rajkiyalive

CHANDOLI : चांदोली उद्यानातील दिशादर्शक ठरलेला जनीचा आंबा वीज पडल्याने उध्वस्त

जनप्रवास प्रतिनिधी
वारणावती : ( हिंदुराव पाटील )

CHANDOLI : चांदोली उद्यानातील दिशादर्शक ठरलेला जनीचा आंबा वीज पडल्याने उध्वस्त : गेल्या अनेक वर्षापासून चांदोली राष्ट्रीय उद्यानात दिशादर्शकाचे काम करत असलेल्या जनीचा आंबा म्हणून त्याची ओळख असलेल्या महाकाय आंब्याच्या वृक्षावर मागील आठवड्यात वीज पडून खूप मोठे नुकसान झाले. हा महाकाय वृक्ष साधारण दोनशे वर्षापासून डौलदारपणे उभा आहे.

CHANDOLI : चांदोली उद्यानातील दिशादर्शक ठरलेला जनीचा आंबा वीज पडल्याने उध्वस्त

CHANDOLI : चांदोली उद्यानातील दिशादर्शक ठरलेला जनीचा आंबा वीज पडल्याने उध्वस्त : चांदोली राष्ट्रीय उद्यानातून चौफेर खुप दूरवरून तो सहज दिसतो. इतकेच नव्हे तर चांदोली धरणाच्या मुख्य भिंतीवरून तसेच चांदोली परिसरातून व शिराळ्याच्या पश्चिम भागाच्या म्हणजे पावलेवाडी खिंडीपासून तो सहज नजरेस पडतो. उद्यानातील सर्वात उंचठिकाणावर असल्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून शिराळ्याच्या नकाशामध्ये तो दिशादर्शकाचे काम करत आहे.पूर्वी संपर्काची साधने नव्हती त्यावेळी जंगलात चुकलेले ग्रामस्थ, वनकर्मचारी, वनमजूर यांना योग्य दिशा दाखवण्याचे काम हा वृक्ष करत होता.

चांदोली राष्ट्रीय उद्यानातील दिशादर्शक असणारा जनीचा आंबा वीज पडल्याने निम्म्याहुन जास्त जमीनदोस्त झाला आहे.
उद्यानातील स्थलांतरित झालेली देवारे, झोळंबी, नांदोली, गावाच्या हद्दीवर हा वृक्ष आहे.

मात्र त्याचे स्थान देवारे या गावाच्या हद्दीत नोंदले गेलेआहे.वाढ झालेल्या गावठी आंब्याच्या झाडाची उंची साधारण 35 ते 40 मीटर तर घेर साधारण दहा मीटर इतका असतो. चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जनीचा आंबा मात्र याला अपवाद आहे. त्याची उंची साधारण 60 ते 70 मीटर तर घेर हा पंधरा ते वीस मीटरच्या घरात आहे. हा भला मोठा वृक्ष पाहिल्यानंतर आश्चर्य वाटल्यावाचून राहत नाही. जाणकारांच्या मते जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही एवढ़ा मोठा आंब्याचा वृक्ष नसावा असे सांगितले जाते.

चांदोली राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन झोनमधील असल्यामुळे तो पर्यटकांना पाहता येतो.

मातृवृक्ष म्हणून ही तो ओळखला जातो.स्वातंत्र्याच्या लढ्यात शिराळा व वाळवा ही क्रांतीची ठिकाणे होती. येथून लढा चालायचा इंग्रजांना चुकवत अनेक क्रांतिकारक जंगलात मुक्काम करायचे, त्यावेळी त्यांनाही दिशादर्शकाच काम हा वृक्ष करायचा. या ऐतिहासिक ठेव्याची वन्यजीव विभागाकडे नोंद आहे.मात्र त्याच्या इतिहासाबाबत अनेक मत-मतांतरे आहेत

CHANDOLI : चांदोली उद्यानातील दिशादर्शक ठरलेला जनीचा आंबा वीज पडल्याने उध्वस्त : एका अधिकार्‍याच्या मते जनीचा आंबा या भागात नांदोली गावआहे.

तेथील नियत क्षेत्रात बलकवाडी व इतर गावांचा समावेश आहे. पूर्वी येथे वसाहत होती. या वसाहतीचा शेतसारा कोणी भरायचा? वसाहतीवर मालकी हक्क कोणाचा? यावरून वाद होता. दुसरीकडे गावचा बोजा कमी करण्यासाठी शेतसारा भरणे आवश्यक होते. त्यावेळी जनाबाई नावाच्या महिलेने संपूर्ण शेतसारा भरला. तिची आठवण म्हणून तिथे असणाच्या नैसर्गिक आंब्याचे नामकरण करून त्याला जनीचा आंबा असे नाव देण्यात आले.

वीज पडल्याने हा आंबा जवळ जवळ निम्मा उध्वस्त झाला

मागील आठवड्यामध्ये अभयारण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वारा व पाऊस व मोठ्या प्रमाणात विजा चमकत होत्या यावेळी वीज पडल्याने हा आंबा जवळ जवळ निम्मा उध्वस्त झाला . गेल्या दोन अडीचशे वर्षापासून तो सहजच सर्वांच्या नजरेत भरत होता.तर हजारो पर्यटकांनी या जनीच्या आंब्याखाली बसून जेवणाचा व निसर्गाचा आस्वाद घेतला असल्याने पर्यटकांच्या मध्ये जनीच्या आंब्या विषयी मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होत आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज