rajkiyalive

burning car in ashta : आष्ट्यात अपघातात चारचाकी जळून खाक

burning car in ashta : आष्ट्यात अपघातात चारचाकी जळून खाक: आष्टा : आष्टा – सांगली रस्त्यावर कारंदवाडी नजीक डंपर चालकाने अचानक डंपर चारचाकी आय 20 च्या आडवा मारल्याने झालेल्या अपघातात चारचाकी जळून खाक झाली.

burning car in ashta : आष्ट्यात अपघातात चारचाकी जळून खाक :

याबाबत अधिक माहिती अशी नागनाथ काळोखे रा. दुधगाव रोड, काळोखे मळा, आष्टा हे आपल्या कुटुंबियांसह चारचाकी आय 20 क्र. एम एच 12 एन.जे.6146 मधून सांगलीच्या दिशेने जात होते. यावेळी रस्ते कामासाठी मुरूम वाहतूक करणारा डंपर आर. जे. 14 जी. आर. 7261 हा अचानक विरुद्ध दिशेने वळण घेऊन आडवा आला.

यात आय 20 चारचाकी डंपरच्या डिझेल टाकीस जोरात धडकली. यावेळी आय 20चे वायरिंगमध्ये स्पार्किंग होऊन चारचाकीने पेट घेतला. प्रसंगावधान दाखवत काळोखे कुटुंबीय गाडीतून बाहेर पडले. चारचाकी क्षणार्धात जळून खाक झाली. नागनाथ काळोखे वय 60, सिंधुताई काळोखे वय 55, विशाल काळोखे वय 25 हे किरकोळ जखमी झाले. घटनास्थळी आष्टा पालिकेचे अग्निशमन पथक येऊन आग विजवली. यावेळी वाहतूक काही काळ बंद होती. बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
फोटो ओळी : आग लागलेली चारचाकी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज