राजाराम पाटील / जनप्रवास
तासगाव्-कवठेमहांकाळ मतदार संघाच्या नेतृत्वासाठी युवा नेत्यांची फौज सरसावली : तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते रोहित दादा पाटील,भाजपाचे युवा नेते प्रभाकर बाबा पाटील, शेतकरी विकास आघाडीचे युवा नेते राजवर्धन घोरपडे व बसपाचे जिल्हाध्यक्ष शंकर दादा माने हे युवा नेते विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. मतदार संघाच्या नेतृत्वासाठी युवा नेत्यांची फौज पुढे सरसावली आहे.
तासगाव्-कवठेमहांकाळ मतदार संघाच्या नेतृत्वासाठी युवा नेत्यांची फौज सरसावली
लोकसभा निवडणुकी नंतर आता विधासभेच्या जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. स्व.आर.आर.आबा पाटील यांचे चिरंजीव रोहीत पाटील , माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे चिरंजीव राजवर्धन घोरपडे यांना भावी आमदार लॉचिंग केले आहे. बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष व शंकर माने यांनी विधानसभेची आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पाटील यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे.
गेल्या चार पाच वर्षात रोहीत पाटील यांनी विधानसभा मतदार संघातील गावांचा संपर्क वाढविला आहे. नेतेमंडळीशी रोहीत पाटील यांचा चांगला संबंध आहे.विकास कामात अग्रेसर असतात. लोकसभा निवडणुकीतील मतदानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळीमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
माजी खासदार संजय काका पाटील यांचे चिरंजीव प्रभाकर पाटील यांना भावी आमदार म्हणून ओळखले जात आहे.
दोन्ही तालुक्यातील सर्वच गावांत व वाडी वस्तीवर प्रभाकर पाटील पोहचले आहेत. गेल्या चार वर्षांपासून प्रभाकर पाटील यांनी संपर्क वाढविला आहे.विविध विकास कामांचा पाठपुरावा प्रभाकर पाटील यांनी केला आहे.संजय काका पाटील यांच्या पराभवाला न डगमगता पुन्हा विधान सभेला यश मिळविण्यासाठी जोमाने कामाला लागले आहेत.
माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे चिरंजीव राजवर्धन घोरपडे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सध्या दुध संघाची व विविध संस्थाची जबाबदारी राजवर्धन घोरपडे यांच्यावर आहे.व्यवसाय,समाजकारण व राजकारणात सातत्याने अग्रेसर असतात. विकास आघाडीचे स्वाभिमानी कार्यकर्ते ही त्यांची जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांच्या विजयामुळे घोरपडे समर्थकांचा आत्मविश्वास वाढला आहे.राजवर्धन घोरपडे यांचा संपर्क चांगला आहे.
तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात बहुजन समाज पार्टीने एन्ट्री केली आहे.
बसपाचे जिल्हाध्यक्ष शंकर माने यांचे संघटन चांगले आहे. आहार योजना व बांधकाम कामगारां साठीचे काम ही शंकर माने यांची जमेची बाजू आहे.विविध प्रश्न सोडवण्यासाठी शंकर माने आघाडीवर असतात.विध्यार्थी वर्गासाठी शिष्यवृत्ती योजना व अर्थसहाय्य यासाठी शंकर माने अग्रेसर आहेत.कामगार व महिला संघटन करीत आहेत.
एकंदरीत विचार करता तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकीत चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भावी आमदार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. युवा नेत्यानी संपर्क वाढविला आहे. नेतृत्व करण्यासाठी युवा नेत्यांची फौज सरसावली असल्याचे दिसून येत आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



