rajkiyalive

ajit pawar news : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!

सोलापूर : ajit pawar news : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार! : सलग सहा वेळा मोठ्या मताधिक्क्याने माढा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अजितदादा गटाचे जेष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी मात्र अजितदादांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे. यावेळी ते आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवत असून त्यांनी शरद पवारांची यासंदर्भात अनेक वेळा भेट घेतली आहे. कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचेकडे रणजीत शिंदे यांच्यासाठी उमेदवारी मागितली असून जर साहेबांनी उमेदवारी दिली नाही तर आपण मुलाला अपक्ष उभा करू अशी भूमिका घेतल्याने आता अजितदादांच्या अडचणीत वाढ होणार आहे. महायुतीतील तुमचं फिक्स तिकीट का नाकारता या विषयावर त्यांनी तो विषय आता संपलेला आहे, अशा एका वाक्यात उत्तर देत अजितदादा व महायुतीला निरोप दिला.

ajit pawar news : अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का, विद्यमान आमदार साथ सोडणार!

आमदारांचे पुतणे धनराज शिंदे हे बंडखोरी करत असल्याचे निदर्शनास सांगताच आमचा घरचा विषय ही संपला असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. भाजप आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील देखील तुतारी कडून निवडणूक लढवण्यास प्रयत्नात असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत, निवडणुकीत कोणीही येऊ दे आम्हाला फरक पडणार नाही, अशी भूमिका आमदार शिंदे यांनी स्पष्ट केली. काही दिवसापूर्वी अजितदादांची जन सन्मान यात्रा माढ्यात आली असता बबनदादा शिंदे यांनी त्यास हजेरी लावत मोठे शक्ती प्रदर्शनी केले होते. आता शरद पवारांकडे उमेदवारी मागितल्याने अजित पवार यांना माढ्यात कोणाला उभे करायचे हा प्रश्न पडणार आहे.

अपक्ष लढविण्याची तयारी

शरद पवार यांनी रणजीत शिंदे यांना तुतारी न दिल्यास राष्ट्रवादी अर्थात घड्याळावर उभे न राहता अपक्ष निवडणूक रिंगणात उतरवण्याची भूमिका बबनदादांनी घेतल्याने आता अजितदादांच्या घड्याळाचा उमेदवार कोण हा प्रश्न पुन्हा अनुत्तरीत राहणार आहे. काही दिवसांपूर्वी अजितदादांसोबत माढा आणि करमाळा या दोन्ही ठिकाणी स्टेजवर दिसणारे आमदार बबनदादा शिंदे यांनी आता मात्र तुतारी न मिळविल्यास अपक्ष मुलाला उतरवणार अशी भूमिका घेतल्याने बबन दादांचा अजित पवार यांच्यावरील विश्वास संपला का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

आमदार शिंदे यांचे दुसरे बंधू आणि करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी यापूर्वीच गेल्यावेळी प्रमाणे आपण याही वेळी अपक्ष निवडणूक लढविणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे, अजित दादांना आता या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण द्यायचा हा पेच निर्माण होणार आहे.

दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील राजकारण चांगलंच वळणं घेत असून माढा, मोहोळ, करमाळा आणि पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात चुरशीच्या लढतींपूर्वीच उमेदवारीवरुन चांगलीच रस्सीखेंच पाहायला मिळत आहे. तर, शरद पवार यांनी म्हटल्याप्रमाणे एकामागून एक धक्के ते देताना दिसून येतात.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज