rajkiyalive

(sangli )रेल्वे पुलासाठी दिल्लीत धडक मारु

सांगली-मिरज रोडवरील रेल्वे पुलासाठी दिल्लीत धडक मारु

आधी मंजुरी आणा, मग वाहतुक थांबवू – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे

जनप्रवास ।  सांगली 

सांगली-मिरज रोडवरील कृपामाई हॉस्पिटलजवळील रेल्वे पूल अवजड वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे रेल्वे प्रशासनाने पत्र दिले होते. परंतु हे चुकीचे आहे. यापूर्वी रेल्वे प्रशासनाने कळविणे आवश्यक होते. अचानक अवजड वाहतुक बंद करता येणार नाही. नवा पूल बांधायचा असेल तर सहापदरीचा आराखडा तयार करा, त्याला मंजुरी आणा आणि मग बैठकीला या,’ असे आदेश दिल्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी सांगितले. रेल्वे पुलाच्या प्रश्नांसाठी मंगळवारी रेल्वे राज्यमंत्र्यांशी चर्चा करु, तिथं तोडगा न निघाल्यास दिल्लीत धडक मारण्याचा इशाराही त्यांनी दिला.

सांगली-मिरज रोडवरील रेल्वे पुलासाठी दिल्लीत धडक मारु

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली-मिरज रोडवरील रेल्वे पुलासंदर्भात आयोजित बैठकीनंतर पालकमंत्री डॉ. खाडे बोलत होते. यावेळी खासदार संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, रेल्वेचे अधिकारी सरोजकुमार यांच्या उपस्थितीत बैठक झाली. रेल्वेचे विभागीय अभियंता विकास कुमार ऑनलाइन चर्चेत सहभागी झाले.

 

 

 

अवजड वाहतूक बंद करण्याचा प्रस्ताव

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, रेल्वे विभागाने मारुती मंदिराजवळील पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करून त्यावरून अवजड वाहतूक बंद करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सांगली, मिरज शहरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. दोन महत्त्वाच्या शहरांना आणि जिल्ह्याच्या दोन भागांना जोडणारा हा पूल आहे. त्यावरून अवजड वाहतूक दीर्घकाळ बंद करणे परवडणारे नाही. दुरुस्तीसाठी फार तर एक आठवडा अवजड वाहतूक बंद ठेवला जाईल. अवजड वाहतूक वळवण्यासाठी पर्यायी चांगले रस्ते नाहीत. असा निर्णय घेणे कठीण आहे.

सर्वोत्तम अभियंत्यांची मदत घ्या,

हा पूल दुरुस्त करा आणि तो इतका मजबूत करा की अवजड वाहतूक सुरू राहिली पाहिजे. त्यासाठी सर्वोत्तम अभियंत्यांची मदत घ्या, अशा सूचना आम्ही दिल्या आहेत. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी बैठकीतूनच चर्चा केली. रेल्वेचे अधिकारी हुकुमशाही पद्धतीने वागत आहेत. ते खपवून घेतले जाणार नाही. मंगळवारी पुन्हा रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याशी चर्चा करणार आहे. तेथे तोडगा न निघाल्यास दिल्लीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करुन मार्ग काढण्यात येईल.

खासदार संजयकाका पाटील म्हणाले, माधवनगर पुलामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. आम्ही ते सहन करतोय. आता रेल्वे पूल पाडल्यास लोक आम्हाला दगड मारतील. रेल्वे इंग्रजकालीन पद्धतीने काम करते आहे. इथे ते खपवून घेणार नसल्याचा इशाराही दिला.

रेल्वे अधिकार्‍यांची कानउघाडणी

रेल्वे अधिकार्‍यांनी जोरदार कानउघाडणी केली. हा पूल धोकादायक झाला असेल तर त्याची माहिती पाच वर्षे आधीच द्यायला हवी होती. एवढ्या काळात पूल पाडून नवा बांधला असता. ‘तुम्ही झोपला होता काय,’ असा सवाल त्यांनी केला. रेल्वे पुलाबाबत अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा केला आहे. त्याची जबाबदारी निश्चित करावी, अशा सूचना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी दिल्या.

सांगली-मिरज रस्त्यावरील पुलावरुन रेल्वे अधिकारी फैलावर

 

सहा पदरीकरणाचा आराखडा तयार करा – पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या सूचना सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामाई रुग्णालयाजवळील रेल्वे पूल हा 55 ते 60 वर्षांपूर्वी बांधलेला आहे. त्याचे आयुष्य साधारण ते 40 ते 50 वर्षांचे होते. त्यामुळे रेल्वे विभागाने 5 वर्षांपूर्वीच यावर विचार करणे आवश्यक होते. मात्र रेल्वे विभागाने अत्यंत विलंबाने कळविल्याची बाब गंभीर आहे. त्याबाबत रेल्वे अधिकार्‍यांवर जबाबदारी निश्चित करण्याच्या सूचना करीत पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी शनिवारी रेल्वेच्या अधिकार्‍यांना फैलावर घेतले. रेल्वे विभागाने सहापदरी मार्ग करण्याच्या दृष्टीने आवश्यक नियोजन व प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे आदेश दिले.

पालकमंत्री खाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल जड वाहतुकीसाठी बंद करण्यासंदर्भात पालकमंत्री खाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीस खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, सहाय्यक जिल्हाधिकारी अमित रंजन, रेल्वे विभागाचे सहाय्यक विभागीय अभियंता सरोजकुमार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, महानगरपालिका शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दूरदृष्य प्रणालीद्वारे रेल्वेचे विभागीय अभियंता विकासकुमार उपस्थित होते.

हेही आवर्जुून वाचा

http://rajkiyalive.com/sangli-jilhyat-1…sanjaykaka-patil/

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक

सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा

उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ

या पुलावरून आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक होत असते.

पालकमंत्री डॉ. खाडे म्हणाले, सांगली मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाजवळील रेल्वे पूल मार्ग हा मिरज व सांगली शहरांना महत्त्वाचा पूल व मुख्य मार्ग आहे. या पुलावरून आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक होत असते. सदर मार्गावरील वाहतूक वळविण्यासाठी कोणताही योग्य, सुरक्षित व सुव्यवस्थित, दोन्ही बाजूंनी जड वाहतूक करण्यायोग्य पर्यायी मार्ग नसल्याचे पोलीस व वाहतूक विभागाने कळविले आहे. त्यामुळे सदर पुलावरून हलकी व अवजड वाहतूक होण्याच्या दृष्टीने रेल्वे विभागाने प्राथम्याने कालमर्यादा निश्चित करून या पुलाची दुरूस्ती करावी. त्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

त्याचे आयुष्य साधारण ते 40 ते 50 वर्षांचे होते.

सदर पूल हा 55 ते 60 वर्षांपूर्वी बांधलेला आहे. त्याचे आयुष्य साधारण ते 40 ते 50 वर्षांचे होते. त्यामुळे रेल्वे विभागाने 5 ते 10 वर्षांपूर्वीच यावर विचार करणे आवश्यक होते. मात्र रेल्वे विभागाने अत्यंत विलंबाने कळविले असून, याबाबतची जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी यावेळी दिले. बैठकीतून भ्रमणध्वनीद्वारे या विषयाचे गांभीर्य केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांना कळविण्यात आले. या मार्गावर नवीन पूल करताना भविष्यातील 25 ते 30 वर्षांचा विचार करून सहा पदरी रस्त्याचे डिझाईन करावे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक

तसा प्रस्ताव व त्यासाठी लागणारे अंदाजपत्रक तयार करून वरिष्ठ कार्यालयास तातडीने पाठवावे. रस्ता दुरूस्ती व सहा पदरी रस्ता या दोन्हीबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येईल. गरज भासल्यास केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडेही सदर विषय मांडला जाईल, असे त्यांनी सांगितले.

गरज भासल्यास 4 ते 5 दिवस पर्यायी मार्गाने वाहतूक

पूल दुरूस्त करताना गरज भासल्यास 4 ते 5 दिवस पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येईल. मात्र, रेल्वे विभागाने त्यासंदर्भात किमान 15 दिवस आधी जिल्हा प्रशासनास पूर्वकल्पना द्यावी. तत्पूर्वी ज्या मार्गावरून वाहतूक वळवण्याचा पर्याय आहे, त्यांची दुरूस्ती व रूंदीकरण करून घेण्याचे त्यांनी यावेळी सूचित केले.

यापुढे अशा विषयांबाबत रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाशी आधी चर्चा करावी.

बैठकीत सूचविण्यात आल्याप्रमाणे पूल दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, महानगरपालिका, वाहतूक विभागाच्या स्थानिक अधिकार्‍यांकडून सर्वतोपरी मदत मिळेल. मात्र यापुढे अशा विषयांबाबत रेल्वे विभागाने जिल्हा प्रशासनाशी आधी चर्चा करावी. तसेच, प्रत्यक्ष स्थळभेट करून पूल दुरूस्तीची कार्यवाही आजपासूनच सुरू करावी, असे त्यांनी सूचित केले. वाहतूक वळविण्यापूर्वी किमान 15 दिवस आधी प्रशासनास कळवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

बैठकीतील चर्चा
– दोन दिवसांत तज्ज्ञांचे मत घेऊन राज्यमंत्री दानवे यांना भेटणार
– दुरुस्तीसाठी फार तर एक आठवडा अवजड वाहतूक बंद ठेवू
– नवा पूल बांधण्यासाठी आधी सहापदरीचा प्रस्ताव करा
– रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना पालकमंत्री, खासदार भेटणार
– रेल्वे पूल धोकादायक असताना ऐनवेळी सांगणार्‍या अधिकार्‍यावर जबाबदारी निश्चित होणार
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज