rajkiyalive

(sangli ) सांगलीत ऊस दराची कोंडी फुटली

(sangli sugarcane ) एकरकमी 3175 चा निर्णय: बैठक यशस्वी

जनप्रवास । सांगली

गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या ऊस दराची कोंडी सोडविण्यात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना यश आले आहे. जिल्ह्यातील कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ऊसाला प्रती टन 3175 रूपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कारखानदार व शेतकरी संघटनेने मान्य केला. त्यामुळे ही बैठक यशस्वी ठरली आहे.

गेल्या दोन महिन्यापासून ऊस दरासंदर्भात सांगली जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर पॅटर्न राबवून ऊस दर द्यावा, अशी मागणी केली होती. मात्र कारखानदारांनी याकडे दुर्लक्ष केल्याने वाद वाढत गेला. बुधवारी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीला क्रांती साखर कारखान्याचे आमदार अरुण लाड, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, संदीप राजोबा, पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्यासह साखर कारखान्यांचे व्यवस्थापकीय संचालक, प्रतिनिधी उपस्थित होते. अडीच तास बैठक चालली.

 

 

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 16 डिसेंबरला झालेल्या बैठकीत साडेबारा टक्के साखर उतारा असलेल्या कारखान्यांनी पहिली उचल 3250 रुपये, 10 टक्केच्या पुढील कारखान्यांनी 3200 रुपये, तर दुष्काळी आणि आजारी कारखान्यांनी 3100 रुपये पहिली उचल द्यावी, असा प्रस्ताव दिला होता. माजी खासदार राजू शेट्टी त्यावर ठाम होते. कोल्हापूरप्रमाणे एफआरपी अधिक शंभर रुपयेचा मुद्दे मागे सोडून आजची चर्चा सुरु झाली. सरसकट कारखान्यांनी पहिली उचल 3175 रुपये एकरकमी देण्याचे मान्य केले.

 

 

 

जिल्हाधिकारी तृप्ती धोसमिसे म्हणाल्या, ऊस दराबाबत दोन्ही गटांनी सामंजस्य दाखवले. सात कारखान्यांच्या दराबाबत चर्चा झाली. कारखानदारांनी पहिली उचल एकरकमी 3175 रुपये देण्याचे मान्य केले आहे. राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे साखराळे, वाटेगाव आणि कारंदवाडी युनिट तसेच क्रांती, सोनहिरा, विश्वास, हुतात्मा साखर कारखान्यांच्या दरांबाबत हा तोडगा काढण्यात आला. शेतकरी संघटनेचे संजय बेले, भागवत जाधव, बाबा सांदरे, धन्यकुमार पाटील, रोहीत पाटील, संदीप पाटील, दीपक मगदूम आदींची उपस्थिती होती.

हेही वाचा

(raju shetti ) आंदोलन योग्य पण दिशा भरकटली…

..तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही. 

शिरोळमधून स्वाभिमानीच्या आक्रोश यात्रेस उत्साहात प्रारंभ

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

यंदा ऊस खाणार भाव, 3500 रुपये शक्य

पंधरा कारखान्यांकडे 600 कोटीची ऊसबिले थकित

ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न...

सांगलीत कोरोनाचे नव्याने तीन रूग्ण: चिंता वाढली

सांगली शहरात बुधवारी कोरोनाचे पुन्हा तीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. मनपा क्षेत्रातील रूग्णसंख्या ही सातवर पोहचली आहे. दरम्यान, या रूग्णांच्या संपर्कात आलेल्या संशियतांच्या आरटीपीसीआर चाचण्या आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत.

महापालिका क्षेत्रात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढले आहे. विश्रामबागमधील दाम्पत्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर मिरजेत दोन रूग्ण आढळून आले. त्यामुळे मनपा क्षेत्रातील रूग्णांची संख्या चारवर गेल्याने भिती निर्माण झाली होती. या रूग्णांच्या संपर्कातील असलेल्या संशियातांसह ताप, सर्दी, खोकल्याने बाधीत असलेल्या 84 लोकांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये 25 लोकांच्या अँटीजेन स्टेट निगेटिव्ह आल्या होत्या.

मात्र उर्वरित 59 रूग्णांचे रिपोर्ट बुधवारी प्राप्त झाले. त्यामध्ये सांगली शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या रूग्णांची प्रकृती गंभीर नाही. तरी देखील त्यांना वैद्यकीय अधिकार्‍यांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले आहे.

सर्वसामान्यांचा आधारवड हरपला:

दरम्यान, या रूग्णांच्या संपर्कातील संशियतांची तपासणी करण्यात येत आहे. सध्या मनपा क्षेत्रातील रूग्णसंख्या सातवर पोहचली आहे. नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करून सोशल डिस्टन्सिंग पाळावे. सॅनिटायझरचा वापर करावा. वेळोवेळी स्वच्छ साबणाने हात धुवावेत. सर्दी, खोकला, ताप असल्यास घरच्या घरी उपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावा, नागरिकांनी घाबरून जाऊ नये सतर्कता बाळगावी, असे आवाहन वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील यांनी केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज