rajkiyalive

आता मोकळेच आहोत, एकेकाचा कार्यक्रम करू : राजू शेट्टी

आता मोकळेच आहोत, एकेकाचा कार्यक्रम करू : राजू शेट्टी : सगळ्यांनी मिळून आमचा पराभव केला आहे. आता आम्ही मोकळेच आहोत. एकेकाचा कार्यक्रम कसा करायचा हे लवकरच ठरवू, असे प्रतिपादन माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. एका मुलाखतीत ते बोलत होते.

आता मोकळेच आहोत, एकेकाचा कार्यक्रम करू : राजू शेट्टी

ते म्हणाले, आता आम्हाला राजकारणातील कामाची स्टॅटॅजी बदलावी लागेल. शेतकर्‍यांची प्रामणिक राहणारच परंतु राजकारणात काहीतरी बदल करावे लागेल. मतदार संघांत मतांचे धु्रवीकरण झाले. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करायचे, 400 प्लस जागा जिंकायच्या, घटना बदलून टाकायची आणि आरक्षण रद्द करायचे, समान नागरी कायदा आणायचे यासाठी काही लोक झटत होते. तर दुसर्‍या बाजूस हे सगळे वाचवायचे यासाठी लोक प्रयत्न करीत होते. त्यामुळे शेतकरीही या ध्ाु्रवीकरणाला बळी पडला.

 

शेतकरीच आपल्या भूमिकेशी ठाम राहिले नाहीत,

ते पुढे म्हणाले, अडीच वर्षापूर्वी मला शेतकर्‍यांनी सांगितले होते की, आपल्याला राजकारण करायचे नाही, या घाणीत पडायचे नाही. तुम्ही स्वतंत्र भूमिका घ्या, आम्ही तुमच्या पाठिशी ठामपणे उभे राहू, असा आग्रह शेतकर्‍यांचाच होता. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांकडेही साखर कारखानदार आहेत. त्यांच्या कळपात जायचे नाही. त्यासाठी मी स्वतंत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. परंतु ज्या शेतकर्‍यांनी मला असे सांगितले. त्या शेतकर्‍यांची भूमिका नंतर बदलली. निकाल बघितल्यानंतर शेतकरीच आपल्या भूमिकेशी ठाम राहिले नाहीत, असे दिसते.

हा पराभव शेतकर्‍यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे.

परंतु कोणत्याही गोष्टीवर काळ हेच उत्तर असते. काही दिवसानंतर एक व्यापक बैठक घेणार आहोत. त्यानंतर पुढील दिशा ठरविणार आहे. परंतु एक नक्की झाले आहे. की केवळ विचारावर पक्ष चालणार नाही. त्यामुळे अनेक लहानसहान पक्ष संपण्याच्या मार्गावर आहेत. येथून पुढे चळवळ आणि राजकारण एकत्र करणे अवघड आहे.

एकच पॅटर्न चालत नाही, हे स्पष्ट झाले.

ते म्हणाले, मला शेतकर्‍यांनी नाकारले तरी मी त्यांना नाकारले नाही. मीही शेतकर्‍याचा मुलगा आहे. मी माझे आयुष्य शेतकर्‍यांसाठी वाहिले आहे. त्यामुळे मी बाजूला का व्हावे. परंतु कामाची पध्दत थोडी बदलावी लागेल. गेल्या 30 वर्षापासून मी चळवळीत आहे. एकच पॅटर्न चालत नाही, हे स्पष्ट झाले. अनेकजण म्हणतात तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा पारदर्शकता घेवून आम्ही काय चाटायचे आहे काय, असा प्रश्न मला काहीजण विचारतात. आम्ही किती जण पदरमोड करायची. यावर काहीतरी उत्तर शोधावे लागेल. थोड्याच दिवसात कार्यकर्त्यांची एक व्यापक बैठक घेवून पुढील दिशा ठरविणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज