rajkiyalive

atpadi crime news : त्या नराधमावर कारवाई करा, अन्यथा घरातून बाहेर काढून चौकात मारू : माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख

आटपाडीत धडक निषेध मोर्चा :कडकडीत बंद

जनप्रवास आटपाडी :-

atpadi crime news : त्या नराधमावर कारवाई करा, अन्यथा घरातून बाहेर काढून चौकात मारू : माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख : त्या नराधमाला प्रशासनाने कडक करावाई करावी अन्यथा तो जामीनावर सुटला तर त्याला आम्ही घरातून बाहेर काढून चौकात मारू असा इशारा माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी प्रशासनाला दिला आहे.आटपाडी शहरातील शाळकरी मुलीला जबरजस्तीने चारचाकी गाडीत घालून अत्याचार प्रकरणी संग्राम देशमुख व त्यांची साथीदार सुमित्रा लिंगरे यांच्यावर प्रशासनाने फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आटपाडीत सर्वपक्षीय व नागरिकांनी बंद पुकारारून प्रशासनाकवर धडक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.

atpadi crime news : त्या नराधमावर कारवाई करा, अन्यथा घरातून बाहेर काढून चौकात मारू : माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख

शुक्रवारी आटपाडीत सर्व व्यवहार बंद ठेवून धडक मोर्चात महिला,शाळेय विद्यार्थीनी,सर्वपक्षीय नेतेमंडळी यांच्यासह नागरिकांनी झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करत घोषणा दिल्या. आटपाडीत धडक निषेध मोर्चावेळी तहसिलदार सागर ढवळे यांनी मोर्चा सहभाग घेऊन निवदेन स्वीकारले आणि आरोपीला कडक कारवाई करण्यासाठी आश्वासन दिले.

आटपाडी तालुक्याच्या इतिहासात पाहिल्यांदाच अशी घटना घडली आहे.तालुक्यातील मुली चांगल्याप्रकारे शिक्षण घ्याव्यात यासाठी आम्ही शाळा,महाविद्यालय उभे केले आहेत.आता महाविद्यालयात मुलीसाठी कराटीचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यामुळे मुली आपले संरक्षण चांगल्याप्रकारे करीतल.मुलीसुध्दा सुरक्षीत शाळेत येते आपल्या आई वडीलाचे ऐकने हे सुध्दा काळाची गरज आहे.संग्राम देशमुख याला फाशी शिक्षा दिली पाहिजेल असे आपल्याला वाटते.संविधान कसे वाचायचे किंवा नाही हे वकील करत आहेत.वकील संघटनेने याबाबत पुढाकार घ्यावा.अन्यथा शासकीय वकील उभा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.तरी सुध्दा सदर आरोपी संग्राम देशमुख जामीनावर सुटला तरी आम्ही घरातून बाहेर काढून चौकात मारू.कोणत्याही जाती धर्मात अशा अत्याचाराचा प्रकार खपऊन घेणार नाही.अशा प्रकारे पुन्हा गुन्हा घडणार नाही.त्यासाठी या गुन्ह्याची दाखल घेतली पाहिजेल असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी केले.

प्रशासनाने संग्राम देशमुख यांची आटपाउी शहरातून डिड काढली पाहिजेल होती.आम्ही माता भगिनीना सुरक्षा देण्यासाठी आजचा धडक मोर्चा काढला आहे.प्रशासनाना विनती वगैरे करणार नाही.जी घटना झाली आहे.त्यांमधील आरोपीला कडक शासन झाले पाहिजेल.आटपाउीतील घटनेबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे आम्ही भेटलो आहे.प्रशासनाने महिल्यावर अत्याचार करणा-यांना वेळेत कडक कारवाईन केली पाहिजेल.तालुक्यातील महिलांनी सुध्दा कोण त्रास देत असले त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली पाहिजेल.त्यांच्यावर कारवाईसाठी आम्ही पुढाकार घेऊन असे आवाहन माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी निषेध मोर्चात केले.

शाळेतून घरी जाणा-या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने गाडीतून नेवून तिच्यावर अत्याचाराची घटना उजेडात आली.त्या कृतीचे हिव्हीओ बनवून पुन्हा चाकूचा धाक दाखवून त्याच अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला.यामध्ये दोषी संग्राम देशमुख आणि तिला मदत करणारी सुमित्रा लिंगरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी देान्ही ओरापीना पोलिसांनी अटक केली आहे.या घटनेबाबत आटपाउी शहरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

त्यानंतर आता समाजातील सर्व घटकांच्य सहभगाने आटपाडीत निषेध मोर्चा आणि आटपाडी बंद करण्यात आला.अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणा-या संग्राम देशमुख यांने कुटुंबालाही जीवे मारण्याची धमकी दिली आहे.त्यामुळे कुटुंबाला पोलिस सरंक्षण द्यावे अशी मागणी होत आहे.जिमच्या नावाखाली तो अवैध धंदा करत होता.तसेच त्यांने अनेक कांड केल्याची चर्चा आहे.तो यापुर्वी जेथे जेथे वास्तव्यास होता.तेथेही असेच उद्योग केले आहेत.या दोषीसोबत हितसंबंध असणा-याचाही शोध घेवून कारवाई करावी अशी मागणी करत पोलिसांसह प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज