rajkiyalive

HATKANGLE-KOLHAPUR-LOKSABHA : नार्वेकरांच्या निकालाने शिंदे गटाला बळकटी

HATKANGLE-KOLHAPUR-LOKSABHA : नार्वेकरांच्या निकालाने शिंदे गटाला बळकटी

HATKANGLE-KOLHAPUR-LOKSABHA : नार्वेकरांच्या निकालाने शिंदे गटाला बळकटी : अखेर शिवसेना अपात्र आमदार प्रकरणाच निकाल लागला. शिवसेना ही शिंदे गटाची आणि धनुष्यबानही शिंदे गटाचेच, असा निकाल विधानसभेचे सभापती राहूल नार्वेकर यांनी दिला आणि दीड वर्षापासून सुरू असलेले निकालाचे नाट्य तूर्तासतरी संपुष्ठात आले. उबाठा गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असली तरी त्याला अजून किती दिवस जातील हे काही सांगता येत नाही नाही. त्यामुळे तूर्तास तरी शिंदे गटाला हत्तीचे बळ आले असून, येणार्‍या लोकसभा निवडणुकीत शिंदे गट धनुष्यबान चिन्हावर लढेल यात काही शंका नाही. त्यामुळे हातकणंगलेतून धैर्यशील माने आणि कोल्हापूरमधून संजय मंडलिक यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.

 

 

HATKANGLE-KOLHAPUR-LOKSABHA : नार्वेकरांच्या निकालाने शिंदे गटाला बळकटी :

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे

HATKANGLE-KOLHAPUR-LOKSABHA : नार्वेकरांच्या निकालाने शिंदे गटाला बळकटी : अखेर दीड वर्षापूर्वी राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी घडल्या. अगोदरच शिवसेनेत फूट पडून शिंदे गट सत्तेत सामिल झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पडून अजितदादा पवारही सत्तेत सामिल झाले. शिंदे गट सत्तेत सामिल झाल्यापासून शिवसेना कुणाची आणि चिन्ह कुणाचे याबाबत दोन्ही गटाकडून दावे, प्रतिदावे सुरू होते. या अगोदर चिन्ह शिंदे गटाला मिळाले होते. परंतु शिवसेनेवर त्यांचा हक्क नव्हता. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्रतेच्या रडारवर होते. सत्ता जातेकी काय अशी भिती शिंदे गटातील आमदारांना वाटत होतेे. त्यासाठी मंत्रीमंडळाचा विस्तारही रखडला होता.

अखेर नुकताच या सर्व घटनेचा निकाल राहूल नार्वेकर यांनी दिला आणि शिवसेनेवर शिंदे गटाची मोहोर उमटली.

त्यामुळे शिंदे गटातील आमदार आणि खासदार निर्धास्त झाले. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघात भाजप डोकावत होते. दोन्ही पैकी एक जागा भाजपच्या पारड्यात पाडून घ्यायचे याबाबत अनेक प्रयत्न होत होते. भविष्यातही होणार आहेत. परंतु आता भाजपच्या या प्रयत्नाला बे्रेक लागणार आहेे. कारण हातकणंगले आणि कोल्हापूर येथे सध्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. येणार्‍या 2024 च्या निवडणुकीत ते पुन्हा इच्छुक आहेत. नुकतेच खासदार धैर्यशील माने यांनी आपला वाढदिवस जोरदार करीत आपणही काही कमी नाही, हे दाखवून दिले आहे आणि येणार्‍या निवडणुकीत आपणच मुख्य दावेदार आहोत, हे ठणकावून सांगितले आहे.

 

हातकणंगले लोकसभा मतदार संघात सध्यातरी शिवसेना शिंदे गटाकडून दुसरा कोणी इच्छुक नाही.

भाजपमध्ये मध्ये मात्र रांग लागली आहे. इचलकरंजीचे राहूल आवाडे, हाळवणकर, पेठचे राहूल महाडिक यांनी भाजपसाठी शडृडू ठोकला आहे. जोपर्यंत शिवसेना शिंदे गटाची खात्री नव्हती तोपर्यंत भाजपही आग ओखत होता. परंतु आता या निकालाने शिवसेना शिंदे गट फ्रंटफूटवर आला आहे. कोणत्याही क्षणी निवडणुका लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे धैर्यशील माने तयारीतच आहेत. त्यांनी आपला प्रचार सुरूही केला आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाकडून धैर्यशील माने यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघात पेठचे राहूल महाडिक यांनीही शडृ ठोकला आहे.

हा मतदार संघ भाजपच्या वाट्याला आल्यास त्यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इचलकरंजी, पन्हाळा, शिराळा या तीन मतदार संघात भाजप जोरदार आहे. इचलकरंजीमध्ये स्वत आमदार प्रकाश आवाडे, पन्हाळ्यात आ. विनय कोरे आणि शिराळा मतदार संघात सम्राट महाडिक यांनी जोरदार तयारी केली आहे. शिरोळ, हातकणंगले या दोन मतदार संघात शिवसेना फार्मात आहे. इस्लामपूर मतदार संघात जयंत पाटील यांची कमांड आहे. एकंदरीत समिश्र मतदार या मतदार संघात आहेत. राजू शेट्टी, धैर्यशील माने यांनी या अगोदर या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. त्यामुळे हातकणंगले लोकसभा कोणत्याही परिस्थितीत शिवसेना शिंदेगट सोडणार नाही हे निश्चित आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघातही विद्यमान खासदार संजय मंडलिक शिवसेना शिंदे गटाचे आहेत.

त्यांनीही येणार्‍या निवडणुकीसाठी शडृडू ठोकला आहे. कोल्हापूरमध्येही भाजपकडून अनेकजण इच्छुक आहेत. राज्यसभेचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांनीही आपणाला पक्षाने आदेश दिला तर आपण लोकसभेच्या आखाड्यात उतरू असे नुकतेच सांगितले आहे. त्यांनी त्या दृष्टीने वाटचालही सुरू केली आहे. नियमाप्रमाणे ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाटणीलाच जाणार आहे. शिवसेना शिंदे गटाचे संजय मंडलिक हेच उमेदवारीचे पक्के दावेदार आहेत.

 

कोल्हापुरात शिवसेना शिंदे गट, शिवसेना उबाठा, अजित पवार राष्ट्रवादी आणि भाजप या सर्वांचीच ताकद जास्त आहे.

त्यामानाने हातकणंगलेमध्ये अजित पवार गटाची ताकद थोडी कमी आहे. त्यामुळे कोल्हापूरवर अजित पवार गटाचाही डोळा असणार आहे. हसन मुश्र्रीफ यांना लाकेसभेला उतरविण्याच्या हालचाली सुरू आहेत. या सर्वांच्या भांडणात महायुतीतर्फे उमेदवारी कोणाच्या गळ्यात पडते हे येणारा काळच सांगणार आहे. भाजपजर अडून बसला तर हातकणंगलेपेक्षा कोल्हापूरवर त्यांचा दावा जास्त असणार आहे. कारण येथे धनंजय महाडिक ताकदीचे उमेदवार आहेत. भाजपला राज्यसभेपेक्षा लोकसभेमध्ये जास्त रस आहे. कमळाच्या चिन्हावर जास्तीत जास्त उमेदवार निवडून यावेत यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे भाजप अखेरपर्यंत कोल्हापूर मतदार संघावर दावा सांगू शकतो.

हेही वाचा

hatkanagle loksabha : शिंदे गटाला कमळाचाच पर्याय?

लोकसभेसाठी शेट्टींची मशागत सुरू

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

प्रतीक पाटील मैदानात की शेट्टींवर दबावतंत्र…?

शिवसेना शिंदे गटाने जोरदार दावा सांगितला आहे.

एकंदरीत सध्यातरी हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभा मतदार संघावर सध्यातरी शिवसेना शिंदे गटाने जोरदार दावा सांगितला आहे. आमदार अपात्रत्रेचा निकाल जर उलटा लागला असता आणि 16 आमदार जर अपात्र झाले असते तर मात्र शिंदे गटाची पूर्ण हवा गेली असती. शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर लढावे लागले असते. भाजपही तयारीत होताच. परंतु सध्या तरी भाजपच्या मनसुब्यावर पाणी फिरले आहे. शिवसेना शिंदे गट सेफ मोडवर गेला असून, शिंदे गटाच्या सर्व उमेदवारांची उमेदवारी पक्की मानली जात आहे. त्यामुळे संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांची उमेदवारी जवळपास नक्की झाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज