rajkiyalive

माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरूवात, केवळ 15 दिवसच मुदत

माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरूवात, केवळ 15 दिवसच मुदत : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी सोमवार 1 जुलैपासून अर्ज करता येणार असून त्याचे संकेतस्थळ लाभार्थींना उपलब्ध करून दिले जाईल. प्राप्त अर्जांची पडताळणी अंगणवाडी पर्यवेक्षक, प्रकल्प अधिकारी, अंगणवाडी सेविका करतील. ग्रामसेवक देखील अर्जांची पडताळणी करू शकतात. त्यांच्याकडील अर्ज आमच्याकडे आल्यावर आम्ही यादी अंतिम करून जिल्हाधिकार्‍यांकडे सादर करू. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखालील समिती लाभार्थींची अंतिम यादी जाहीर करेल आणि त्यांना लाभ मिळेल.

माझी लाडकी बहिण योजनेसाठी 1 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरूवात, केवळ 15 दिवसच मुदत

नुकतेच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जाहीर केली आहे. त्यामुळे महिला वर्गात समाधानाचे वातावरण आहे. परंतु या योजनेसाठी सर्वच महिला पात्र ठरतील असे नाही. यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. या योजनेनुसार महिलांना महिन्याला 1,500 हजार रुपये थेट बँक खात्यात मिळणार आहेत. त्याची अंमलबजावणी जुलैपासूनच करण्यात येणार आहे.

ज्याच्या कुटुंबात आयकर दाता आहेत. त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, अशा कुटुंबातील महिलांना लाभ मिळणार नाही.

महाराष्ट्र शासनाच्या इतर अनेक योजना आहेत. त्या योजनेमधून जर 1,500 रुपयांपेक्षा जास्त लाभ घेत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन आहे, तसेच चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळून) आहेत अशा कुटुंबातील महिलांनाही योजनेचा लाभ मिळणार नाही.

इतर अटी खालीलप्रमाणे

– लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त नसावे.
– लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
– राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला.
– योजनेचा लाभ वयाची 21 वर्षे पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत मिळेल.
– योजनेच्या लाभासाठी अर्ज करणार्‍या महिलांचे बँक खाते असणे आवश्यक.
– ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार/आमदार आहे, अशा महिलाही या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे,

1) योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज
2) लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
3) महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्म दाखला.
4) सक्षम प्राधिकार्‍याने दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला.
5) बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत.
6) पासपोर्ट आकाराचा फोटो
7) शिधा पत्रिका (रेशन कार्ड)
8) योजनेच्या अटी शर्तींचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज कसा भरायचा?
योजनेसाठी अर्ज पोर्टल, मोबाईल अ‍ॅप, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन अर्ज करता येईल.

पात्र असलेली महिला ऑनलाईन अर्ज करू शकते. पण, ज्या महिलेला ऑनलाईन अर्ज करता येत नाही, त्यांच्यासाठी अंगणवाडी केंद्र, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय (नागरी, ग्रामीण, आदिवासी), ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असतील.

भरलेला अर्ज अंगणवाडी केंद्रात, बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्रात नियुक्त कर्मचार्‍यांद्वारे ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात येईल. अर्ज दाखल केल्यानंतर पोच पावती दिली जाईल.
अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल. अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई केवायसी करता येईल. त्यासाठी महिलेने कुटुंबाचे ओळखपत्र म्हणजे शिधा पत्रिका (रेशन कार्ड) आणि स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज