rajkiyalive

( SANGLI ) टँकर चालकांच्या संपाने पेट्रोल पंपावर गर्दी

( SANGLI ) टँकर चालकांच्या संपाने पेट्रोल पंपावर गर्दी

( SANGLI ) टँकर चालकांच्या संपाने पेट्रोल पंपावर गर्दी  : पंप बंद राहणार असल्याची अफवा, जिल्ह्यात टँकर चालकांच्या संपाने पेट्रोल पंपावर तुफान गर्दी , जिल्हाधिकारी आज घेणार इंधन पुरवठादारांची बैठक

 

( SANGLI ) टँकर चालकांच्या संपाने पेट्रोल पंपावर गर्दी

SANGLI :  केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याच्या विरोधात पेट्रोल पंप ट्रक आणि टॅकर चालकांनी पुकारलेल्या संपामुळे पेट्रोलपंप तीन दिवस बंद राहणार असल्याची अफवा जिल्ह्यात वार्‍यासारखी पसरली. यामुळे वाहनधारकांनी पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी सायंकाळपासून गर्दी केली होती. याबाबत प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यात इंधनाचा पुरेसा साठा असून मंगळवारपासून नेहमीप्रमाणे पेट्रोल पुरवठा होणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. दरम्यान टँकर चालकांच्या भूमिकेबाबत इंधनपुरवठादारांची जिल्हाधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता बैठक बोलावली आहे.

पेट्रोल पंपावर वाहधारकांनी इंधन भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा

सोमवारी सायंकाळपासून अचानक पेट्रोल पंपावर वाहधारकांनी इंधन भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा लागल्याचे चित्र होते. सोशल मीडियावरुन पंप बंद राहणार असून वाहनात पेट्रोल भरुन घेण्याचे मेसेज फिरत असल्याने नागरिकांनी पंपावर गर्दी केली होती. सुमारे अर्धा तास थांबल्यावर वाहनधारकांना पेट्रोल मिळत होते. जिल्ह्यातील सर्वच पेट्रोलपंपावर हीच परिस्थिती होती. पंप बंद राहणार असल्याच्या अफवेवर विश्वास ठेवून बहुतांशी वाहनधारकांनी पंपाचा रस्ता धरला होता. त्यामुळे सायंकाळनंतर पेट्रोल, डिझेलच्या विक्रीस भरमसाठ वाढ झाली. इंधनाचे दर उतरणार असल्याची अफवाही काहींनी पसरविली. त्यामुळे वाहनधारकांनी पंपांवर गर्दी केली. शहरातील बहुतांश पंपावर गर्दी झाली. काही पंपावरील इंधनही संपले.

 

अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये कार्यवाही करा

राज्याच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे सहसचिव ता. मा. कोळेकर यांनी सोमवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त तसेच पोलिस अधिक्षकांना पत्र पाठविले. त्यात त्यांनी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर होणार्या संभाव्य गैरसोयींचा उल्लेख केला आहे. राज्यातील इंधन पुरवठ्यावर विपरित परिणाम होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी दिली आहे. अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत योग्य ती कार्यवाही करण्याबाबतही आदेश देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय स्तरावर जिल्ह्यातील इंडियन पुरवठा करणार्‍या कंपन्या तसेच टँकर चालक प्रतिनिधींची बैठक प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता बोलवली आहे या बैठकीमध्ये इंधनपुरवठ्याबाबत कोणता तोडगा निघणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा
(MIRAJ ) मिरजेत ठाकरे, शिंदे गटात राडा
(SANGLI NATYASAMELAN ) मुहूर्तमेढीची शोकांतिका
वारणा उद्भव की चांदोली यासाठी सल्लागार
सांगली-मिरज रस्त्यावरील रेल्वे पूल धोकादायक
(sangli )रेल्वे पुलासाठी दिल्लीत धडक मारु

पेट्रोल आणि डिझेल अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे वाहनधारकांना इंधन सुरळीतपणे मिळण्यासंदर्भात उपायोजना करण्याचे निर्देेश आम्हाला प्राप्त झाले आहेत. नागरिकांनी घाबरुन जावून पेट्रोलपंपावर गर्दी करु नये, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष बारकुल यांनी केले.

 

इंधनाचा पुरेसा साठा, नागरिकांनी घाबरु नये – प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जिल्ह्यात सोमवारी दुपारी काही काळ ट्रकचालकांनी काम थांबविले होते. परंतु प्रशासनाने त्यांच्याशी चर्चा केल्याने त्यांनी काम पुन्हा सुरु केले आहे. पेट्रोल आणि डिझेल अत्यावश्यक सेवेत मोडत असल्यामुळे वाहनधारकांना इंधन सुरळीतपणे मिळण्यासंदर्भात उपायोजना करण्याचे निर्देेश आम्हाला प्राप्त झाले आहेत. नागरिकांनी घाबरुन जावून पेट्रोलपंपावर गर्दी करु नये, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिडे यांनी केले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज