rajkiyalive

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : परराज्यातील महिलेला पतीचा जन्म दाखला चालणार

जनप्रवास । प्रतिनिधी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : परराज्यातील महिलेला पतीचा जन्म दाखला चालणार परराज्यात जन्म झालेल्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणार्‍या पुरुषाबरोबर विवाह केला असेल, तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक सादर करावे. नवविवाहीत महिलेच्या बाबतीत तीचे नाव रेशनकार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशनकार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : परराज्यातील महिलेला पतीचा जन्म दाखला चालणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : SANGLI जिल्ह्यात लाडकी बहीणसाठी 1.20 लाख अर्ज : सांगली ः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 लाख 19 हजार 681 महिलांनी नोंदणी केली आहे. नोंदणी केलेल्या अर्जामध्ये 58 हजार 679 महिलांनी ऑनलाईन तर 67 हजार 2 महिलांनी ऑफलाईन नोंदणी केली आहे. प्राप्त अर्जांची छाननी सुरु असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दाखल्यांसाठी ग्रामपंचायतींनी अडवणूक करु नये, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण : SANGLI जिल्ह्यात लाडकी बहीणसाठी 1.20 लाख अर्ज

जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी म्हणाले, लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिला वंचित राहणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासन संवेदनशील आहे. या योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्यास 31 ऑगस्टपर्यंत मुदत आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया विनामुल्य आहे. ‘नारी शक्ती दूत’ या अ‍ॅपवरून भरता येत आहेत. याशिवाय अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामसेवक, समूह संसाधन व्यक्ती, आशा सेविका यांच्याकडे अर्ज द्यावेत.

गावपातळीवर ग्रामसेवक, कृषि सहायक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे. या समितीमार्फत गावपातळीवर शिबीर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पध्दतीने नोंदणी करावयाची आहे. महापालिका क्षेत्रात वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले.

राज्यातील 21 ते 65 या वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेच्या अनुषंगाने काही अडचणी आल्यास जिल्हा कार्यक्रम अधिकारी जिल्हा परिषद सांगली अथवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सांगली यांच्याशी सपंर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी केले. यावेळी महिला बालकल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप यादव उपस्थित होते.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज