rajkiyalive

JAYANT PATIL : कारखान्याच्या वतीने भव्य कुस्ती मैदान घेण्याचा आपला प्रयत्न : आ.जयंतराव पाटील

JAYANT PATIL : कारखान्याच्या वतीने भव्य कुस्ती मैदान घेण्याचा आपला प्रयत्न : आ.जयंतराव पाटील :  आपल्या तालुक्यास,जिल्ह्यास कुस्तीची मोठी परंपरा असून आपण नेहमी कुस्ती खेळास प्रोत्साहन व ताकद दिली आहे. ही परंपरा कायम ठेवण्याचा आपला प्रयत्न असेल,असा विश्वास माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील,महाराष्ट्र केसरी आप्पासो कदम हे आपल्या राजारामबापू कुस्ती केंद्राचे मल्ल असल्याचा अपणास सार्थ अभिमान आहे. भविष्यात पुन्हा महाराष्ट्र केसरी,तसेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय मल्ल घडविण्याचा आपला प्रयत्न असेल,अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

JAYANT PATIL : कारखान्याच्या वतीने भव्य कुस्ती मैदान घेण्याचा आपला प्रयत्न : आ.जयंतराव पाटील

     राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या वतीने राजारामबापू कुस्ती केंद्रात स्व.बापूंच्या पुण्यतिथी निमित्त पुरुष व महिलांच्या मानधन कुस्ती स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील,महाराष्ट्र केसरी आप्पासो कदम,कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील,संचालक कार्तिक पाटील, माजी संचालक शिवाजीराव साळुंखे,माजी जि.प.अध्यक्ष देवराज पाटील,जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष विलास शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रथम बजरंग बली व स्व. बापूंच्या प्रतिमेचे व मैदानाचे पूजन करण्यात आले.
यावेळी मुलांच्यामध्ये पै.विवेक नायकल व पै.सत्यजित पाटील,तर मुलींच्या मध्ये पै.वैष्णवी सावंत व ऋतुजा जाधव यांच्यामध्ये पहिली कुस्ती लावण्यात आली.   आ.पाटील म्हणाले,आपण कारखान्याच्या माध्यमातून अद्यावत कुस्ती केंद्र उभा करून मल्लांना आर्थिक ताकद देण्यासाठी मानधन कुस्ती स्पर्धा घेत होतो. मध्यंतरी या स्पर्धेस खंड पडला होता. प्रतिक पाटील यांनी ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आहे. भविष्यात कारखान्याच्या वतीने भव्य कुस्ती मैदान घेण्याचा आपला प्रयत्न असेल.
आपण खंडीत मानधन स्पर्धा पुन्हा सुरू केली आहे.
  प्रतिकदादा पाटील म्हणाले,साहेबांनी १९८९ साली अद्यावत कुस्ती केंद्र व मानधान स्पर्धेतून आपल्या मल्लांना प्रोत्साहन दिले आहे. आपण खंडीत मानधन स्पर्धा पुन्हा सुरू केली आहे. भविष्यात कुस्ती मैदानात घेताना मुलांच्यासह मुलींना विशेष ताकद देवू.  पै.चंद्रहार पाटील म्हणाले,प्रतिकदादांनी पुन्हा मानधन कुस्ती स्पर्धा सुरू केल्याने त्यांचे अभिनंदन करतो. आता भव्य कुस्ती मैदानाची परंपरा पुन्हा सुरू करावी. माझ्या जडणघडणीमध्ये राजारामबापू कुस्ती केंद्राचा मोलाचा वाटा आहे.
सांगली जिल्ह्यातील युवा मल्लांना ताकद देऊया.
  पै.आप्पासो कदम म्हणाले,मी लोकनेते राजारामबापू पाटील यांचे प्रोत्साहन व कारखान्याच्या मानधनावर महाराष्ट्र केसरी झालो. सांगली जिल्ह्यातील युवा मल्लांना ताकद देऊया. यावेळी पै.विकास पाटील बोरगाव यांनीही मनोगत व्यक्त केले.  यावेळी पै.भगवान पाटील,पै.शिवाजीराव साळुंखे,पै.माणिक जाधव,पै.हणमंतराव पाटील,पै.नजरुद्दीन नायकवडी,पै.विलास शिंदे,पै.अशोक मोरे,पै.भरत नायकल,पै.राजेंद्र गावडे, पै.विकास पाटील,पै.विनायक पाटील, पै.आनंदा धुमाळ,पै.हणमंत जाधव,पै.मोहन शिंदे ,पै.अनिल बाबर,अँड.विवेकानंद मोरे यांच्यासह अनेक जेष्ठ मल्लांचा सन्मान करण्यात आला.
  अँड.चिमणभाऊ डांगे,संजय पाटील, शहाजी पाटील,शशिकांत पाटील,माणिकराव पाटील,खंडेराव जाधव,दादासो पाटील, आनंदराव पाटील,संपतराव पाटील,शंकरराव चव्हाण,सुहास पाटील,दिलीपराव मोरे, सुस्मिता जाधव, सुनिता देशमाने,सुवर्णा जाधव,प्रकाश पाटील केंद्राचे प्रशिक्षक कुंडलिक गायकवाड, नितीन सलगर यांच्या सह अनके मान्यवर,कुस्ती मल्ल व कुस्ती प्रेमी, तसेच कारखान्याचे संचालक-अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  प्रारंभी संचालक दादासो मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष विजयराव पाटील यांनी आभार मानले.प्रसाद कुलकर्णी,जोतिराम वाझे यांनी सूत्रसंचालन केले.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज