rajkiyalive

बनावट नोटा प्रकरण : तब्बल 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात? : कतारला पळून जाण्याचा होता प्लॅन.

सांगली :

बनावट नोटा प्रकरण : तब्बल 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात? : कतारला पळून जाण्याचा होता प्लॅन. : शहरातील आकाशवाणी केंद्राजवळ बनावट नोटा चलनात आणण्यासाठी आलेल्या मिरजेतील अहद अहमदअली शेख याला जेरबंद करून 1 लाख 90 हजार रुपये किमतीच्या जुन्या 50 रुपयांच्या बनावट नोटांचे रॅकेट सांगली शहर पोलिसांनी उघडकीस आणले होते. अहद शेख याच्या चौकशीदरम्यान गेल्या सहा महिन्यांपासून त्याने 40 ते 50 लाखांच्या बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय पोलिसांना आहे.

बनावट नोटा प्रकरण : तब्बल 40 लाखांच्या बनावट नोटा चलनात? : कतारला पळून जाण्याचा होता प्लॅन.

दरम्यान, मोठ्या प्रमाणात बनावट नोटा छापल्यानंतर शेख हा सदरच्या व्यवसाय बंद करून कतार येथील सरकारचे एक कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्याचठिकाणी वास्तव्य करणार होता. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी आता त्याच्याकडून एक कॅनन कंपनीचा अडीच लाखांचा प्रिंटर आणि लॅपटॉप देखील जप्त केला आहे. बनावट नोटा घेणार्‍या एजंटांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरणचे पथक पेट्रोलिंग करत असताना कर्मचारी संतोष गळवे, गौतम कांबळे यांना आकाशवाणी केंद्राजवळ एकजण बनावट नोटा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खबर्‍यामार्फत मिळाली. यानंतर पोलिसांनी संशयित अहद शेख या तरुणास जेरबंद केले. यावेळी त्याच्याकडून 75 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

त्याच्याकडे कसून चौकशी केली असता मिरजेत त्याचा बनावट नोटा तयार करण्याचा कारखाना असल्याचे उघडकीस आले. यानंतर या कारखान्यावर छापा टाकून त्याठीकानाहून मोठ्या प्रमाणात जुन्या 50 रुपयांच्या बनावट नोटा, स्कॅनर, प्रिंटर, कटिंग मशीन, नोटा छापण्याचा उत्कृष्ट नमुण्याचा कागद, मशीन कटर, उत्कृष्ठ दर्ज्याची शाई, प्रिंटिंग मशीन कागदांची बंडले असा एकूण 3 लाख 90 हजारांचा मुद्देमाल मिळाला. सध्या शेख हा पोलीस कोठडीमध्ये आहे. शेख याने गेल्या सहा महिन्यांपासून बनावट नोटा छापण्यास सुरवात केली होती.

त्याने आतापर्यंत भारतीय चालनामध्ये 40 ते 50 लाखांच्या बनावट नोटा आणल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच कॅनन कंपनीचा प्रिंटर खरेदी करून त्याचे सॉफ्टवेअर ब्रेक करून त्यावर नोटांची प्रिंटिंग करत होता. सदरची प्रिंटिंग मशीन त्याने उधारीवर खरेदी केले होते. मात्र, पैसे दिले नसल्याने सदरची मशीन तो व्यक्ती घेऊन गेला होता. पोलिसांनी हि प्रिंटिंग मशीन देखील जप्त केली आहे. तसेच नोटांचे डिझाईन तयार करण्यासाठी जो लॅपटॉप शेख वापरात होता तोही पोलिसांनी जप्त केला आहे.

या प्रकरणात त्याच्याकडून नोटा कमिशनवर खरेदी करणारे पोलिसांच्या रडारवर आहेत. यात त्याचे काही साथीदार आहेत का याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरु आहे. मात्र, चलनात आणलेल्या बनावट नोटा शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

कतार सरकारचे कॉन्ट्रॅक्ट घेण्याचा प्रयत्न फसला…

अहद शेख हा प्रिंट व्यवसायातील कुशल कारागीर होता. त्याची स्टोरी हि फर्जी वेब सिरीज सारखीच आहे. त्याने बनावट नोटा बनविण्यासाठी सखोल अभ्यास केला. त्यासाठी लागणारी मशीन तयार केली. लॅपटॉपवर त्याचे डिझाईन बनवू लागला. शेख हा कॉम्पुटरला लागणार्‍या पीसीबीचे डिझाईन देखील प्रिंट करत असल्याने त्याला सॉफ्टवेअरचे ज्ञान होते. त्यामुळे प्रिंटिंग साठी त्याने कॅनन कंपनीचे अडीच लाखांचे मशीन घेतले.

त्याचे सॉफ्टवेअर ब्रेक करून तो पावडर कोटींग वापरून नोटा प्रिंट करत होता. गेल्या सहा महिन्यात 40 लाखांहून अधिक नोटा त्याने चलनात आणल्या. आता त्याने कतार सरकारशी कॉन्ट्रॅक्ट करण्याचे प्रयत्न सुरु केले होते. सदरचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तो त्याच ठिकाणी वास्तव्यास जाणार होता. मात्र, बनावट नोटा खपवण्याचा शेवटच्या प्रयत्नात पोलिसांच्या जाळ्यात अडकून कतारला पळून जाण्याचा प्लॅन फसला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज