rajkiyalive

RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर

RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर

®RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्याबरोबर केली शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा अदानी ग्रुप बळाच्या जोरावर शेतकर्‍यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणत आहे.

 

RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर

जयसिंगपूर / जनप्रवास

अदानीच्या राक्षसी प्रवृत्तीच्या विरोधात लढा देऊ, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना दिले. राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची मातोश्रीच्या निवासस्थानी भेट घेऊन शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा केली. याबाबत बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव धरणातून वीजनिर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारच्या वरदहस्ताने अदानी उद्योग समूहाने हालचाली गतिमान केल्या आहेत.

येत्या दोन-अडीच वर्षांत शीघ्र गतीने हा प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे.

पाटगाव धरणाचे पाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यामार्गे समुद्राकडे वळवल्याने भुदरगड, कागल, शिरोळसह कर्नाटक सीमाभागातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी पाणी कमी मिळणार आहे. याशिवाय कराराप्रमाणे कर्नाटकला पाणी देण्यासाठी काळम्मावाडी व चांदोली धरणातून जादा पाणी द्यावे लागणार आहे. याचा फटका कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकर्‍यासहित म्हैशाळ योजनेवर अवलूंबून असणार्‍या शेतकर्‍यांनाही बसणार आहे. केंद्र सरकारने अदानी उद्योग समुहाचे हित डोळ्यासमोर ठेऊन घेतलेल्या या निर्णयामुळे सांगली- कोल्हापूर सह सीमाभागातील शेतकर्‍यांना याचा फटका बसणार आहे.

 

 

अदानीच्या हितासाठी केंद्र सरकारने लाळ घोटेपणा केलेला आहे.

एकीकडे इचलकरंजी शहरातील जनता पिण्याच्या थेंब- थेंब पाण्यासाठी तडफडत असताना केंद्र सरकारने वास्तविक पाहता या धरणातून पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व उद्योगासाठी जे पाणी आरक्षित करण्यात आलेले आहे. तसेच पुढील तीस वर्षाचे पाणी वाटप नियोजन या सर्व गोष्टींचा जलसंपदा अथवा राज्य सरकारकडून अभिप्राय न घेता अदानीच्या हितासाठी केंद्र सरकारने लाळ घोटेपणा केलेला आहे.

हेही वाचा

(raju shetti ) आंदोलन योग्य पण दिशा भरकटली…

..तर लोकसभा निवडणूक लढविणार नाही. 

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

ऐनवेळच्या पैलवानांना लोकसभेचे स्वप्न...

सदरच्या प्रकल्पाला वापरले जाणारे पाणी कोल्हापूर जिल्ह्यातुन जाणार असून प्रकल्प वीजनिर्मिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात केली जाणार आहे कोकणामध्ये या अदानी उद्योग समूहाच्या प्रकल्पाविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात बळ मिळण्यासाठी शिवसेनेने उघडपणे या आंदोलनात सहभागी होणाबाबत सविस्तर चर्चा झाली.

 

 

यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, अदानीच्या धारावी बळकविण्याच्या राक्षसी प्रवृत्ती विरोधात आम्ही लढतोच आहोत. ग्रामीण भागातील शेतकर्‍यांच्या पाण्याच्या हक्कासाठी सुद्धा आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे राहू.

या बैठकीस खासदार संजय राऊत, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती सावकार मादनाईक यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज