rajkiyalive

सरकारांना पराभूत करून शरद पाटील जायंट किलर

दिनेशकुमार ऐतवडे

(SHARAD PATIL )म्हैसाळचे सरकार मोहनराव शिंदे आणि प्रकाश जावडेकर यांचा पराभव करून जायंए किलर ठरले प्रा. शरद पाटील

 

(SHARAD PATIL )म्हैसाळचे सरकार मोहनराव शिंदे आणि प्रकाश जावडेकर यांचा पराभव करून जायंए किलर ठरले प्रा. शरद पाटील

जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांचे बुधवार 27 डिसेंबर रोजी निधन झाले. मिरज मतदार संघातून दोन वेळा निवडून आलेल्या शरद पाटील, सांगलीचे आमदार संभाजी पवार आणि आ. व्यंकाप्पा पत्की या त्रिकुटाने एकेकाळी काँग्रेसला सळोकी पळो करून सोडले होते.

जनता दलाचे तीन आमदार निवडून येतात येत कुणाला सांगून खरे पटत नव्हते.

वसंतदादांच्या सांगली जिल्ह्यात समाजवाद केवळ रूजविला नाही तर जनता दलाचे तीन आमदार निवडून येतात येत कुणाला सांगून खरे पटत नव्हते. परंतु संभाजी पवार, व्यंकाप्पा पत्की आणि प्रा. शरद पाटील यांनी तो पराक्रम करून दाखविला. या त्रिकुटापैकी शेवटचा तारा शरद पाटील यांच्या रूपाने निखळला आणि या तिघांच्या मैत्रीच्या आठवणीने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले.

सरकारांना पराभूत करून शरद पाटील जायंट किलर ठरले.

प्रा. शरद पाटील यांना घरातून समाजकारणाचा वारसा मिळाला होता. देशभक्त आर. पी. पाटील यांच्या पोटी जन्मलेल्या शरद पाटील यांनी सांगली कॉलेजमध्ये काही काळ प्राध्यापकी केली. राजकारणाची आवड असल्याने 1990 मध्ये त्यांनी मिरज मतदार संघातून पहिल्यांदा जनता दलातून उमेदवारी अर्ज भरला. समोर होतेे दिग्गज आणि सरंजामदार म्हैसाळचे सरकार मोहनराव शिंदे. परंतु सरकारांना पराभूत करून शरद पाटील जायंट किलर ठरले. शरद पाटील यांच्या विजयाने मोहनराव शिंदे यांची आमदारकीची हॅटट्रीक हुकली. शरद पाटील यांना 50014 मते मिळाली तर मोहनराव शिंदे यांना 44451 मते मिळाली. सहा हजार मताच्या फरकाने शरद पाटील विजयी झाले.

40 हजारच्या मताधिक्काने पराभव केला.

एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या सामान्य युवकाने सरकारांचा पराभव करतो याचे मोठे कौतुक राज्यभरात झाले होते. पुढे 1995 च्या निवडणुकीतही दुसर्‍यांदा शरद पाटील विजयी झाले. यावेळी समोर होत्या काँग्रेसच्या माणिकताई गायकवाड. मोहनराव शिंदे यांचे निधन झाल्याने काँग्रेसने माणिकताई गायकवाड यांना उमेदवारी दिली. परंतु यावेळी शरद पाटील यांना त्यांचा 40 हजारच्या मताधिक्काने पराभव केला.

(SHARAD PATIL )म्हैसाळचे सरकार मोहनराव शिंदे आणि प्रकाश जावडेकर यांचा पराभव करून जायंए किलर ठरले प्रा. शरद पाटील
दुसर्‍यांदा जायंट किलर ठरले.

1999 च्या निवडणुकीत मात्र एका वेगळ्याच लाटेत शरद पाटलांना पराभव पत्करावा लागला. परंतु पराभवाने शरद पाटील खचले नाहीत. पुन्हा जोमाने शरद पाटील कामाला लागले. मिरज मतदार संघ आता आपल्या हाताला लागणार नाही हे ओळखूनच त्यांनी पुणे पदवीधर मतदार संघाकडे आपला मोर्चा वळविला. पुणे पदवीधर मतदार संघ म्हणजे भाजपचा किल्ला. प्रकाश जावडेकर हे कायम या मतदार संघातून निवडून येत होते. परंतु शरद पाटील यांना त्यांचा पराभव करून दुसर्‍यांदा जायंट किलर ठरले. या पराभवाने प्रकाश जावडेकर कायमच राज्याच्या राजकारणातून बाहेर पडले. सध्या ते केंद्राच्या राजकारणात रममान आहे.

शरद पाटील यांनाही राजकारणात मोठमोठे ऑफर आल्या

आयुष्यमर गोरगरीब, हमाल, तोलाईदार, किरकोळ व्यापारी यांच्या मागे राहून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न शरद पाटील यांनी केला. शरद पाटील यांनाही राजकारणात मोठमोठे ऑफर आल्या होत्या. परंतु शरद पाटील आयुष्यभर तत्वनिष्ठ राहिले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा फार मोठा विश्वास शरद पाटील यांच्यावर होता. त्यांनी शरद पाटील यांच्यावर जनता दलाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही दिली होती.

पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला : ना. रामदास आठवले

जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीचा सच्चा साथी आणि पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत माजी आमदार प्रा.शरद पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

जनतेचा नेता हरपला: पालकमंत्री खाडे

प्रा. शरद पाटील यांनी जनता दलाचे अध्यक्षपद भूषवले. मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी समाजासाठी काम केले आहे. त्यांच्यासारखे नेते होणे नाही. समाजाला धरून त्यांचे काम असायचे. अनाथ आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी निराधार लोकांना आधार देण्याचे काम केले. शेतकर्‍यांना पेन्शन लागू करावी, असा त्यांचा अनेक वर्षांपासून मुद्दा होता. त्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. शासनस्तरावर आम्ही पाठपुरावा देखील केला होता. जनतेला न्याय देण्याचे प्रामाणिक काम प्रा. शरद पाटील यांनी आपल्या जीवनात केले आहे. त्यांच्या निधनाने थोर नेत्याची पोकळी जिल्ह्यात निर्माण झाली आहे. त्यांच्या आत्मास शांती लाभो, अशी प्रार्थना पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केली.

राजकीय आखाड्यातील पैलवान

मी चित्रपटात दरोडेखोर होतो पण मरणार नाही

सर्वसामान्यांचा आधारवड हरपला:

शांत, संयमी नेतृत्व हरपले: प्रतीक पाटील

माजी आमदार प्रा. शरद पाटील शांत, संयमी, निस्वार्थी, शंभर टक्के राजकारणाची जाण असणारे नेते होते. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माझे वडील स्व. प्रकाशबापू पाटील यांचे अत्यंत जवळचे मित्र, आम्हा वसंतदादा पाटील कुटुंबियांवर प्रेम करणारे, स्व. वसंतदादा पाटील ,स्व.विष्णूअण्णा पाटील, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व.मदनभाऊ पाटील यांचे निकटवर्तीय व सहकारी मी वसंतदादा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन व केंद्रीय मंत्री असताना मला ज्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले ज्याची आजही आठवण येथे अशा शब्दात माजी मंत्री प्रतिक पाटील यांनी प्रा. शरद पाटील यांना श्रध्दांजली वाहिली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज