावी, अशी मागणी रेल्वे विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

read more

: http://rajkiyalive.com/sangli-jilhyat-1…sanjaykaka-patil/

सांगली-मिरज रोडवरील रेल्वे पूल बंदचा निर्णय नाही

सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय घेतला नसल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी स्पष्ट केले आहे. जड वाहतुकीसाठी पूल अयोग्य असल्याबाबतचा अहवाल रेल्वे विभागाने दिला आहे, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सर्वेक्षण करुन अहवाल मागविला असल्याचेही त्यांनी सांगितले. .

ये्थील जिल्हाधिकारी कार्यालयात कृपामाईजवळील रेल्वे पुलाबाबत जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मंगळवारी पार पडली. कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्याबाबत रेल्वेचे अधिकारी यांच्या स्ट्रक्चरल रिपोर्टवर रेल्वे, महानगरपालिका, वाहतूक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासमवेत प्राथमिक बैठक घेण्यात आली.

बांधकाम विभागाकडून सर्वेक्षण करणार : जिल्हाधिकारी

कृपामाईजवळील रेल्वे पुलाचे काम अनेक वर्षापासून झालेले नाही. त्यामुळे जड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल रेल्वे विभागाने दिला आहे. परंतु रेल्वे पुलावरील वाहतुक तात्काळ बंद करण्याबाबत प्रशासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे रेल्वे पुलावरील वाहतुक नियमित सुरु राहिल. दरम्यान रेल्वेच्या सक्षम प्राधिकारी यांच्या स्वाक्षरीचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागास सादर करण्याच्या सूचना रेल्वे अधिकार्‍याना देण्यात आल्या. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील सूचनावर अभ्यास व सर्वे करण्यात येईल. त्यानंतर यासंदर्भात पुन्हा बैठक घेण्यात येईल.

रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्याची गरज भासल्यास पर्यायी मार्ग सुचविण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच जड वाहतुकीसाठी पूल बंद करण्याची गरज भासल्यास नागरिकांची सुरक्षा व सुरळीत वाहतूक या दृष्टीकोनातून सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे डॉ. दयानिधी यांनी स्पष्ट केले.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज