rajkiyalive

almati dam news : अलमट्टीमुळे महापूराचा धोका नाही – लक्ष्मण सवदींचा महाराष्ट्राला सल्ला

almati dam news : अलमट्टीमुळे महापूराचा धोका नाही – लक्ष्मण सवदींचा महाराष्ट्राला सल्ला : अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीचा सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही, असा ठाम दावा कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केला आहे. हिप्परगी बॅरेजची उंची अलमट्टीपेक्षा दोन मीटर अधिक असल्याने, अलमट्टी पूर्ण भरले तरीही ते हिप्परगी बॅरेजच्या पातळीखाली राहतं, हे लक्षात घेतलं पाहिजे, असे ते म्हणाले.

almati dam news : अलमट्टीमुळे महापूराचा धोका नाही – लक्ष्मण सवदींचा महाराष्ट्राला सल्ला

अथणी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सवदी बोलत होते. त्यांनी सांगितले की, “अलमट्टीची प्रस्तावित उंची 524 मीटर असून, सध्या ते 519 मीटरवर आहे. हिप्परगी बॅरेजची उंची 526 मीटर असल्याने, अलमट्टी भरल्यावरही पाणी हिप्परगीपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापुरात पूरस्थिती उद्भवते, हा दावा तांत्रिकदृष्ट्या आधारहीन आहे.”

ते पुढे म्हणाले, “महाराष्ट्रातील काही नेते आणि अधिकारी या विषयावर अज्ञान पसरवत आहेत. त्यांनी आधी धरणांच्या उंचीची योग्य माहिती घ्यावी आणि मगच तक्रारी कराव्यात.”

almati-dam-news-there-is-no-risk-of-major-floods-due-to-almatti-laxman-savadis-advice-to-maharashtra

सवदी यांनी स्पष्ट केले की, अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीचे सर्व तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेचे काम पूर्ण झाले असून, आता फक्त गेट बसविण्याचे काम बाकी आहे. उंचीवाढीनंतर अंदाजे 1.3 लाख एकर जमीन संपादित करण्यात येणार असून, यातील 72 हजार एकर जमिनीत पाणी साचेल. उर्वरित क्षेत्रात पुनर्वसनाची व्यवस्था केली जाईल आणि एकूण 65 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल.

“या प्रकल्पात यापूर्वीच खूप विलंब झाला आहे. आता पुढील टप्पे जलदगतीने पूर्ण करू,” असा निर्धारही सवदी यांनी व्यक्त केला.

सवदी यांनी अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीबाबत महाराष्ट्रातील भीती फोल असल्याचे स्पष्ट करत, पूरस्थितीचा संबंध चुकीच्या माहितीशी जोडला जात असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, हा विषय भावनात्मक न करता तांत्रिकदृष्ट्या समजून घेणे आवश्यक आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज