
समडोळीमध्ये इंद्रध्वज आराधना महोत्सव यजमान पदाचा 22 रोजी सवाल
प. पू. श्री १०८ शांतिसागरजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या समडोळी नगरीत सन १९२४ साली आचार्यश्री शांतिसागरजी महाराज यांचा भव्य चातुर्मास संपन्न झाला. या चातुर्मासामध्ये आचार्यश्रीच्या कार्याचे दिव्यावधान म्हणून अश्विन शुक्ल एकादशी दि ८ ऑक्टोबर १९२४ रोजी फलटण, बारामती, समडोळीसह सर्व श्रावकांनी प.पू प्रथमाचार्य श्री १०८ शांतिसागरजी महाराजांना आचार्य ही पदवी प्रदान केली आणि श्री