rajkiyalive

100 व्या नाट्यसंमेलनाची सांगलीत मुहुर्तमेढ

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार ः सांगलीत शंभराव्या नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ

जनप्रवास ।  सांगली :

राज्यात महासांस्कृतिक वारसा चालविला जातो. मात्र नाट्यगृहाची अवस्था समाधारकारक नाही. 21 व्या शतकाला सामोरे जात असताना नाट्य कला क्षेत्रात आव्हाने आहेत. त्याचा विचार करावा लागत आहे. नाट्य क्षेत्राला उर्जितावस्था आणण्यासाठी राज्यात नव्याने 75 नाट्यगृह सोलर यंत्रणेवर उभारण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगलीत केली. शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नाट्य क्षेत्र जनतेच्या सिंहासनापर्यंत पोहोचविण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभाग पूर्ण शक्तीने उभे राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 

 

 

 

( SANGLI ) 100 व्या नाट्यसंमेलनाची सांगलीत मुहुर्तमेढ

येथील विष्णुदास भावे नाट्य मंदिरात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे 100 वे मराठी नाट्य संमेलनाची मुहूर्तमेढ राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याहस्ते 99 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, नियोजित 100 व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे, खासदार संजयकाका पाटील, नाट्य परिषदेचे अध्यक्ष व अभिनेते प्रशांत दामले, संमेलनाचे स्वागताध्यक्ष व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या उपस्थितीत झाले.

मंत्री मुनगंटीवार म्हणाले, नाट्य क्षेत्रातील दिशा सकारात्मक हवी, यासाठी 100 व्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने चिंतन आणि चर्चा व्हायला पाहिजे. प्रशांत दामले यांचे एकसारखे 12 हजार प्रयोग झाले, परंतु नाट्य पहायला येणार्‍यांची संख्या कमी होत आहे. परंतु जोपर्यंत दर्दी लोक आहेत, तोपर्यंत नाटकावर वाईट दिवस कधीच येवू शकत नाहीत. नाट्य या सर्वोत्कृष्ट कलेपुढे आव्हाने असून त्याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली. नाट्य कला जनतेच्या सिंहासनापर्यंत कायम चिकटवण्यासाठी राज्याचा सांस्कृतिक कार्य विभाग पूर्ण ताकदीने उभा राहिल. धावत्या युगात मनाची एकाग्रता गमावत चाललो आहे. मात्र 21 व्या युगात आव्हानावर मात करायची आहे. नाटकाव्दारे आनंद, सुख आणि विचार पोहोचविण्याची कला आहे. नाटक जपले तर महाराष्ट्राची उन्नती होईल.

 

 

 

राज्यात नव्याने 75 नाट्यगृह उभारण्यास सरकारने मंजुरी दिली आहे, परंतु नाट्यगृहाचे भाडे परवडत असल्याच्या तक्रारी आहेत. नवी नाट्यगृहे सोलर यंत्रणेवर चालवून अल्प दरात उपलब्ध करुन दिली जातील. राज्यात 86 नाट्यगृह आहेत. त्यापैकी 52 स्थानिक स्वराज्य संस्थाकडे आहेत. या परिस्थितीत अवघी 12 नाट्यगृह सुसज्य आहेत. नाट्यगृहाची दयनिय अवस्था दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नगरविकास विभागही सरसावला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास 350 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त राज्यातील 36 जिल्ह्यात जानता राजा हे नाटक दाखविण्याचे नियोजन केले असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री नाट्यवेडे – प्रशांत दामले

आमच्या पाठीमागे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्री आहेत. सर्व राजकारणी हे नाट्यवेडे आहेत, त्यामुळे नाट्य संमेलनास भरघोस मदत हात आखडता घेतला जात नसल्याचे नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सांगत नेत्यांची स्तुती केली. मागील 40 वर्षात इतक्या पद्धतीची नाट्यगृह पहिली आहेत. त्यांचा दुरुस्ती न झाल्याने ते अडगळीत पडले आहेत. जे बांधले आहेत. त्याचे पहिली दुरुस्ती करावी. लग्न करण सोपे आहे पण, निभावणं अवघड असते. नाट्य संमेलन करणे म्हणजे सोपे काम नाही. यासाठी खूप काम करावे लागते. एखादं लग्न समारंभ करणं सोप्प आहे मात्र, नाट्य संमेलन अवघड असल्याचं मला पहिल्यांदाच कळले.

 

 

 

संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईमध्ये मुले स्ट्रगल करण्यासाठी येतात. मात्र, त्यांची मुंबईत राहण्याची सोय नाही. रविंद्र नाट्यगृह पडल्यापासून राहण्याची सोय नाही. या मुलांची सहा महिने राहण्याची सोय करण्याचे प्रयोजन नाट्य परिषदेचे आहे. नाट्यगृहाचे भाडे कमी करण्याचा पर्याय सोलर यंत्रणा आहे. नाट्य संमेलनाला शासनाने मदत केली आहे. हा राजाश्रय मिळाल्यानंतर कलाकारांची सुद्धा मोठी जबाबदारी आहे. त्यांनी पैसे दिले म्हणून आपण उडवायचे नाही आणि ते मी होऊ देणार नसल्याचे अभिनेते दामले यांनी स्पष्ट केले.

नाट्य संमेलनास 10 लाख – सुरेश खाडे

सांगलीला नाट्य पांढरी, आरोग्य पांढरी आणि पुढार्‍यांची पांढरी म्हंटले जाते. टीव्ही च्या जमान्यात नाटकांची क्रेझ कमी झाली आहे. जुन्या काळात अतिशय चांगले नाटक व्हायचे. नाट्य संमेलनाला पुण्यातून निधी मिळाला पण ते अर्थ मंत्री आहेत आम्ही कामगार मंत्री आहे कोठे तरी सेटलमेंट व्हायला पाहिजे. म्हणून जिल्हा नियोजनमधून दहा लाखांचा निधी देत असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी जाहीर केले.

हेही आवर्जुून वाचा

http://rajkiyalive.com/sangli-jilhyat-1…sanjaykaka-patil/

सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक

सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा

मुहुर्तमेढ वेळ हुकली?

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचा मुहुर्तमेढ सोहळा सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमास राजकीय नेतेमंडळींची मांदियाळी असल्यामुळे निदान मुहुर्तमेढ सकाळी नियोजित वेळेत होणार का, असा प्रश्न नाट्यरसिकांच्या मनात डोकावला होता. स्वागताध्यक्षांसह सुधीर गाडगीळ सकाळी 10 वाजता कार्यक्रमस्थळी हजर होते. मात्र सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले विमान उशीरा आल्यामुळे दुपारी 1 वाजता हेलिपॅडवर उतरले. तेथून वीस मिनीटांनी त्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. साहजिकच मुहुर्तमेढची सकाळची वेळ हुकल्याने दुपारी दिडनंतर हा कार्यक्रम सुरु झाला.

 

 

स्वागताध्यक्ष आ. सुधीर गाडगीळ यांनी नाटकाची अलौकिक परंपरा सांगलीत जपली आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता नवीन नाट्यगृह बांधण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी योगदान दिल्याचे सांगितले. प्रास्तविक मुकुंद पटवर्धन यांनी करताना शंभराव्या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने नवी दिशा, विचार आणि नजर मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमास अभिनेते विजय गोखले, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलींद जोशी, भाऊसाहेब भोईर, अजित भुरे, सतिश लोटके, विजय चौगुले यांच्यासह नाट्य रसिक उपस्थित होते.

अन् मुहुर्तमेढची घंटा तुटली

शंभराव्या नाट्य संमेलनाच्या कार्यक्रमास गर्दी नसली तरी दर्दी रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रमास नांदीने सुरुवात झाली. याप्रसंगी मुहुर्तमेढ कार्यक्रमाच्या निमित्ताने आकर्षक घंटा तयार करण्यात आली होती. त्याचे उद्घाटन नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्या हस्ते घंटानाद करुन झाले. दामले यांनी अत्यंत सफाईदारपणे घंटानाद केला परंतु अचानक घंटा तुटून रंगमंचावर पडली. याप्रकाराने दामलेंसह व्यासपीठावरील सर्वचजण अचंबित झाले. सुदैवाने घंटा कोणाला लागली नाही.

 

 

 

 

 

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज