ajit pawar news : शेतकर्यांची कर्जमाफी नाहीच : सगळी सोंगं करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही – अजित पवार: राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत येऊन जवळपास चार महिने झाले आहेत. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अद्यापही सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही.शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनावर अर्थमंत्री अजित पवार म्हणाले की, सगळी सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही.तेव्हा आपापल्या पिककर्जाचे पैसे 31 मार्च पुर्वी भरा असे एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट करत महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांना हरताळ फासला असल्याचे दिसून येते.
ajit pawar news : शेतकर्यांची कर्जमाफी नाहीच : सगळी सोंगं करता येतात पण पैशाचे सोंग करता येत नाही – अजित पवार
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीमधील भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या नेत्यांनी शेतकर्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. एवढंच नाही तर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र, सरकार सत्तेत आल्यानंतर आता त्या घोषणा हवेतच विरल्याचं पाहायला मिळत आहे.शेतकर्यांच्या कर्जमाफीवर सुद्धा सरकार काही बोलण्यास तयार नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेत आलं, त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये मिळण्याची आशा होती. मात्र, आता महायुती सरकार लाडकी बहीण योजनेबाबत नवीन निकष लावणार असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात महायुतीच्या काही नेत्यांनी सूचक विधानेही केले आहेत.
ajit-pawar-news-no-loan-waiver-for-farmers-you-can-do-everything-but-you-cant-do-money-ajit-pawar
यातच राज्यातील शेतकर्यांना कर्जमाफी होईल, अशी आशा लागलेली असताना.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाष्य केलं. यावेळी बोलताना त्यांनी शेतकर्यांची कर्जमाफी होणार की नाही? याबाबत मोठं भाष्य केलं आहे. अजित पवार यांनी मी सभागृहात उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळी सोंग करता येतात, पण पैशाचं सोंग करता येत नाही. मी महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगतो. 31 मार्चच्या आत आपआपले पीक कर्जाचे पैसे भरा, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.याचा अर्थ शेतकर्यांची कर्जमाफी, लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासनं हा एक निवडणूक जुमला होता असे दिसते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



