bullak kart race sangli news : सरदार आणि रोमन झाले हिंदकेसरी : बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्याने पुन्हा एकदा शर्यतीला सोन्याचे दिवस आले आहेत. अनेक शेतकर्यांना बर्याच वर्षापासून या निर्णयाची प्रतिक्षा होती. त्यानंतर मात्र शेतकर्यांच्या गाड्या सुसाट सुटल्या.
bullak kart race sangli news : सरदार आणि रोमन झाले हिंदकेसरी
सातारा जिल्ह्यातील पुसेगाव येथे नुकत्याच बैलगाडी शर्यतींचे आयोजन करण्यात आले होेते. या शर्यतीमध्ये सुमारे राज्यातील सुमारे 1200 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. यामध्ये वाळवा तालुक्यातील वाघवाडी येथील सरदार व रोमन या बैलजोडीने राज्यस्तरीय मैदानात दोन लाख सत्याहत्तर रुपये व ढाल व हिंदकेसरीचा मानाचा किताब या जोडीने पटकावला. या विजयाने वाघवाडीचे नाव तर सर्वत्र झालेच त्याचबरोबर रोमन व सरदार ही नवखी जोडी महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली.
पुसेगाव (ता. खटाव) येथे बैलगाडी शर्यती आयोजित केल्या होत्या. शर्यतीत महाराष्ट्रातून 1200 बैलजोड्या सहभागी झाल्या होत्या. शेवटच्या टप्प्यात वेगाने अंतर कापत सरदार व रोमन या बैलजोडीने पुसेगाव हिंदकेसरीवर आपले नाव कोरले. वाघवाडी येथील गरीब कुटुंबातील सरदार या बैलाचे मालक आदित्य महादेव लाड व सुधीर वाघ ऊर्फ बंडा ड्रायव्हर असून रोमन या बैलाचे मालक प्रमोद वाघ, शरद लाड व उदय वाघ व बजरंग वाघ आहेत. या शेतकर्यांच्या दावणीला गेल्या अनेक वर्षांपासून बैलांची जोपासना केली जाते.
सरदार बैलाचा मालक आदित्य व रोमन बैलाचा मालक प्रमोद हे तर नवखे तरुण आहेत, तर बारक्या ड्रायव्हर सुरूल यांनी ही बैलगाडी पळविली. पुसेगाव मैदानात सरदार व रोमन बैलजोडी विजेती ठरल्यानंतर वाळवा तालुक्यातील व वाघवाडीच्या बैलगाडी शौकिनांनी जल्लोष साजरा केला. वाघवाडी येथे डीजेच्या वाद्यांमध्ये बैलांची मिरवणूक काढली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.