rajkiyalive

संभाजी पवार गट पुन्हा रिचार्ज होणार

जनप्रवास, सांगली
 माजी आमदार संभाजी पवार यांनी ५० वर्षांपूर्वी विजयंत मंडळाची स्थापना केली. विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकांत मंडळाच्या सवंगड्यांनी ताकद दिली. राजकारण, समाजकारणात आपण सुवर्णदिन अनुभवले. तेच दिवस पुन्हा आणण्याची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतोय. तुम्ही बळ द्या, साथ द्या. आगामी प्रत्येक निवडणुकीत एकजुटीने, ताकदीने उतरू आणि लढून जिंकून दाखवू, असा निर्धार भाजपचे नेते पृथ्वीराज पवार यांनी आज येथे कार्यकर्ता मेळाव्यात केला.
संभाजी पवार पवार यांच्या विचारांच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा
येथील दैवज्ञ भवनमध्ये माजी आमदार संभाजी पवार पवार यांच्या विचारांच्या जुन्या-नव्या कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा झाला. ‘विजयंत’ मंडळाची ही गणेशोत्सव नियोजन बैठक राजकीय दिशा ठरवणारी ठरली. माजी नगरसेवक बटूदादा बावडेकर, हणमंतराव पवार, आनंद परांजपे, राजीव बावडेकर, संजय सावंत, सुनिल पवार, महावीर चव्हाण, दादा तामगावे, अनिल कुलकर्णी, संभाजी सावंत, पापा वासुदेव, विष्णू पाटील, नरसू खोकडे, सुहास बाबर, श्रेणीक कबाडे आणि माजी नगरेसवक गौतम पवार प्रमुख उपस्थित होते.
आप्पांच्या विचारांच्या माणसांची आज त्याच पद्धतीने नव्याने बांधणी करण्याची वेळ आली आहे.
पृथ्वीराज पवार म्हणाले, ‘‘सन २०१९ च्या महापुरात विजयंत मंडळाची पारंपारिक गणेश मुर्ती पाण्यात बुडाली. तिथेच विसर्जित झाली, पण माती वाहून गेली नाही. ती तिथेच होती. त्याच मातीने नवीन मुर्ती बनवली आणि प्राणप्रतिष्ठापना केली. आप्पांच्या विचारांच्या माणसांची आज त्याच पद्धतीने नव्याने बांधणी करण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सवासोबतच आपल्या जुन्या ताकदीची प्राणप्रतिष्ठापना होईल. भाजपने आपणाला नेहमी बळ दिले आहे. पक्षाची ताकद वाढवू. महापालिकेसह पुढील प्रत्येक निवडणुकीत उभारी घेऊ. योग्यवेळी पक्ष दखल घेईल. विमानतळ जागा बचाव, सांगली बंधारा बचाव, कसिनो बंदीची मागणी यासाठी उभारलेला प्रत्येक लढा आपण यशस्वी केला आहे. रस्त्यावरच्या लढ्याची आपली परंपरा आहे. आप्पांची कमतरता भासू देणार नाही. प्रत्येक माणसाला बळ देऊ. सामान्यांची लढाई हाती घेऊ. विकासासाठी रान उठवू.’’

हेही वाचा

भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन

फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही

पृथ्वीराज पवार यांनी सामाजिक, विकासात्मक प्रश्‍न हाती घेऊन ती भरून काणढ्याचा प्रयत्न ताकदीने पुढे न्यावा,
माजी नगरसेवक हणमंतराव पवार यांनी आप्पांच्या नेतृत्वाची उणीव जाणवत असून पृथ्वीराज पवार यांनी सामाजिक, विकासात्मक प्रश्‍न हाती घेऊन ती भरून काणढ्याचा प्रयत्न ताकदीने पुढे न्यावा, अशी सूचना केली. या बैठकीत विजयंत मंडळाचा इतिहास, क्रीडा क्षेत्रात मिळविलेले प्रावीण्य, विजयंत गणेशोत्सव मंडळाच्या 52 वर्षातील सांस्कृतिक कार्यासह सामाजिक, राजकीय कार्याचा आढावा घेण्यात आला. एकेकाळी मंडळाचे तीन मातब्बर आमदार, २५ नगरसेवक कार्यरत होते. त्यांनी राजकीय क्षेत्रात व महापालिकेत प्रचंड दबदबा निर्माण केला. काही उपमहापौर, प्रभाग समिति सभापती, स्थायी समिती सभापती व सदस्य, विरोधी पक्ष नेता, गटनेता पदापर्यंत पोहचले. कामाचा ठसा उमठविला.
सगळयांनी पृथ्वीराज भैय्या यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ताकदीने मैदानात उतरण्याची घोषणा केली.
गेली काही वर्षापासून मंडळाचे कार्यकर्ते थोडे विस्कळीत झाले. त्यांची द्विधा मनस्थिति झाली होती. राजकीय, सामाजिक कार्यापासून काही जण दूर गेले. अशा सगळयांनी पृथ्वीराज भैय्या यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा ताकदीने मैदानात उतरण्याची घोषणा केली.
चंद्रकांत सूर्यवंशी यांनी स्वागत केले. निलेश हिंगमिरे यांनी आढावा घेतला. विजयंतचे अध्यक्ष विलास शिंदे, अशोक गोसावी, राजू भावे, गोपाळ पवार, किसन माळी, विजय साळूंखे, किशोर पाटील, सतिश जाधव, रामचंद्र देशपांडे यांनी नियोजन केले.
Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज