ashta accident news : आष्ट्यात डंपर – दुचाकी धडकेत तिघे ठार एक गंभीर : आष्टा : इस्लामपूर – आष्टा रस्त्यावर शिंदे मळा नजीक, हॉटेल नंदनवन समोर दुचाकी व खडी वाहतूक करणारा डंपर यांची समोरासमोर धडक होऊन कुंडलवाडी ता.वाळवा येथील पटेल कुटुंबियातील तीन ठार तर एक महिला जखमी झाली आहे. ही घटना बुधवार दि. 26 मार्च रोजी दुपारी चार वाजणेच्या दरम्यान घडली.
ashta accident news : आष्ट्यात डंपर – दुचाकी धडकेत तिघे ठार एक गंभीर
अशपाक शबीर पटेल वय 39, अशरफ अशपाक पटेल वय 12 व असद अशपाक पटेल वय 10 हे तिघे जागीच ठार झाले. तर हसीना अशपाक पटेल वय 35 या गंभीर जखमी झाल्या. जखमी हसीना यांना उपचारासाठी सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनास्थळ व आष्टा पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हिरो होंडा स्प्लेनडर प्लस मोटारसायकल क्र.एम.एच.10 बी.डी.2819 वरून अशपाक पटेल, पत्नी हसीना, मुलगा अशरप व असद हे मिरज येथून ईदचे साहित्य खरेदी करून इस्लामपूरच्या दिशेने चालले होते. ते आष्टा, शिंदे मळा येथे हॉटेल नंदनवन समोर आले असता समोरून भरधाव वेगाने आष्ट्याच्या दिशेने येणारा खडी वाहतूक करणारा डंपर क्र. एम.एच.10 डी. टी.0468 यांची समोरा समोर धडक झाली. यात दुचाकीवरील चौघेही उडून रस्त्यावर फेकले गेले. चौघांच्याही डोकिस जोरात मार लागलेने अशपाक पटेल त्यांचा मुलगा अशरप व असद हे जागीच ठार झाले.
आशपाक यांच्या पत्नी हसीना गंभीर जखमी झाल्या. जखमी हसीना यांना उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल आले. धडक एवढी मोठी होती की, डंपरची उजवी चालक साईडची बाजू चेपली असून काच फुटली तसेच डंपर मधील खडी रस्त्यावर विखुरली. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी आलेल्या नातेवाईकांनी आक्रोश केला.
ashta-accident-news-three-killed-one-critically-injured-in-dumper-bike-collision-in-ashta
मृत अशपाक पटेल हे आचारी काम करीत होते. तर मयत अशरप पाचवीत तर असद तिसरीत शिकत होता. त्यांच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. ही बातमी कुंडलवाडी येथे समजताच गावातील लोकांनी आष्टा येथे घटनास्थळी तसेच मृतांना शवविच्छेदन नेण्यात आलेल्या आष्टा ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली होती.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



