rajkiyalive

SANGLI-PALUS : पतंगरावांसारखा स्पष्ट बोलणारा मंत्री पाहिला नाही

SANGLI-PALUS : पतंगरावांसारखा स्पष्ट बोलणारा मंत्री पाहिला नाही

SANGLI-PALUS : पतंगरावांसारखा स्पष्ट बोलणारा मंत्री पाहिला नाही  सुशीलकुमार शिंदे, आ.पृथ्वीराज चव्हाण, आ.जयंत पाटील यांनी जागवल्या डॉ.पतंगराव कदम यांच्या आठवणी…

 

 

SANGLI-PALUS : पतंगरावांसारखा स्पष्ट बोलणारा मंत्री पाहिला नाही

कडेगाव : जनप्रवास

पतंगराव कदम म्हणजे जबरदस्त कर्तृत्व व नेतृत्व असनारा नेता, मी आणि त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये काम केले, मी राज्याचा मुख्यमंत्री होतो, त्यावेळीही डॉ.पतंगराव कदम राज्याचे मंत्री होते, माझ्या राजकीय जीवनात मी डॉ.पतंगराव कदम यांच्यासारखा स्पष्ट बोलणारा मंत्री कधी पाहिला नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.

आठवणीतील डॉ.पतंगराव कदम साहेब या विशेष व्याख्यानाचे आयोजन

राज्याचे माजी मंत्री स्व.डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त सोनहिरा कारखाना येथील स्मारकस्थळी आठवणीतील डॉ.पतंगराव कदम साहेब या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी डॉ.पतंगराव कदम यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्वागत व प्रस्ताविक राज्याचे माजी मंत्री आ.डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.

 

जनसामान्यांच्या प्रती असणारी त्यांची तळमळ आपण जवळून बघितली

शिंदे पुढे म्हणाले, गोरगरीब व जनसामान्यांच्या प्रती असणारी त्यांची तळमळ आपण जवळून बघितली आहे. ग्रामीण भागातला माणूस आपल्या विचार व कर्तृत्वाने मोठा झाल्याचे पतंगराव हे उदाहरण आहे. मूर्ती लहान व कर्तृत्वाने महान असे पतंगराव होते. आपल्या आयुष्यात या माणसाने कधीही मागून कुणाला विरोध केला नाही. जे काय असेल ते समोरून असा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळेच पतंगराव हे सर्वांना हवेहवेसे असे व्यक्तिमत्त्व होते. राज्याच्या राजकारणात आपण यशवंतराव मोहिते यांच्यामुळे आलो.

विश्वजीत कदमांसारख्या विचारवंत लोकांची गरज

त्यांनीच सर्वप्रथम एस.टी.बोर्डाचे सदस्य केले व राजकिय प्रवास सुरु झाल्याचे ते सांगायचे व त्याबाबत नेहमी कृतज्ञता व्यक्त करायचे. असा हा मोठा मनाचा माणूस होता. पण दुर्दैवाने आज ते आपल्याला सोडून गेले. पण ज्या-ज्या वेळी आपण डॉ.विश्वजीत कदम यांचे भाषण ऐकतो, त्यावेळी डॉ.पतंगराव कदम दिसत असतात, सध्या राज्यात पक्षीय वातावरण बिघडत आहे. अशावेळी विश्वजीत कदमांना सारख्या विचारवंत लोकांची गरज असून, त्यांच्यात ती धमक आहे. त्यासाठी सर्वांनी त्यांच्यासोबत राहणे आवश्यक आहे.

 

डॉ.पतंगराव कदम यांच्यामुळे राज्यात काम करू शकलो : माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण….

आपण राज्याच्या राजकारणात अचानकपणे आलो होतो. राज्यात काम करण्याचा काहीही अनुभव नसताना राज्याचा मुख्यमंत्री म्हणून जी कामे करू शकलो ते केवळ डॉ.पतंगराव कदम यांच्या सहकार्यामुळेच करू शकलो. सकाळी निर्णय, दुपारी जी.आर. व संध्याकाळी अंमलबजावणी अशी पतंगराव कदम यांच्या कामाची पध्दत होती. कामात चिकाटी असणारे ते नेते होते. दुष्काळात पतंगराव नेहमी मध्यभागी असायचे. शेतकरी व सामान्य लोकांच्या दुःखाची त्यांना जाणीव होती.

एकाच दिवशी 8 हजार कर्मचार्‍यांना पर्मनंट

चंद्रपूरच्या वनविभागात दहा-पंधरा वर्षांपेक्षा जास्त काम करूनही तेथील कर्मचार्‍यांना शासनाच्या कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा नव्हत्या. ही बाब ज्यावेळी पतंगराव कदम यांना समजली त्यावेळी एकाच दिवशी 8 हजार कर्मचार्‍यांना पर्मनंट करून त्यांनी ऐतहसिक असा निर्णय घेतला होता. आजही त्याठिकाणी कित्येक घरात लोकांनी त्यांचे फोटो लावले आहेत. कुंडल येथील वानिकी प्रशिक्षण केंद्र त्यातीलच उदाहरण आहे, अशी त्यांची कामाची पध्दत होती. शून्यातून संस्था उभा करून त्या योग्य प्रकारे चालवणारे फार थोडे असतात. असा या परिसरातील हिरा व राज्याचा उमदा नेता आज आपल्यात नाही. कोणताही व कितीही मोठा अधिकारी असला तरी ते ऐकेरी हाक मारायचे पण त्याचा राग कधी कुणाला आला नाही, कारण त्यामध्ये सुध्दा मायेचा ओलावा असायचा, असे पतंगराव होते.

हेही वाचा

SANGLI LOKSABHA :पळणारा नाही; त्यांची उमेदवारी कुठे निश्चित

 SANGLI LOKSABHA : काँग्रेसने इच्छुकांची नावे मागवली

SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांनी पळ काढू नये

शरद मोहोळच्या अट्टल ’गुंडगिरी’चा प्रवास

आज राज्यात जी राजकीय लढाई सुरू आहे, ती जिंकण्यासाठी पतंगराव कदमांची गरज होती. डॉ.विश्वजीत कदम यांना प्रचंड मोठे भविष्य आहे, राजकारणाच्या या संक्रमणाच्या काळात महाराष्ट्राला तारुण नेण्याची धमक विश्वजीत कदमांच्याकडे असून, त्यासाठी त्यांना मोकळा वेळ द्या, याठिकाणी गुरफटू न देता, त्यांना ताकत द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

…तर आजचे राज्याचे राजकीय चित्र वेगळे असते : आ.जयंत पाटील…

आजच्या राजकीय घडामोडीत डॉ.पतंगराव कदम असते तर, राज्याच्या राजकारणाला वेगळी झळाळी असती, त्यामुळे या राजकीय घडामोडीत त्यांची उणीव जाणवत आहे. प्रचंड राजकीय कालवा-कालवीत ठाम राहणारे असे ते व्यक्तिमत्त्व होते. अतिशय मोकळ्या मनाचा असा ठाम माणूस पुन्हा होणार नाही. महाराष्ट्रात त्यांनी अनेकांना मदत केली आहे, आमच्या कासेगाव शिक्षण संस्थेच्या सात शाळांना एकाचवेळी त्यांनी मान्यता दिली होती. जे काय करायचे ठामपणे व अतिशय उत्साहाने, काम करताना ते धडकपणे करायचे व कोणत्याही परिस्थितीत आपल्या भागाला विसरायचे नाही, असा त्यांचा स्वभाव होता.

SANGLI-PALUS : पतंगरावांसारखा स्पष्ट बोलणारा मंत्री पाहिला नाही

त्यांच्यासारखी कामाची धडाडी कोणाकडेही नाही, आज त्यांची उणीव भासत आहे, आपल्या मंत्रिपदाच्या काळात ते ताकारी व टेंभू योजनेसाठी नेहमीच अग्रेसर राहिले व त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. मंत्रिमंडळात सतत भांडत, ताकत वापरून वेळोवेळी त्यांनी निधी उपलब्ध केला. अतिशय कर्तबगार असे व्यक्तिमत्त्व लाभलेल्या कदम साहेबांनी आठ खात्यांचा कारभार पाहिला होता. जे करायचे ते उत्तम असा त्यांचा आदर्श होता, त्यातूनच त्यांनी भारती विद्यापीठा सारखे देशात मोठे असणारे ज्ञानमंदिर उभे केले आहे. मला त्यांच्या जवळ काम करण्याची संधी मिळाली हे माझे सौभाग्य होते, स्व. राजारामबापूंच्या निधनानंतर मला धीर देणारे हे डॉ.पतंगराव कदम असल्याचे ते म्हणाले, सगळ्यांनी एकविचाराने, एकदिलाने व एकसंघपणे काम करण्याची गरज आहे. तुम्ही सर्वांनी डॉ.विश्वजीत कदम यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपा व त्यांचे नेतृत्व मोठे करा असे आवाहन त्यांनी यावेळी केली.

यावेळी बोलताना आ.डॉ.विश्वजीत कदम म्हणाले, डॉ.पतंगराव कदम साहेबांनी ताकारी, टेंभू योजनांच्या माध्यमातून या परिसराचा कायापालट केला आहे. आयुष्यभर 365 दिवस काम करत साहेबांनी याठिकाणी विकासपर्व उभे केले आहे. सबंध देशात आणि राज्यात त्यांनी आपल्या प्रेमाचा ऋणानुबंध निर्माण केला आहे. आयुष्यभर आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी साहेब झटत राहिले. आपल्या राजकीय व सामाजिक जीवनात फुले-शाहू-आंबेडकर व कर्मवीरांचे विचार आदर्श मानून त्यांनी मार्गक्रमण केले आहे.

आमच्या सर्वांच्या साठी साहेबांच्या आठवणीचा ठेवा हा त्यांचा आशिर्वाद असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार मोहनराव कदम, उत्तरप्रदेशचे आमदार सुरेंद्र मैथानी, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण संस्थेच्या चेअरमन विजयमाला कदम, सौ.स्वप्नालिताई कदम, आमदार विक्रम सावंत, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड, सोनहिरा कारखान्याचे संचालक रघुनाथ कदम, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम कदम, पुण्याचे नगरसेवक चंदूशेठ कदम, युवक नेते डॉ.जितेश कदम, दिग्विजय कदम, युवक काँग्रेसच्या प्रणाली पाटील, माजी जि.प.अध्यक्षा मालन मोहिते यांच्यासह मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार भीमराव मोहिते यांनी मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज