rajkiyalive

ब्रह्मानंद पडळकरांनी खानापूर तालुक्यात विधानसभेसाठी ठोकला शड्डू ?

प्रताप मेटकरी / जनप्रवास, विटा

ब्रह्मानंद पडळकरांनी खानापूर तालुक्यात विधानसभेसाठी ठोकला शड्डू ? : सांगली लोकसभा निवडणूकीचा धुरळा उठल्यानंतर आता खानापूर विधानसभा मतदारसंघातील नेत्यांना वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. खानापूर विधानसभा मतदारसंघात आमदार गोपीचंद पडळकर हे निवडणूक लढवणार की त्यांचे जेष्ठ बंधू माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर हे आखाड्यात उतरणार ? याबाबत उत्सुकता असतानाच ब्रह्मानंद पडळकर यांनी निवडणूक लढविण्याचे सूचक विधान केले आहे. विशेषतः खानापूर तालुक्यात ब्रम्हानंद पडळकर यांनी नेटाने जनसंपर्क वाढविला आहे.

ब्रह्मानंद पडळकरांनी खानापूर तालुक्यात विधानसभेसाठी ठोकला शड्डू ?

विविध कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावागावात भेटी देऊन विधानसभेची साखरपेरणी सुरू केली आहे. काही दिवसापूर्वीच आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत येथील सभेत खानापूर विधानसभा मतदारसंघासाठी ब्रह्मानंद पडळकर हे इच्छुक असल्याचे सांगितले होते आणि त्यानंतर खानापूर मतदारसंघात ब्रम्हानंद पडळकर यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

गोपीचंद पडळकर हे कोणत्या मतदारसंघातून उभा राहणार याची देखील चर्चा सुरु आहे

त्यातच आमदार गोपीचंद पडळकर हे कोणत्या मतदारसंघातून उभा राहणार याची देखील चर्चा सुरु आहे. ते जतमधून उभा राहणार अशा चर्चा जरी असल्या तरी आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत काहीही सांगितलेले नाही. त्यामुळे या पडळकर बंधूमधील गुगली अखेरच्या क्षणी पडणार आहे. मात्र ब्रम्हानंद पडळकर यांनी आमच्या दोघां बंधूपैकी कोणीही एक खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारच असल्याचे सांगितले. त्यामुळे मतदारसंघाच्या राजकीय पटलावर खळबळ उडाली आहे.

ब्रह्मानंद पडळकर यांनी समाजकल्याण सभापती पदाच्या कार्यकाळात सांगली जिल्ह्यात अनेक विकासकामे केली आहेत. समाजकल्याण विभागाच्या सभापती पदाच्या माध्यमातून त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी जिल्ह्यासाठी दिला आहे. तसेच खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमध्येही त्यांनी विकासकामे केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्यांनी यावेळच्या विधानसभा निवडणुकीवर आपला दावा केला आहे. ब्रम्हानंद पडळकर यांनी खानापूर मतदारसंघात भेटीगाठीवर भर दिला असून त्यांचीदेखील मतदारसंघात उठबस वाढवली आहे. कार्यकर्त्यांनीदेखील पडळकर यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह धरला आहे.

दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीवर भर

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ब्रम्हानंद पडळकर हे ताकतीने उतरणार की त्यांचे बंधू गोपीचंद पडळकर सर्वांना धक्का देत आखाड्यात ? येणार याकडे संपूर्ण मतदारसंघाच्या नजरा लागल्या आहेत. ब्रम्हानंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याच्यादृष्टीने दुसर्‍या आणि तिसर्‍या फळीतील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. विशेषतः खानापूर तालुक्यात ब्रम्हानंद पडळकर यांनी नेटाने जनसंपर्क वाढविला आहे. विविध कार्यक्रम आणि कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त गावागावात भेटी देऊन विधानसभेची साखरपेरणी सुरू केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज