rajkiyalive

HATKANANGLE LOKSABHA : आवाडेंच्या एंन्ट्रीने समीकरणे बदलली

दिनेशकुमार ऐतवडे

HATKANANGLE LOKSABHA : आवाडेंच्या एंन्ट्रीने समीकरणे बदलली : दिवसेंदिवस हातकणंगले लोकसभा मतदार संघातील रंगत वाढू लागली आहे. अगोदरच चौरंगी झालेल्या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांनीही मेळावा घेवून आपण लोकसभेच्या मैदानात उतरत असल्याचे जाहीर केल्याने मतदार संघातील सर्वच समिकरणे बदलली आहेत. एकेकाळी रूकडीच्या बाळासाहेब माने यांचे वर्चस्व असलेल्या इचलकरंजी कम हातकणंगले लोकसभा मतदार संघ गेल्या 25 वर्षात हलता राहिला आहे. बाळासाहेब माने यांच्यानंतर निवेदिता माने, कल्लापाण्णा आवाडे, राजू शेट्टी आणि धैर्यशील माने यांनी या मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. बाळासाहेब माने यांच्यानंतर सलग तीनवेळा या मतदार संघातून कोणच निवडून गेला नाही. माने, आवाडे आणि राजू शेट्टी यांची या मतदार संघावर वर्चस्व राहत आले आहे.

HATKANANGLE LOKSABHA : आवाडेंच्या एंन्ट्रीने समीकरणे बदलली

यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शाहूवाडी पन्हाळाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी, वंचित आघाडीकडून डि. सी. पाटील आणि आता ताराराणी पक्षाकडून विद्यमान आमदार प्रकाश आवाडे रिंगणात उतरले आहेत. अजून कुणीच अर्ज दाखल केला नसले तरी येथे पंचरंगी लढत होईल असेच वातावरण आहे.

चौरंगी लढत होईल असे वाटत असतानाच प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी जाहीर करून बॉम्ब टाकला आहे.

प्रकाश आवाडे स्वत: इचलकरंजी मतदार संघाचे आमदार असून, हातकणंगले आणि शिरोळा विधानसभा मतदार संघातही त्यांचा मोठा गट आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी मतदार संघातून धैर्यशील माने यांना 75 हजार मताचे लीड त्यांनी दिले होते. येथेच राजू शेट्टींचा पराभव झाला होता. इचलकरंजी मतदार संघ शहरी मतदार संघ आहे. येथे एकगठठा मतदान ते मिळवू शकतात. परंतु उरलेल्या पाच विधानसभा मतदार संघात त्यांची कसोटी लागणार आहे. कारण म्हणावे तेवढा संपर्क त्यांचा इतर मतदार संघात नाही. असे असले तरी कोणाला तरी पाडायला ते कारणीभूत ठरू शकतात हे नक्की.

राजू शेट्टी यांनी 2009 मध्ये स्वबळावर आणि 2014 मध्ये मोदी लाटेवर निवडून आले होते.

सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक विधानसभा मतदार संघात शेतकर्‍यांच्या जिवावर त्यांनी आपली उमेदवारी घोषित केली आहे. शिरोळ विधानसभा मतदार संघ हा त्यांचा हक्काचा मतदार संघ असला तरी येथे विरोधी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर निवडून आले आहेत. येथे त्यांच्या विरोधात उल्हास पाटील, गणपतराव पाटील आणि राजेेंद्र पाटील यड्रावकर यांनी रान उठवले आहे.

धैर्यशील माने यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत इचलकरंजी, शाहूवाडी पन्हाळा, हातकणंगले या मतदार संघात लीड घेवून विजयी झाले.

यंदा परिस्थिती वेगळी आहे. यंदा त्यांच्या हक्काचा एकही विधानसभा मतदार संघ राहिला नाही. कारण इचलकरंजीमधून स्वत: प्रकाश आवाडे, शाहूवाडीमधून स्वत: सत्यजित पाटील सरूडकर, शिरोळमधून स्वत: राजू शेट्टी आणि इस्लामपूर आणि शिराळा येथे तर ते सुमारे 40 हजाराने मागे पडले होते. त्यामुळे त्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे.

सत्यजित पाटील सरूडकरांना यंदा स्वत:चे शाहूवाडी, जयंत पाटील यांचे इस्लामपूर, मानसिंगराव नाईक यांचे शिराळा हे हक्काचे विधानसभा मतदार संघ मिळाले आहेत.

हातकणंगले विधानसभेतही सहयोगी काँग्रेसचे राजू आवळे आमदार आहेत. त्यामुळे तेथेही थोडीफार त्यांना मदत मिळेल. शिरोळमध्येही उल्हास पाटील आणि गणपतराव पाटील त्यांच्या दिमतीला आहेत. इचलकरंजीमध्येही त्यांना थोडीफार आशा आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डि. सी. पाटील हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे स्वताचे मोठे सर्कल नसले तरी वंचितच्या नावावर ते लाख दिड लाख मते घेवू शकतात त्यामुळे त्यांचे उपद्रव्यमूल्य कोणाच्या पराभवाला कारणीभूत ठरतात हे लवकरच ठरेल.

एकंदरीत चौरंगी वाटत असतानाच आमदार प्रकाश आवाडे यांनी लोकसभेच्या रणांगणात रंगत आणली आहे. निवडणूक पंचरंगी होवून जोरदार होईल यात काही शंकाच नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज