rajkiyalive

(SANGLI NATYASAMELAN ) मुहूर्तमेढीची शोकांतिका

(SANGLI NATYASAMELAN ) मुहूर्तमेढीची शोकांतिका
जनप्रवास । अमृत चौगुले

(SANGLI NATYASAMELAN ) मुहूर्तमेढीची शोकांतिका :

अखिल भारतीय 100 व्या नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ नाट्यपंढरी सांगलीत नुकतीच रोवली गेली. वास्तविक सांगलीच्या नाट्यपरंपरेचा लौकिक पाहता मुहूर्तमेढीचा लोकोत्सव होणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने जिल्ह्यातील विविध कलाकारांसह समस्त रसिकांचा सहभाग असणे क्रमप्राप्त होते, परंतु आयोजक नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने नियोजनशून्य आणि चाकोरीबद्ध कारभाराने विष्णुदास भावे नाट्यगृहात मुहूर्तमेढीचा सोपस्कार पार पडला म्हटल्यास वावगे ठरू नये.
सर्व उणिवा सोडाच, डॉ. जब्बार पटेलांसारख्या महनीय सरस्वतीचंद्राला व्यक्त व्हायलाही न मिळावे यापेक्षा लाजिरवाणे ते काय असावे? त्यांच्यासह दिग्गज नाट्यकर्मी, मान्यवर हे केवळ हजेरीपुरतेच होते का? असा प्रश्न या निमित्ताने व्यक्त होतो. एकूणच अगदी कलाकारांपेक्षा राजकीय साठमारीत पडलेला हा सोपस्कार म्हणजे नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढीची शोकांतिकाच म्हणावी लागेल.

 

 

 

(SANGLI NATYASAMELAN ) मुहूर्तमेढीची शोकांतिका

नाट्यक्षेत्राचा पाया सांगलीत रचला गेला. आद्य नाटककार विष्णुदास भावे, नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, गोविंद बल्लाळ देवल, अण्णासाहेब किर्लोस्कर आदींसह अनेक नाटककारांपासून सुरू झालेल्या परंपरेत अण्णाभाऊ मास्टर दिनानाथ तथा दीनानाथ मंगेशकर, मास्टर अविनाश तथा गणपतराव मोहिते यांच्यासह अनेक कलकारांनी योगदान दिले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर पठ्ठे बापूराव, लोकनाट्य कलावंत काळू-बाळू यांच्यापासून ते तत्कालिन आणि विद्यमान विविध कलाविष्कार सादर करणार्‍या कलाकारांनी हा वारसा पुढे चालू ठेवला आहे.

नाट्यक्षेत्रानेही कात टाकत नवनवे प्रयोग सुरू ठेवले आहेत

अर्थात ग्लॅमरच्या मार्‍यात गेल्या काही वर्षांपासून सर्वत्रच नाटक आणि नाट्यक्षेत्राला थोडी अवकळा आली असली तरी नाट्यक्षेत्रानेही कात टाकत नवनवे प्रयोग सुरू ठेवले आहेत. नाटकासह, लोकनाट्य, संमोहन, शाहीर, गायन व अन्य पारंपरिक कलाकारांनीही आधुनिकतेची कास धरली आहे. नाट्य परिषदेवरही सांगलीचा वरचष्मा आहे. नाट्य क्षेत्रातील विष्णुदास भावे यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा पुरस्कार या क्षेत्रातील दिग्गजांना दिला गेला आणि त्यांच्यासाठीही ते भूषणावह आहे. शिवाय नाट्य परिषदेवर सांगलीचा वरचष्मा आहेच.

 

नाट्य परिषदेवर अनेकजण ज्यांचा या क्षेत्राशी संबंध नाही अशांची वर्णी लागत गेली.

त्यामुळे अखिल भारतील 100 वे नाट्य संमेलन नाट्यपंढरी सांगलीत व्हायला हवे होते, परंतु दर्देवाने गेल्या काही वर्षांत नाट्य परिषदेतील मूठभरांच्या संकुचित कारभाराने वर्चस्व निसटत गेले. नाट्य परिषदेवर अनेकजण ज्यांचा या क्षेत्राशी संबंध नाही अशांची वर्णी लागत गेली. जे विविध क्षेत्रातील कलाकारांना मात्र या कारभार्‍यांनी चार हात लांबच ठेवल्याने त्यांनी याकडे पाठ फिरवली आहे. परिणामी नाट्यसंमेलन सांगलीतून पिंपरी-चिंचवडला गेले. किमान मुहूर्तमेढ नाट्यपंढरी सांगलीत होतो ही किमान अभिमानाची बाब होती.

त्यामुळे याच्या नियोजनाला सर्वसमावेशक बनवून हा लोकोत्सव होण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते.

परंतु दुर्देवाने त्याच्या नियोजनालाही व्यापक स्वरूप देण्याला संबंधितांनी फाटा दिला. अगदी याची मुहूर्तमेढ सांगलीत होतेय याचे ना फलक लागले ना दिंडीसह लोकसहभागासाठी प्रयत्न झाले. भावे नाट्यगृहात मुहूर्तमेढीचा कार्यक्रम आहे हे दारात उभारले तरी कळू नये एवढी नावापुरती सजावट करण्यात आली. प्रसारमाध्यमांनाही यात सहभागी करून घेण्याची औपचारिकता दाखविण्यात आली नाही. यातून पाच ठिकाणी संहितापूजनाचीही जबाबदारी वाटून व सोयीस्कररित्या पार पाडण्यात आली.

 

 

 

मुहूर्तमेढीच्या मुख्य कार्यक्रमाचा तर एकूणच फज्जा उडाल्याचे दिसून आले.

सकाळी 10 वाजताची वेळ देण्यात आली. मात्र ज्यांच्याहस्ते उद्घाटन होते ते राज्याच्या सांस्कृतिक खात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आगमनासाठी तब्बल तीन तास डॉ. जब्बार पटेलांसह सर्व दिग्गज कलाकार ताटकळत राहिले. व्यासपीठावरही नाट्यकर्मींना साईड कॉर्नर करत राजकीय वर्चस्व दिसून आले. सत्कार समारंभात विद्यमान अध्यक्ष डॉ. जब्बार पटेल, तत्कालिन अध्यक्ष प्रेमानंद गज्वी आदींना राजकारण्यांच्या सत्कारानंतर गौरवून त्यावर शिक्कामोर्तब झाले. एवढेच काय तर नाट्य परिषदेचे अध्यक्ष नाटकातील विक्रमादित्य प्रशांत दामले यांच्यासह अनेकांच्या सत्काराला शाल आणि स्मृतिचिन्हही न उरावे हे तर याहून लाजीरवाणे.

SANGLI : खासदार, पालकमंत्र्यांचे इलेक्शन टार्गे
वारणा उद्भव की चांदोली यासाठी सल्लागार
सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक
सांगलीत दररोज सात जणांना कुत्र्याचा चावा
उदगाव कुंजवन भगवान आनंद महोत्सव सोहळ्यास प्रारंभ
(sangli )रेल्वे पुलासाठी दिल्लीत धडक मारु

पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिनी विविध उपक्रम

राजकीय घोषणा आणि सरकारी वरदहस्ताचा बोलबाला?

एकूणच अशा पद्धतीने पार पडलेल्या मुहूर्तमेढीच्या सोपस्कारात राजकीय घोषणा आणि सरकारी वरदहस्ताचा बोलबाला झाला. त्यात नाट्य क्षेत्राचे योगदान आणि नाट्यकर्मींच्या अपेक्षांना थाराच नव्हता. एकमेव प्रशांत दामले यांनी फक्त नाट्य संमेलनासाठी निधी देण्याची आणि नाट्यगृहाची मागणी केली अन् गज्वी यांनी आभारप्रदर्शन केले. अशाही परिस्थितीत नाट्याविषयी आस्था असणार्‍या उपस्थितांना मात्र एकूणच या नाट्य संमेलनाच्या मुहूर्तमेढीची शोकांतिकाच पहावी लागली. त्याची खुलेआम चर्चा मात्र या मुहूर्तमेढीच्या कार्यक्रमानंतर सर्वत्र ऐकायला मिळत होती.

 

 

 

तुटलेली घंटा अन् नाट्यकर्मींच्या भावना बेदखल

नाट्यसंमेलनाच्या अनागोंदीत भर पडली ती मोठ्या आविर्भावाने नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढीवेळी सांगलीत खास बनविलेल्या आणि व्यासपीठावरच तुटलेल्या घंटेची. परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी पितळी घंटा घेऊन तिसरी घंटा देण्यासाठी बाह्या सरकवल्या. त्यांनी घंटेचा निनाद करण्याचा प्रयत्न केला, मात्र ती घंटा तुटून स्टेजवर कोसळून अपशकूनच झाला म्हणावा लागेल. पुढे डॉ. जब्बार पटेल यांच्यासारखे दिग्गज नाट्यक्षेत्र आणि एकूणच वाटचालीवर प्रकाशझोत टाकू शकले असते, परंतु त्यांना संधी मिळाली नाही. नाट्य कलाकारांच्या भावना, अपेक्षांचा कोणताच उहापोह यावेळी झाला नाही. फक्त जाता जाता पालकमंत्र्यांकडून नियोजन समितीकडून दहा लाखांची बिदागी आणि महापालिकेच्या होऊ घातलेल्या नाट्यगृहास नाट्याचार्य कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे नाव देण्याच्या मागणीचा उहापोह झाला. एवढेच काय ते याचे फलित म्हणावे लागेल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज