rajkiyalive

ajit pawar news : दादा हे वागणं बरं नव्हं… 25 वर्षे सत्तेत असताना चालले आता आरोप करताय…

dineshkumar aitawade 9850652056

ajit pawar news : दादा हे वागणं बरं नव्हं… 25 वर्षे सत्तेत असताना चालले आता आरोप करताय…:अजितदादा गेल्या 25 वर्षापासून इस्लामपूरचे जयंत पाटील आणि तासगावच्या आर. आर. पाटलांसोबत तुम्ही खांद्याला खांदा लावून काम केलात. एवढेच नव्हे तर आर. आर. पाटलांच्या निधनानंतर तुम्ही त्यांना खांदा द्यायला पुढे होतात आणि आता तुम्ही आरोप करताय की आर. आर. पाटीलांनी केसाने गळा कापला अन् जयंत पाटील गोड बोलून काटा काढतात म्हणून 25 वर्षानंतर तुम्हाला उपरती आली, दादा हे वागणं बरं नव्हं….

ajit pawar news : दादा हे वागणं बरं नव्हं… 25 वर्षे सत्तेत असताना चालले आता आरोप करताय…

1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यांच्या सोबत राज्यातून पहिली साथ दिली तरी जयंत पाटील आणि आर. आर. पाटील यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता या दोघांनी शरद पवारांवर विश्वास ठेवून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यावेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोघांनी यश मिळवले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीची सत्ता आली अन या सतेत आर. आर. पाटील, जयंत पाटील आणि अजित पवार तिघेही मंत्री होते. तेेंव्हापासून हे तिघे जेंव्हा जेंव्हा राष्ट्रवादीची सत्ता आली तेंव्हा तेंव्हा मंत्री झाले आणि एकमेकांच्या विचाराने काम करू लागले. राज्यात राष्ट्रवादी वाढविण्यासाठी या तिघांनीही अटोकाट प्रयत्न केले.

आर. आर. आबांवरतर शरद पवारांचा फार जिव. आबा गेल्यावर अजित पवारांनीच त्यांना खांदा दिला होता. आबांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांकडे कुणी वाकड्या नजरेने पाहू नये असा इशाराही त्यांनी दिला होता.

जयंत पाटील यांनी काय केले असा सवाल त्यांनी प्रचार सभेत केला. राजारामबापू यांनी संस्था उभारल्या आणि जयंत पाटील यांनी त्या चालविल्या असा आरोप त्यांनी केला. परंतु आज सहकार चळवळीला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्यात आणि राज्यात सहकाराची काय अवस्था झाली आहे हे अजित पवारांना चांगले ठावूक आहे. त्या सहकारी संस्था टिकविणे सोपे काम नसताना जयंत पाटलांनी त्या टिकविल्या आहेत.

जयंत पाटलांनी सुरू केेलेल्या आर. आय. टी. कॉलेजचे नाव आज वालचंद कॉलेजनंतर सर्वात पहिल्यांदा घेतले जाते. आर. आर. टी. मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडतात. या कॉलेजमुळे मतदार संघातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. जयंत पाटलांनी सुरू केलेल्या तीन साखर कारखान्यामुळे शेतकर्‍यांना आपल्या उसाची चिंता राहिली नाही. दरामध्येही कारखाने सर्वात पुढे असतात.
दूध संघ, कारखाना, सूत गिरणी, बँक, शिक्षण संस्थांमध्ये आज हजारो लोकांच्या हाताला काम मिळून त्यांचे घर चालले आहे. गेल्या सातही निवडणुकीत जयंत पाटलांचे मताधिक्य वाढतच चालले आहे याचे तुम्ही साक्षीदार आहात. जयंत पाटलांच्या कित्येक कार्यक्रमात तुम्ही त्यांचे गोडवे गायले आहे.

त्यांच्या अनेक प्रचार सभा तुम्ही गाजविला आहात. आणि आज सत्तेसाठी विरोधात गेल्यावर तुम्हाला आर. आर. पाटील आणि जयंत पाटील यांच्यावर टीका करावीशी वाटली. अजितदादा तुमचे हे वागणं बरं नव्हे… असेच म्हणावे लागले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज