rajkiyalive

आवाडेंशी दुश्मनी शेेट्टींच्या मुळावर

 

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056

जनप्रवास

(swabimani shetkari sangtna) भाजपचे सहयोगी सदस्य इचलकरंजीचे आमदार प्रकाश आवाडे यांनी नुकतेचे जवाहर सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्यावर सावकार मादनाईक यांच्या उपस्थितीत भलतेच तोंडसुख घेतले. यावरून आता आवाडे आणि राजू शे्ट्टी यांच्यातील वाद वाढत चालला आहे. याचा फटका नेमका कोणाला बसणार हे येणार्‍या लोकसभा निवडणुकीतच कळणार आहे. मात्र आवाडेंशी दुश्मनी राजू शेट्टींच्या मुळावर उठणार यात काही शंका नाही.

सध्या सर्वच सहकारी संस्थांचे वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू आहेत. यंदा उसाचे उत्पन्न घटणार आहे. सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या उसाला सोन्याचे भाव येणार आहेत. काही कारखान्यांनी या अगोरदरच 3100 ते 3200 प्रतिटन दर दिले आहेत. गेल्या वर्षीच्या हंगामातील उसाला दुसरा हप्ता प्रतीटन 400 रूपये दर द्या, अशी मागणी करीत स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढला होता. या मोर्चाप्रसंगी उसाचा दुसरा हप्ता चारशे रुपये देण्यावरून स्वाभिमान शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. संघटनेने काढलेल्या मोर्चा वेळी कारखानदारांच्या कानशिलात ओढू असे राजू शेट्टी यांनी वक्तव्य केले होते. त्यावर जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आमदार प्रकाश आवाडे यांनी कानशिलात लगावण्याची भाषा करणार्‍यांना सभेतून बाहेर जाऊ देणार नाही असा सज्जड दम भाषणातमून दिला.

हेही वाचा

शेतकरी संघटना, अभावग्रस्तांचा प्रभाव

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

काय म्हणाले आवाडे?

आवाडे म्हणाले, हे सरकार आमचे आहे. शेतकर्‍यांचे आहे. सर्वांचे आहे. गोरगरीबांचे आहे. परंतु कोणी जर कानशिलात लगावण्याची भाषा करणार असाल तर सभेतून बाहेर जाऊ देणार नाही असा सज्जड इशारा त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव न घेता दिला होता. यावेळी त्यांनी शेट्टींच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले तोंडाला लगाम घाला, आपण काय बोलतोय याचे भान ठेवून बोला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते सावकार मादनाईकही यावेळी उपस्थित होते.

स्वाभिमानीचे महत्वाचे नेते महेश खराडे, संदीप राजोबा यांनी आमची ताकद दाखवून देवू असा इशारा आवाडे यांना दिला आहे.

या घटनेवरून आता राजकीय घमासान सुरू झाले आहे. स्वाभिमानीचे महत्वाचे नेते महेश खराडे, संदीप राजोबा यांनी आमची ताकद दाखवून देवू असा इशारा आवाडे यांना दिला आहे. परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहिली तर आवाडे थोडे सर्वांनाच वरचढ दिसत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत आवाडे यांच्या इचलकरंजी विधानसभा मतदार संघातून राजू शेट्टी 75 हजार मताने पिछाडीवर पडले होते. निवडणूक झाल्यानंतर पराभवाचे सर्व खापर केवळ आवाडेंवर ङ्खोडण्यात आले. कारण लोकसभेच्या सहा ङ्कतदार संघात राजू शेट्टी यांना सर्वात कङ्की ङ्कते इचलकरंजी ङ्कतदार संघात पडली होती. त्यावेळीपासून आवाडे आणि राजू शेट्टी यांच्यातील राजकीय वैर वाढतच गेले आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघ कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यामध्ये दुभागला आहे.

हातकणंगले लोकसभा मतदार संघ कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यामध्ये दुभागला आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा ही दोन विधानसभा मतदार संघ तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, इचलकरंजी, पन्हाळा, आणि हातकणंगले विधानसभा मतदार संघ या सहा विधानसभा मतदार संघांचा समावेश होतो.

राजू शेट्टी यांची सध्याच्या भूमिका एकला चलो रे

सध्या शिरोळामधून राजेंद्र पाटील यड्रावकर, इचलकरंजीमधून स्वत प्रकाश आवाडे, हातकणंगलेमधून राजू आवळे, पन्हाळामधून विनय कोरे, इस्लामपूरमधून जयंत पाटील आणि शिराळा येथून मानसिंगराव नाईक हे आमदार विधानसभेला निवडून आले आहेत. यामध्ये सध्या इंडिया आघाडीकडून राजू आवळे, जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक आहेत तर भाजपच्या आघाडीच्या बाजूने प्रकाश आवाडे, विनय कोरे आणि राजेंद्र पाटील यड्रावकर हे आमदार आहेत. राजू शेट्टी यांची सध्याच्या भूमिका एकला चलो रे अशी आहे.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शे्ट्टी यांनी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रवादीच्या निवेदिता मानेंचा पराभव केला

2009 च्या लोकसभा निवडणुकीत राजू शे्ट्टी यांनी पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रवादीच्या निवेदिता मानेंचा पराभव केला होता. त्यावेळही त्यांची भूमिका एकला चलोरेही अशीच होती. 2014 च्या निवडणुकीत देशात मोदी लाट होती. राजू शेट्टी यांनी भाजपची साध धरली आणि हातकणंगलेची जागा पदरात पाडून घेतली. त्यावेळी त्यांनी बलाढ्य समजल्या जाणार्‍या काँग्रेसच्या कल्लापाण्णा आवाडे यांचा दारूण पराभव केला. त्या पराभवाची सल अजूनही प्रकाश आवाडे आणि राहूल आवाडे यांच्या मनात आजही आहे.

2019 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी भाजपपासून फारकत घेतली.

2019 च्या निवडणुकीत राजू शेट्टी यांनी भाजपपासून फारकत घेतली. त्यांचे साथीदार सदाभाउ खोत यांच्याशी त्यांचे बिनसले आणि त्यांनी काँग्रेस आघाडीत प्रवेश केला. काँगे्रस आणि राष्ट्रवादीकडेही तोलाचा उमेदवार नव्हता. त्यांनी राजू शेट्टी यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकली. धैर्यशिल माने यांनी हातात शिवबंधन बांधले आणि शिवेसेनेची उमेदवारी मिळवली आणि शेटटी यांच्या विजयाची हॅँटट्रीक रोखली.
गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

हेही वाचा

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

१८ ऊस वाहतूकदारांची मुकादमांकडून कोट्यवधीची फसवणूक

यंदा ऊस खाणार भाव, 3500 रुपये शक्य

कोणतीही चळवळ फार काळ चालत नाही असा इतिहास आहे.

2009 प्रमाणे एकला चलोरेची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्याच धर्तीवर आपण जिंकू असा त्यांना विश्वास आहे. परंतु 2009 आणि 2024 मध्ये भरपूर बदल झाला आहे. कोणतीही चळवळ फार काळ चालत नाही असा इतिहास आहे. यापूर्वी अनेक चळवळी आल्या आणि गेल्या. त्यामुळे संघटनेची धगही सध्या कमी झाली आहे. स्वाभिमानीचेही छकले उडाली आहेत. एकट्याच्या जिवावार निवडणूक जिंकणे, सत्ता प्रस्थापित करणे आता सोपे नाही. सध्या आघाडीचे राजकारण आहे. त्यामुळे राजू शेट्टी यांना कोणत्या तरी आघाडीत समाविष्ट होणे गरजेचे आहे.

राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे आणि विनय कोरे यांच्याशी त्यांचे जमेल अशी चिन्हे नाहीत.

राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आवाडे आणि विनय कोरे यांच्याशी त्यांचे जमेल अशी चिन्हे नाहीत. प्रकाश आवाडे जुना वाद उकरून काढण्याची चिन्हे आहेत. यड्रावकर यांच्याशी त्यांचा शिरोळमध्यच सामना होणार आहे तर विनय कोरे यांच्याशी त्यांचे उस दरावरून पूर्वीपासून वांदे आहेत. त्यामुळे एकला चलोे रेे भूमिका त्यांना सध्यातरी लाभदायी ठरणार नाही. त्यातच आवाडेंनी यांनी त्यांच्या विरोधात उघडउघड भूमिका घेतल्याने आता आवाडे आणि राजू शेट्टी यांच्यातील वाद विकोपाला जाणार यात शंका नाही.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज