rajkiyalive

SANGLI CRIME : सांगलीत फिल्मी स्टाईल ने दहशत माजवत अल्पवयीन मुलीचे अपहरण

SANGLI CRIME : सांगलीत फिल्मी स्टाईल ने दहशत माजवत अल्पवयीन मुलीचे अपहरण : कोयत्याने मुलीच्या आईवर केले वार : रेकॉर्डवरील गुन्हेगारासह चौघांच्या आवळल्या मुसक्या : अल्पवयीन मुलगाही ताब्यात.

SANGLI CRIME : सांगलीत फिल्मी स्टाईल ने दहशत माजवत अल्पवयीन मुलीचे अपहरण

जनप्रवास । सांगली

शहरातील कोल्हापूर रोडवरील आकाशवाणी केंद्राच्या पाठीमागे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे फिल्मी स्टाईल ने दहशत माजवत घरातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. एवढेच नाही तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या टोळक्याने मुलीच्या आईने विरोध केल्यावर त्यांच्यावर कोयत्याने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. सदरचा गंभीर गुन्हा हा गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी रात्री पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी गंभीर जखमी असलेल्या पीडित मुलीच्या आईने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने तपासाची चक्रे फिरवून कर्नाटकातील हरिहर येथून मुलीची सुटका करत संशयितांच्या मुसक्या आवळल्या. यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.

 

 

 

अटक करण्यात आलेल्यांमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार समर्थ भारत पवार (वय २२, रा. जुना बुधगाव रस्ता, राजीव गांधीनगर, सांगली), राहुल संजय साळुंखे (रा. १९, रा. जामवाडी, सूर्यवंशी प्लॉट, सांगली), आदित्य गणेश पवार (वय २०, रा. पंत मंदिर नजीक, जामवाडी, सांगली), शुभम नामदेव पवार (वय २२ रा. श्रीनिवास अपार्टमेंट, गावभाग, सांगली ) यांचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, संशयित समर्थ पवार हा त्याच्या साथीदारासह गुरुवार दि. १८ रोजी दुपारी ४ च्या सुमारास कार (क्र. एमएच १० – ६७९७) मधून अल्पवयीन मुलीच्या घरासमोर येवून थांबला. वाहनातून कोयते हातात घेवून संशयित खाली उतरले आणि काही परिसरात दहशत माजवत मुलीच्या घरात घुसल. फिर्यादी असणाऱ्या मुलीच्या आईच्या सासू – सासऱ्यांना ढकलून दिले आणि मुलीला घेऊन ते जाऊ लागले. यावेळी मुलीच्या आईने संशयितांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोयत्याने त्यांच्या हातावर व डोक्यात वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. काही मिनीटात संशयितांनी अल्पवयीन मुलीस घेवून तेथून पलायन केले.

 

 

 

याबाबत तातडीने सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली. घटनेचे गांभिर्य ओळखून सांगली शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अपहरण कर्त्यांच्या शोधासाठी शोधमोहिम राबविली. या प्रकरणाचा तांत्रिक दृष्टीकोनातून तपास केला असता त्यामध्ये संशयितांचा ठावठिकाणा समजला. बारा तासाच्या कालावधीत पोलिसांनी कर्नाटक राज्यातील हरिहर या ठिकाणाहून संशयित समर्थ पवार यास ताब्यात घेवून मुलीची सुटका केली.

 

 

तसेच गुन्ह्यात वापरलेली चारचाकी हस्तगत केली. पोलिस तपासात अन्य संशयितांची माहिती मिळताच त्यांनाही अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस निरिक्षक सतीश शिंदे, अभिजित देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर गोडे, उपनिरिक्षक महादेव पोवार, कुमार पाटील, पोलीस कर्मचारी संदिप पाटील, गणेश कांबळे, गौतम कांबळे, विक्रम खोत, श्रीपाद शिंदे, सचिन शिंदे, योगेश सटाले, बिरोबा नरळे, संदिप गुरव यांच्या पथकाने केली

 

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज