chandrakantdada patil news : विशाल पाटलांकडे अजून 4 वर्षे आहेत, त्यांनी भाजपमध्ये यावे चंद्रकांतदादांची ‘ऑफर’ : सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांना भाजपचे जेष्ठ नेते तथा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भाजप प्रवेशाची खुली ऑफर दिली. खासदार पाटील यांच्याकडे अद्याप चार वर्षे 2 महिने आहेत. सांगलीच्या विकासासाठी त्यांनी भाजपमध्ये यावे. आमचीही केंंद्रातील खासदारांची संख्या एकने वाढेल. खासदार पाटील यांनी याचा विचार करावा असे आवाहनही मंत्री पाटील यांनी केले. विशेष म्हणजे यावेळी मंत्री पाटील यांच्या जवळच खासदार पाटील बसले होते.
chandrakantdada patil news : विशाल पाटलांकडे अजून 4 वर्षे आहेत, त्यांनी भाजपमध्ये यावे चंद्रकांतदादांची ‘ऑफर’
येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माध्यमांशी बोलताना मंत्री पाटील म्हणाले, राजकारणामध्ये वर्तमानात चालावे लागते. खासदार विशाल पाटील यांच्याकडे अजून 4 वर्षे दोन महिन्यांचा कालावधी आहे. सांगलीच्या विकासासाठी त्यांनी भाजपबरोबर यावे. यामुळे जिल्ह्यातील विकासकामेही मार्गी लागतील. याशिवाय केंद्रातील भाजप खासदारांची संख्याही एकने वाढेल. त्यांनी भाजप प्रवेशाची जाहीर ऑफर देतो. त्यांनी या ऑफरचा विचार करावा. विशेष म्हणजे खासदार पाटील यांच्या उपस्थितीतच मंत्री पाटील यांनी त्यांना भाजप प्रवेशाची ऑफर दिल्याने राजकिय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
खासदार झाल्यानंतर खासदार पाटील यांनी काँग्रेसला पाठींबा दिला आहे.
लोकसभा निवडणूकीत खासदार विशाल पाटील यांनी भाजप महायुतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांचा पराभव करत दिल्ली गाठली आहे. खासदार झाल्यानंतर खासदार पाटील यांनी काँग्रेसला पाठींबा दिला आहे. काँग्रेसचे शंभरावे खासदार म्हणून विशाल पाटील यांची ओळख आहे. गेल्या दोन अधिवेशनामध्ये जिल्हयातील अनेक प्रश्नांवर खासदार पाटील यांनी आवाज उठवला. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाली असतानाच मंत्री पाटील यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑपॐर दिल्याने राजकिय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान मंत्री पाटील यांची ऑपॐर खासदार पाटील स्विकारणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
chandrakantdada-patil-news-vishal-patil-has-4-more-years-chandrakantdadas-offer-to-join-bjp
दरम्यान सांगली, कोल्हापूरसह राज्यातील महापूर नियंत्रणाबाबत शासन संवेदनशील आहे. महापूर नियंत्रण उपायोजनांसाठी 3 हजार 200 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये सांगलीतील पूर नियंत्रणासाठीचा 600 कोटींच्या आराखड्याचा समावेश आहे. यासाठी जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यात येणार आहे. 50 वर्षाचा करार असेल. सन 2019, 2021च्या महापूरामध्ये सांगलीत अनेकांना नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.
कवलापूर येथील विमानतळासाठी उपलब्ध जागेचा प्लॅन तयार करण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत, असे सांगत मंत्री पाटील म्हणाले. इथे किमान छोटी विमाने उतारावीत अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात येणार आहे. याशिवाय कवठेमहांकाळ तालुक्यांमध्ये ड्रायपोर्ट करावेच लागेल. यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे मंत्री पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



