rajkiyalive

चर्चा संपल्या; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटीलच

जनप्रवास । सांगली
चर्चा संपल्या; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटीलच : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून गेल्या एक महिन्यापासून काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटात सुरू असलेली चढाओढ अखेर संपली आहे. ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला अंतिम झाली असून चंद्रहार पाटील यांनी एबी फॉर्मसहीत अर्ज दाखल केला. विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा काँग्रेसकडून असलेला अर्ज अपात्र होणार आहे. अपक्ष असलेला अर्ज कायम राहणार असून त्यांच्या भूमीकेकडे आता लक्ष लागले आहे. याचा फैसला सोमवारी होणार आहे.

चर्चा संपल्या; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटीलच

विशाल पाटील अपक्षच लढणार

गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्ष सांगली लोकसभेची जागा लढवत आला आहे. परंतु, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर दावा सांगितला आणि या जागेवर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. महाविकास आघाडीत ठाकरे गटाने कोल्हापूरची जागा काँग्रेससाठी सोडली. काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज हे या जागेवरून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. त्याबदल्यात शिवसेनेच्या ठाकरे गटाने सांगली लोकसभेची जागा आपल्याकडे घेतली आहे. परंतु, सांगलीतले स्थानिक काँग्रेस नेते तसेच राज्य पातळीवरील काही नेते या निर्णयाच्या विरोधात गेले होते.

काँग्रेसच्या जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

सांगलीच्या जागेवरील आपला हक्क सिद्ध करून ही जागा ठाकरेंच्या शिवसेनेकडून परत मिळवण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हा आणि प्रदेश पातळीवरील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तसेच पलूस-कडेगावचे आमदार आणि सांगलीतले स्थानिक नेते विश्वजीत कदम तसेच विशाल पाटील यांनी गेल्या आठवड्यात दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र महाविकास आघाडीच्या अंतिम जागा वाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला मिळाली. यानंतर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी विशाल पाटील यांना बंडखोरी करण्यासाठी साद घातली. विशाल पाटील यांनी काँग्रेस पक्ष व अपक्ष असे अर्ज दाखल करत काँग्रेसला दि. 19 तारखेपर्यंतचा अल्टीमेट दिला.

काँग्रेसच्या नेत्यांनी दि. 18 रोजी रात्री उशीरापर्यंत शिवसेना (उबाठा) गटाच्या नेत्यांशी चर्चा केली.

सांगलीला सोडा आणि काँग्रेसच्या वाट्याला असेली मुंबई उत्तरची जागा घ्या, असा नवा प्रस्ताव दिला होता. मात्र शिवसेनेने सांगली सोडून बोला, असे सांगितल्याने सर्वस्तरावरील चर्चा संपल्या. शिवसेनेने चंद्रहार पाटील यांना एबी फॉर्म दिला आणि त्यांनी शुक्रवारी अर्ज दाखल केला. विशाल पाटील यांना काँग्रेसचा एबी फॉर्म मिळालाच नाही. त्यामुळे त्यांना अपक्ष निवडणूक लढावी लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. सोमवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. त्या मुदतीत महाविकास आघाडीत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजयनगर मतदान जनजागृती रॅली

सांगली लोकसभा मतदार संघासाठी जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी आज सांगली विधानसभा मतदार संघातील संजयनगर परिसरात मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. या मतदान रॅलीमध्ये आयुक्त शुभम गुप्ता यांच्यासह अधिकार्‍यांनी सहभाग घेतला होता.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकातून या मतदान जनजागृती राहिलेल्या सुरुवात झाली. प्रारंभी सहाय्यक निवडणूक अधिकारी आशिष बारकुल यांनी उपस्थितांना मतदान जनजागृतीबाबत मार्गदर्शन केले. यावेळी मनपा आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्वांना मतदानाची शपथ दिली. यावेळी मनपा उपायुक्त वैभव साबळे, सहायक पुरवठा अधिकारी मीना बाबर, मनपाचे शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. वैभव पाटील, प्रशासन अधिकारी शिक्षण श्री. आठवले, कार्यशाळा प्रमुख विनायक जाधव, यानंतर मतदान जनजागृती रॅलीला सुरुवात केली.

यानंतर ही मतदान जनजागृती रॅली संजयनगर परिसरात नेण्यात आली.

या ठिकाणी महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी सर्वांना मार्गदर्शन करीत जास्तीजास्त संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी महापालिकेचे ब्रँड अम्बेसेडर दीपक चव्हाण यांनी मतदान जनजागृती करणारी गाणी सादर करीत मतदानाची जागृती केली. मतदान जनजागृती रॅलीमध्ये महापालिकेचे शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी, आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, स्वच्छता निरीक्षक यांच्यासह कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाचे आयोजन आणि संयोजन शिक्षण मंडळाचे सतीश कांबळे, रतन कदम आणि टीमने केले.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज